मुंब्रामध्ये जाण्याचा मार्ग प्रशस्त, उद्धव ठाकरे यांना पाठवलेली नोटीस रद्द

| Updated on: Nov 11, 2023 | 3:00 PM

Udhav Thackeray | ठाण्यात सध्या शिवसेना शाखेवरुन हाय होल्टेज ड्रामा सुरु आहे. मुंब्रातील ठाकरे गटाच्या शाखेवर बुलडोझर फिरवल्याने वातावरण एकदम चिघळले आहे. प्रकरणात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता शिवसैनिकांशी संवाद साधू शकतील. यापूर्वी पोलीस प्रशासनाने त्यांना मुंब्र्यात प्रवेशासाठी बंदी घातली होती. आता त्यांचा सूर नरमला आहे.

मुंब्रामध्ये जाण्याचा मार्ग प्रशस्त, उद्धव ठाकरे यांना पाठवलेली नोटीस रद्द
UDDHAV THACKAREY
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

ठाणे | 11 नोव्हेंबर 2023 : मुंब्र्यातील ठाकरे गटाच्या शाखेवरुन हायहोल्टेज ड्रामा सुरु आहे. ठाण्यातील या शाखेवरुन ठाकरे गट आणि प्रशासनात चांगलीच चकमक उडाली. त्यातच पोलिसांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या ठिकाणी भेट देण्यास मज्जाव करण्यासाठी नोटीस पण बजावली होती. त्यांना मुंब्र्यात जाण्यापासून रोखण्यासाठी ही कलम 144 अन्वये नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर अजून वातावरण तापले. वाद जास्त चिघळू नये यासाठी आता पोलीस प्रशासनाने नरमाईचे धोरण स्वीकारले आहे. यापूर्वी दिलेली नोटीस रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिक शिवसैनिकांशी उद्धव ठाकरे संवाद साधू शकतील.

काय घडली घडामोड

मुंब्र्यातील ठाकरे गटाच्या शाखेवर बुलडोझर फिरवण्यात आला. त्यामुळे मुंब्र्यातील वातावरण चांगलंच तापलं. या शाखेची पाहणी करण्यासाठी आणि शिवसैनिकांशी संवाद साधण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज मुंब्र्यात येणार होते. पण त्यापूर्वीच मुंब्र्यात उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेले होर्डिंग्ज फाडण्यात आले. तसेच उद्धव ठाकरे यांना मुंब्र्यात येऊच देणार नाही, असं पोलिसांनी म्हटल्याचा दावा राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला. याविषयीची नोटीस ही समोर आली. त्यामुळे ठाण्यातील वातावरण अधिकच तापलं.

हे सुद्धा वाचा

ठाण्यात उद्धव ठाकरे यांचे शक्तीप्रदर्शन

दुपारी 3 वाजता उद्धव ठाकरे मातोश्रीवरून निघतील. त्यानंतर 4 वाजता ते मुंब्र्यात पोहोचतील. यावेळी ते स्थानिक शिवसैनिकांशी संवाद साधणार असल्याने मुंब्र्यात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे ठाण्यात येण्यापूर्वीच त्यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेले होर्डिंग्ज फाडण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. मुंब्र्यात आणि मुलुंड टोलनाक्यावर हे होर्डिंग्ज लावण्यात आले होते. मात्र, मुंब्र्यातील होर्डिंग्ज अज्ञात व्यक्तींनी फाडल्याने ठाण्यात तणाव निर्माण झाला आहे.

ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष

या सर्व वातावरणात उद्धव ठाकरे काय निशाणा साधतात आणि कोणाला लक्ष्य करतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. शिवसेनेतील फुटीनंतर शिंदे गट आणि ठाकरे गटातील धुसफूस अनेकदा समोर आली आहे. यावेळी दसरा मेळाव्यात सामना अटीतटीचा झाला नाही. पण अनेक मुद्यांवर कार्यकर्ते भिडले आहेत. शाखा ताब्यात घेण्यावरुन ही अनेकदा दोन्ही गटात धुमश्चक्री झाली आहे.