ठाणे: ठाण्यातील आतापर्यंतचा लसीकरणाचा आकडा जाहीर झाला आहे. ठाण्यात आतापर्यंत 8 लाख 584 लोकांचं लसीकरण करण्यात आलं आहे. यात 4,24,310 महिलांचं लसीकरण झालं असून 3,76,274 पुरुषांचं लसीकरण झालं आहे. ठाण्यात महिलांचं सर्वाधिक लसीकरण झाल्याचं महापौर नरेश म्हस्के आणि पालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी सांगितलं. (Vaccine drive: thane Corona Vaccination, 8 lakh people Vaccinated)
कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी तयार करण्यात आलेल्या कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन लसीचा डोस शासनाने दिलेल्या मार्गदर्शनानुसार देण्याचे काम महापालिका प्रशासनाच्यावतीने सुरू आहे. शासनाकडून उपलब्ध होणाऱ्या लसीकरण साठ्यानुसार महापालिका तसेच खासगी हॉस्पिटलमध्ये नागरिकांना पाहिला व दुसरा डोस देण्यात येत आहे.
ठाणे शहरात आतापर्यंत 24,017 आरोग्य कर्मचाऱ्यांना पाहिला तर 15,779 कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. फ्रंट लाइन कर्मचारी पैकी 27,272 लाभार्थ्यांना पहिला व 13,821 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. 45 ते 60 वयोगटातंर्गत 1,55,484 लाभार्थ्यांना पहिला तर 89,899 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. 60 वर्षावरील नागरिकांमध्ये 1,30,447 लाभार्थ्यांना पहिला डोस व 72,005 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. 18 ते 44 वयोगटातील नागरिकांमध्ये 2,49,336 लाभार्थ्यांना पहिला डोस तर 22,524 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. दरम्यान शहरातील 128 गर्भवती महिलांचे, 138 तृतीय पंथीयांचे आणि अंथरुणाला खिळून पडलेल्या 4 व्यक्तींचे देखील कोरोना प्रतिबंधक लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे, अशी माहिती शर्मा यांनी दिली आहे.
गेल्या 24 तासात देशात 42 हजार 982 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 533 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 41 हजार 726 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 18 लाख 12 हजार 114 वर गेला आहे. देशात आतापर्यंत 3 कोटी 9 लाख 74 हजार 748 रुग्ण बरे झाले आहेत. तर 4 लाख 26 हजार 290 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 4 लाख 11 हजार 76 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 48 कोटी 93 लाख 42 हजार 295 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
देशात 24 तासात नवे रुग्ण – 42,982
देशात 24 तासात डिस्चार्ज – 41,726
देशात 24 तासात मृत्यू – 533
एकूण रूग्ण – 3,18,12,114
एकूण डिस्चार्ज – 3,09,74,748
एकूण मृत्यू – 4,26,290
एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 4,11,076
आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 48,93,42,295
गेल्या 24 तासातील लसीकरण – 37,55,115 (Vaccine drive: thane Corona Vaccination, 8 lakh people Vaccinated)
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 5 August 2021 https://t.co/6UUWFgHmvF #News #bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 5, 2021
संबंधित बातम्या:
अंबरनाथमध्ये सर्वात मोठी लसीकरण मोहीम, 30 हजार कामगारांना दिली जाणार मोफत लस
(Vaccine drive: thane Corona Vaccination, 8 lakh people Vaccinated)