पाऊस थांबताच ठाण्यात पुन्हा फेरिवाला हटाव सुरू; अनधिकृत इमारतींवरही हातोडा

| Updated on: Sep 30, 2021 | 10:10 AM

पाऊस थांबताच पुन्हा एकदा ठाण्यात फेरिवाला हटाव सुरू झालं आहे. कालपासून ठाण्यात अनधिकृत फेरिवाले आणि बेकायदा बांधकामांवर काल धडक कारवाई करण्यात आली. (Thane Municipal Corporation takes action against illegal structures, hawkers)

पाऊस थांबताच ठाण्यात पुन्हा फेरिवाला हटाव सुरू; अनधिकृत इमारतींवरही हातोडा
hawkers
Follow us on

ठाणे: पाऊस थांबताच पुन्हा एकदा ठाण्यात फेरिवाला हटाव सुरू झालं आहे. कालपासून ठाण्यात अनधिकृत फेरिवाले आणि बेकायदा बांधकामांवर काल धडक कारवाई करण्यात आली. महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली.

या कारवाईतंर्गत नौपाडा कोपरी प्रभाग समितीमधील आलोक हॉटेल, गावदेवी तीन हात नाका, हरिनिवास सर्कल, राम मारुती रोड, तलावपाळी येथील फेरीवाले हटविण्यात आले. तसेच स्टेशन परिसर, जुनी महानगरपालिका, सुभाष पथ, जांभळी नाका, कोर्ट नाका, संकल्प चौक, रघुनाथ नगर, हाजुरी, एल आय सी ऑफिस रोड, नाखवा हायस्कूल, ठाणेकर वाडी, कोपरी कॉलनी, भाजी मार्केट, स्टेशन रोड, नारायण कोळी चौक, अष्टविनायक चौक व मंगला हायस्कूल नाका येथील फेरीवाले हटवून सामान जप्त करण्यात आले.

मैदानातील कमानीही तोडल्या

कळवा प्रभाग समितीमधील विठ्ठल मंदिर रोड खारेगाव येथील 90 फिट रोड, पारसिकनगर परिसरातील फेरीवाल्यांना हटविण्याची कारवाई करण्यात आली. दिवा प्रभाग समितीमधील खान कंपाऊंड, दिवा पूर्व येथील सद्दाम यांचे वाढीव अनधिकृत बांधकाम निष्कासीत करण्यात आले. कळवा प्रभाग समिती मधील अल्सफा इमारती जवळ टाकोळी मोहल्ला येथील तळ अधिक 9 मजली अनधिकृत इमारतीतील अंतर्गत बांधकाम निष्कासीत करण्यात आले. तसेच लोकमान्य- सावरकरनगर प्रभाग समिती अंतर्गत येत असेल्या डवले नगर मैदानातील कमानीचा धोकादायक भाग गॅस कटरच्या साहाय्याने तोडण्यात आला.

इमारतींवर हातोडा, तर वाहनांना जॅमर

उथळसर प्रभाग समितीमधील नितीन कंपनी सर्व्हिस रोड, कॅडबरी जंक्शन सर्व्हिस रोड येथील अनधिकृरित्या नो पर्किंगमध्ये पार्क केलेल्या वाहनांना जॅमर लावण्याची कारवाई करण्यात आली. दरम्यान वर्तकनगर प्रभाग समितीमधील जवाहर नगर, आनंद बाजार, मुरली बार, कापुरबावडी नाका, लॉकिम कंपनी, मोर मॉलच्या समोर, जीबीरोड हायवे सर्विस रोड, म्हाडा वसाहत येथील गुलाब चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सी-1 आणि सी-2 (A) धोकादायक इमारतीचे पाहणी करण्यात आली आहे. तसेच वर्तकनगर नाका, कॅडबरी नाका ते माजीवडा नाका ते वसंत विहार सर्कलपर्यंत फेरीवाले हटविण्यात आले

सदरची कारवाई अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाच्या उप आयुक्त अश्विनी वाघमळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सहाय्यक आयुक्त शंकर पाटोळे, संतोष वझरकर, सचिन बोरसे, अलका खैरे, महेश आहेर, समीर जाधव आणि विजयकुमार जाधव यांनी अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि पोलीस यांच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली.

 

संबंधित बातम्या:

बदलापुरात प्रदूषण करणारी ‘ती’ कंपनी अखेर सापडली, तातडीने उत्पादन थांबवण्याची नोटीस

VIDEO | दुकानदार मागे वळताच ग्राहकाचा मोबाईलवर डल्ला, चोरीचा प्रकार CCTV मध्ये कैद

आणि भाजप उमेदवाराच्या पोस्टरवर अडगळीत पडलेले राज ठाकरे राड्यानंतर मोठे झाले?, वाचा नेमकं काय घडलं?

(Thane Municipal Corporation takes action against illegal structures, hawkers)