सांगली : सांगलीच्या कवठेमहांकाळमध्ये गुप्त धन काढून देतो म्हणून घेतलेले पैसे परत दिले नाहीत. या कारणाने अवधूत सोपान शिंदे (Avdhoot Sopan Shinde) या तरुणाचा सहा जणांनी खून (Murder) करून अवधूतचे प्रेत घाटामध्ये टाकून पुरावा नष्ट केला होता. हा खून उघड करण्याचे कवठेमहांकाळ पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने हा खून उघडकीस आणून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. चार महिन्यापूर्वी म्हणजे 9 ऑक्टोबर रोजी रात्री 9 च्या दरम्यान आंबवडे नागज ते विटा रस्त्यावरील नागज घाटात वनविभागच्या जागेमध्ये अवधूत सोपान शिंदे याचे प्रेत पोलिसांना मिळाले होते. पण मयताच्या नातेवाईकांनी खूनाचा संशय कवठेमहांकाळ पोलिसांकडे व्यक्त केला. पोलिसांनाही हा खुनच असावा असा संशय निर्माण झाला आणि पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी या खुनाचा उलघडा करण्यासाठी कर्मचाऱ्यांची टीम रवाना केली. (The murder of four months ago in Sangli was solved by the police)
आनंदराव आत्माराम पाटील (57 रा. पाडळी ता. तासगाव ), तुषार बाळू कुंभार (28 रा. घोटीखुर्द ता. तासगाव ), लखन ठोंबरे (रा. पंचशील नगर, विटा ), वैभव नेताजी सकट (रा. आंबवडे ता. खटाव ), अमोल विठ्ठल कारंडे (22, रा. आंबवडे, ता तासगाव) व अण्णा या सहा जणांवर आपसात संगमनत करून अवधूत शिंदे याला काठी, लोखंडी पाईपने मारहाण केली. लाथा बुक्क्यांनी डोक्यात मारले. त्यामुळे अवधूत जागीच ठार झाला.
मयत अवधूत शिंदे या तरुणाने गुप्त धन काढून देतो म्हणून काही लोकांकडून पैसे व सोने घेतले होते. पण गुप्त धन न दिल्याने त्याने पैसे परत द्यावे म्हणून आरोपींनी मयत अवधूतला मारहाण केली आणि यात त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपींनी पुरावा नष्ट करण्यासाठी मयत अवधूतला नागज घाटात फेकून दिले आणि खुनाचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. याप्रकरणी तब्बल सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर इतर तिघांचा पोलिसांकडून कसून शोध सुरू आहे. (The murder of four months ago in Sangli was solved by the police)
इतर बातम्या