पालघर: डहाणू मतदारसंघात अशक्य अशी गोष्ट काहीच नाही, स्थानिक पातळीवर बऱ्याच ठिकाणी पक्षाची चांगली कामगिरी आहे. आपण थोडा प्रयत्न केला तर स्थानिक स्वराज्य संस्था तर टिकवूच मात्र विधानसभेतही एक चांगला निकाल आपल्याला मिळू शकतो, असं सांगतानाच मी तुम्हाला जागं करण्यासाठी आलो आहे. जागं राहा आणि पक्ष वाढवा, अशी सादच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पालघर, डहाणूमधील कार्यकर्त्यांना घातली.
राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेचा आजचा दुसरा दिवस असून जयंत पाटील यांनी डहाणू येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधला. संघटना आपल्याला बळकट करायची आहेच शिवाय आपलं अस्तित्व निर्माण करण्याची गरज आहे. त्यामुळे आपल्याला जागं करण्यासाठी आम्ही आलो आहोत, असे पाटील म्हणाले. प्रत्येक समाजाच्या प्रश्नांची सोडवणूक करून लोकांच्या मनात स्थान निर्माण करा, असे आवाहनही त्यांनी केलं.
यावळी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही यावेळी कार्यकर्त्यांना केलं. वसई – विरार सोडला तर संपूर्ण पालघरमध्ये आपल्यासाठी एक पोषक वातावरण आहे. या वातावरणाचे रुपांतर आपल्याला मतांमध्ये करून पालघर जिल्ह्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा फडकवायचा आहे, असे आवाहन आव्हाड यांनी केले.
डहाणू हा पुरोगामी विचारांचा गड आहे. शरद पवारसाहेबांचं या भागावर विशेष प्रेम आहे. मात्र मधल्या कालखंडात पक्षापासून काही लोक दूर गेले. ही परिस्थिती आपल्याला बदलायची आहे त्यामुळे एकदिलाने काम करा असे सांगतानाच राष्ट्रवादीच्या मदतीने अनेक जण निवडून येतात. मला खात्री आहे आपण मनात ठरवलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी इथली जागा जिंकू शकते, असा विश्वासही आव्हाड यांनी व्यक्त केला.
यावेळी आमदार सुनिल भुसारा, पालघर निरीक्षक अशोक सावंत, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सांबरे, महिला जिल्हाध्यक्षा किर्ती मेहता, युवक जिल्हाध्यक्ष वरुण पारेख, युवती जिल्हाध्यक्षा हिंदवी पाटील आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 23 October 2021 https://t.co/tMTS4JvFy2 #News #Bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 23, 2021
संबंधित बातम्या:
नवाब मलिक हे पाकिस्तानचे एजंट, पाकच्या ड्रग्ज माफियांचे ब्रँड अॅम्बेसेडर; नितेश राणेंचा गंभीर आरोप
अमित शहा सध्या काश्मीर दौऱ्यावर आहेत, संजय राऊत म्हणाले, तिकडेच थांबायला सांगा!
(we can win palghar assembly constituency, says jayant patil)