ZP School : जिल्हा परिषदेच्या शाळांची उद्यापासून घंटा वाजणार, शाळांमध्ये प्रवेशोत्सवाची जय्यत तयारी

| Updated on: Jun 14, 2022 | 7:15 PM

जिल्हा परिषदेच्या मुरबाड, अंबरनाथ, कल्याण, भिवंडी, शहापूर आदी पाच तालुक्यात 1328 शाळा आहेत. या प्रत्येक शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे हटके स्वागत करण्यात येणार आहे. काही ठिकाणी विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात येणार आहे. तर काही ठिकाणी बैलगाडी किंवा स्थानिक वाहनातून विद्यार्थ्यांची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात येणार आहे.

ZP School : जिल्हा परिषदेच्या शाळांची उद्यापासून घंटा वाजणार, शाळांमध्ये प्रवेशोत्सवाची जय्यत तयारी
मराठी शाळांमध्ये आता "हॅपीनेस करिक्युलम"!
Image Credit source: TV9
Follow us on

ठाणे : कोरोना साथरोगानंतर सुरक्षित आणि निर्भय वातावरणात उद्या म्हणजे 15 जूनपासून जिल्हा परिषद शाळां (ZP School)चे 2022-23 हे नवीन शैक्षणिक वर्ष (Academic Year) सुरू होणार आहे. त्यामुळे शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत (Welcome) शाळा व्यवस्थापन समिती आणि शिक्षकांकडून करण्यात येणार आहे. स्वच्छतेसह विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत, शिक्षकांनी ह्या प्रवेशोत्सवाची जय्यत तयारी केली आहे. विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर एखाद्या जिल्हा परिषदेच्या शाळेत उपस्थित राहणार आहेत.

प्रत्येक शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे हटके स्वागत करण्यात येणार

जिल्हा परिषदेच्या मुरबाड, अंबरनाथ, कल्याण, भिवंडी, शहापूर आदी पाच तालुक्यात 1328 शाळा आहेत. या प्रत्येक शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे हटके स्वागत करण्यात येणार आहे. काही ठिकाणी विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात येणार आहे. तर काही ठिकाणी बैलगाडी किंवा स्थानिक वाहनातून विद्यार्थ्यांची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांचे औक्षण आणि गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यासाठीही काही शाळा तयार आहेत. तर काही शाळांमध्ये नाविन्यपूर्ण खेळ, उपक्रमांनीही शाळेचा पहिला दिवस साजरा होणार आहे. अशा प्रकारे चैतन्यमय वातावरणात शाळा प्रवेशोत्सव साजरा होईल. विशेष म्हणजे सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन शिक्षकांसह 12 वर्षावरील विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे.

शाळेत येण्यासाठी विद्यार्थी उत्सुक

कोरोना महामारीमुळे जिल्हा परिषदेच्या शाळा ऑनलाइन पद्धतीने मागील अडीच वर्षांपासून सुरू होत्या. मधल्या काळात कोरोना नियंत्रण नियमावलीचे काटेकोरपणे पालन करून शाळा सुरू झाल्या. त्यानंतर शाळांना उन्हाळी सुट्टी देण्यात आली. त्यामुळे आता नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत असून शाळेत येण्यासाठी विद्यार्थी उत्सुक आहेत. विद्यार्थ्यांना शाळेचा पहिला दिवस आनंदी आणि उत्साही वाटावा यासाठी शिक्षकांनी शाळा प्रवेशोत्सवाची दोन दिवस तयारी केली आहे. (Thane Zilla Parishad schools will start from tomorrow)

हे सुद्धा वाचा