TMC Commissioner : ठाणे महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी केली विकास कामांची पाहणी

| Updated on: Apr 28, 2022 | 5:36 PM

पवारनगर रस्त्यावरील सायकल ट्रॅक पुढील 15 दिवसांत सुरु करणे, येऊर येथील आरोग्य केंद्राची दुरुस्ती करणे, पवारनगर रस्त्यावरील नागरिकांकडून अनधिकृतरित्या उघडण्यात आलेले दरवाजे तसेच महानगरपालिकेचे फ्लॉवर बेड व फुटपाथचे नुकसान केल्यामुळे संबंधितांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

TMC Commissioner : ठाणे महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी केली विकास कामांची पाहणी
ठाणे महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी केली विकास कामांची पाहणी
Image Credit source: TV9
Follow us on

ठाणे : ठाणे महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा (Vipin Sharma) यांनी आज शहरातील पवारनगर, वसंत विहार आदी परिसरातील रस्ते दुरुस्ती, पदपथ, महापालिका शाळा, स्वच्छता, साफसफाई व रंगरंगोटी कामांची पाहणी (Inspection) केली. दरम्यान, या परिसरातील अत्यावश्यक कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त शर्मा यांनी संबंधितांना दिले. यावेळी उन्नती गार्डन येथील फेरीवाल्यांचे नियोजन करणे, उन्नती गार्डन येथील महापालिकेच्या भूखंडाच्या वापराबाबत अहवाल सादर करणे, भूखंडाच्या संरक्षक भिंतीवर तारेचे कुंपन घालणे, साफसफाई करणे, आरोग्य केंद्राची किरकोळ दुरुस्ती व रंगरंगोटी करण्याचे निर्देश देतानाच ठामपा शाळा क्र.47 येथील मैदानाचा विकास करणेबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधितांना दिले. (Thane Municipal Commissioner Dr. Vipin Sharma inspected the development works)

विविध विकासकामे पूर्ण करण्याचे आदेश

राजूर सोसायटी समोरील नाल्यावर स्लॅब टाकण्यासंबंधी तांत्रिक अहवाल तयार करणे, पोखरण रोड नं.2 येथे विद्युत व्यवस्था करणे, रस्त्याचे पुनर्पुष्टीकरण करणे, उपवन जवळील सत्यम लॉजच्या मोकळ्या भूखंडावर संरक्षक भिंत संबंधितांकडून बांधून घेणे, प्रभाग क्र.5 मधील विद्युत रोषणाई विचारात घेता झाडांची आवश्यक छाटणी करणे, उपवन तलाव जेटी ते अॅम्पि थिएटरपर्यंत संरक्षण भिंत बांधणेबाबत नियोजन करणे, येऊर येथे हॅप्पीनेस स्ट्रीट तयार करणेच्या उद्देशाने वन विभागाशी समन्वय साधण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

पालायदेवी मंदिर परिसर स्वच्छ करणे, गावंडबाग परिसरात रॅबिट उचलणे, गावंडबाग परिसरात नाना-नानी पार्क समोरील मोकळ्या भूखंडाचे आरक्षण तपासून पुढील कार्यवाही करणे, गावंड बाग परिसर ते पवारनगर रस्ता जोडणे कामी आवश्यक उपाययोजना करणे, शाळा क्र. 48 चे संरक्षक भिंतीवर थिम पेंटींग करणे, पवारनगर रस्त्यालगत महापालिकेच्या भूखंडावर दिव्यांगांकरीता सेन्सरी गार्डन तयार करणेबाबत आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. शर्मा यांनी संबंधितांना दिले.

जुना म्हाडा रस्त्याचे रिसर्फेसिंग करण्याचे निर्देश

पवारनगर रस्त्यावरील सायकल ट्रॅक पुढील 15 दिवसांत सुरु करणे, येऊर येथील आरोग्य केंद्राची दुरुस्ती करणे, पवारनगर रस्त्यावरील नागरिकांकडून अनधिकृतरित्या उघडण्यात आलेले दरवाजे तसेच महानगरपालिकेचे फ्लॉवर बेड व फुटपाथचे नुकसान केल्यामुळे संबंधितांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच पवारनगर येथील बस स्थानकामध्ये आवश्यक विद्युत रोषणाई करणे, काशिनाथ घाणेकर येथील जनरेटरमधून होणारे ध्वनी प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने आवश्यक उपययोजना करणे, वसंत विहार शाळेसमोरील रस्त्यावर आवश्यक विद्युत रोषणाई करणे, वसंत विहार शाळेचे आर.जी.आरक्षणावर वापरात असलेल्या मैदानाचे हस्तांतरणाची प्रक्रिया तपासून घेऊन जुना म्हाडा रस्त्याचे रिसर्फेसिंग करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. शर्मा यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

या पाहणी दौऱ्यास माजी नगरसेवक नरेंद्र सूरकर, माजी नगरसेविका जयश्री डेव्हिड, रागिणी बैरीशेट्टी, परिषा सरनाईक, अतिरिक्त आयुक्त(1) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (2) संजय हेरवाडे, नगर अभियंता प्रशांत सोनग्रा, उप आयुक्त मारुती खोडके, उप आयुक्त मनीष जोशी, उप आयुक्त जी.जी. गोदेपुरे, उप आयुक्त दिनेश तायडे, उप आयुक्त अनघा कदम, अतिरिक्त नगर अभियंता अर्जुन अहिरे, सहाय्यक आयुक्त सचिन बोरसे संबंधित कार्यकारी अभियंता, उप अभियंता तसेच इतर महापालिका अधिकारी आदी उपस्थित होते. (Thane Municipal Commissioner Dr. Vipin Sharma inspected the development works)