विरार : विरारमध्ये घोणस जातीच्या विषारी सापाला पकडण्यास वसई-विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे. विरार पूर्व कांबेश्वर सोसायटीच्या संरक्षण भिंतीजवळ हा साप आढळला आहे. गेल्या काही तासांपासून विरारमध्ये पाऊस पडत आहे. त्यामुळे बिळात पाणी शिरले आहे. यामुळेच हा साप बाहेर आल्याचे सांगितले जात आहे. (Virar firefighters caught poisonous Ghonas snake)
मुसळधार पावसामुळे सापांचा सुळसुळाट
विरार पूर्व कांबेश्वर सोसायटीच्या संरक्षण भिंतीजवळ हा विषारी साप दबा धरून बसलेला होता. या सापाने बेडूक किंवा अन्य काही खाल्ले असल्याने तो सुस्त भिंतीच्या कडेला बसला होता. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याला स्ट्रेचरच्या साहाय्याने पकडले आहे.
हा साप अतिशय विषारी आहे. जर तो कोणाला चावला तर त्या ठिकाणाचा भाग हा सडतो. तसेच त्या व्यक्तीला तात्काळ उपचार मिळाले नाही, तर त्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. मुसळधार पावसामुळे बिळात पाणी शिरल्याने तो बाहेर आल्याचे सांगितले जात आहे, असे अग्निशमन दलाच्या जवानांनी सांगितले आहे. (Virar firefighters caught poisonous Ghonas snake)
पाहा व्हिडीओ :