प्रतिनिधी, पालघर : तीन कामगार एकाच कारखान्यात काम करायचे. काम आटोपून काल रात्री ते घरी परत येत होते. पण, रस्त्याच्या बाजूला कंटेनर उभा होता. हा कंटेनर रात्रीची वेळ असल्याने दुचाकी चालकाला दिसला नाही. त्याने थेट कंटेनरला धडक दिली. यामुळे भीषण अपघात झाला. या अपघातात तिघांचाही जागीच मृत्यू झाला. रात्रीची वेळ असल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जाते. या दुर्घटनेमुळे तिन्ही कामगारांच्या कुटुंबावर दुःखाचे डोंगर पसरले आहे. तिघेही आपल्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळत होते.
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघरमधील मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुर्घटना घडली. सातीवली येथे भरधाव बाईकने उभ्या ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात बाईकवरील ट्रिपल सीट असलेल्या तिघांचाही जागीच मृत्यू झाला.
मुंबईकडून गुजरातकडे जाणाऱ्या वाहिनीवर रात्रीच्या सुमारास उभ्या कंटेनरला या भरधाव बाईकने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघातात विक्रमगड तालुक्यातील तिघांचा जागीच मृत्यू झाला. हे तिन्ही मृतक वसईतील एका कारखान्यातील कामगार असल्याची माहिती समोर आली.
कारखान्यातून सुट्टी झाल्यावर घरी परतत असताना हा भीषण अपघात झाला. या अपघातात नरेश लाडक्या भोईर (वय 22 रा. करसोड), सूरज राघ्या ठाकरे (वय 18 रा. डोल्हारी बुद्रुक), मयूर विनोद ठाकरे (रा .17 डोल्हारी बुद्रुक) या तिघांचा मृत्यू झाला.
तिघेही कामगार एका गाडीने परत येत होते. यावेळी हा अपघात झाला. चालकाच्या नजरेत समोरील कंटेनर दिसला नाही. त्यामुळे भीषण अपघात झाला. अपघातानंतर तिघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले. तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. तीन कामगार कुटुंब उघड्यावर पडले आहेत.