Thane Mahapalika : करदात्यांनी मालमत्ता कर तात्काळ जमा करण्याचे ठाणे महापालिकेचे आवाहन

| Updated on: Feb 02, 2022 | 11:43 PM

मालमत्ता कराच्या वसुली अंतर्गत जप्ती, लिलाव, महापालिकेच्या सेवा खंडित करणे व इतर कारवाई टाळणेच्या दृष्टीकोनातून मालमत्ता कर प्राधान्याने महापालिकेकडे जमा करण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Thane Mahapalika : करदात्यांनी मालमत्ता कर तात्काळ जमा करण्याचे ठाणे महापालिकेचे आवाहन
करदात्यांनी मालमत्ता कर तात्काळ जमा करण्याचे ठाणे महापालिकेचे आवाहन
Follow us on

ठाणे : ठाणे महापालिके(Thane Municipal Corporation)च्या वतीने सन 2021-22 या आर्थिक वर्षाची मालमत्ता करा(Property Tax)ची देयके उपलब्ध करुन देण्यात आली असून जे करदाते मालमत्ता कर भरणार नाहीत, त्यांच्यावर कडक कारवाई सुरु करण्यात आली आहे. तरी सर्व करदात्यांनी त्यांचा देय कर महापालिकेकडे जमा करुन सहकार्य करण्याचे आवाहन ठाणे महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. सन 2021-22 या आर्थिक वर्षाची मालमत्ता कराची देयके करदात्यांना आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस देण्यात आलेली आहेत. अद्याप काही करदात्यांनी महापालिकेकडे कर जमा केलेला नाही. सन 2021-22 या आर्थिक वर्षाचा कर वसुलीचा अंतिम टप्पा असून, कर वसुलीकरीता महापालिकेकडून कडक कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. (Thane Municipal Corporation appeals to taxpayers to collect property tax immediately)

जानेवारी 2022 मध्ये अनेक मालमत्तांवर जप्तीची कारवाई

या अंतर्गत जानेवारी 2022 मध्ये बऱ्याच मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. मालमत्ता कराच्या वसुली अंतर्गत जप्ती, लिलाव, महापालिकेच्या सेवा खंडित करणे व इतर कारवाई टाळणेच्या दृष्टीकोनातून मालमत्ता कर प्राधान्याने महापालिकेकडे जमा करण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. प्रभाग समिती स्तरावरील महापालिकेच्या कोणत्याही कर संकलन केंद्रावर सकाळी 10.30 ते 5.00 पर्यंत रोख, धनादेश, धनाकर्ष, डेबीट कम एटिम कार्ड व क्रेडिट कार्डद्वारे कर जमा करण्याची सुविधा उपलब्ध आहे. तसेच www.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने कर भरण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.

करदात्यांनी सहकार्य करण्याचे पालिकेचे आवाहन

त्याचप्रमाणे सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी करदात्यांना मालमत्ता कर भरणे सोयीस्कर व्हावे, याकरीता प्रभाग स्तरावरील कर संकलन केंद्र माहे मार्च 2022 अखेरपर्यंत प्रत्येक शनिवारी सकाळी 10.30 ते सायंकाळी 500 वाजेपर्यंत तसेच रविवारी सकाळी 10.30 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत कार्यान्वित ठेवण्यात येत आहे. तरी करदात्यांनी त्यांचा देय कर महापालिकेकडे जमा करुन सहकार्य करण्याचे आवाहन ठाणे महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. (Thane Municipal Corporation appeals to taxpayers to collect property tax immediately)

इतर बातम्या

Thane Crime : बोगस कॉल सेंटरद्वारे अमेरिकन नागरिकांची फसवणूक, गुन्हे शाखेकडून 6 जणांना अटक

Pune crime|भाडेतत्वार महिंद्रा XUV कार घेऊन पळाले ; पोलिसांनी आवळल्या मुसक्या