ठाणे : सर्वांच्या प्रयत्नातून प्रकल्प पूर्ण होत असतात. महापौर, आमदार, खासदार प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतात. या पुलासाठी ठाणे महापालिकेनं खर्च केला. कोणताही प्रकल्प पूर्ण करण्यासाठी इच्छशक्ती लागते. ती आमच्याकडं आहे, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला. ठाण्यात पुलाच्या उद्घाटनांतर ते बोलत होते. एकनाथ शिंदे म्हणाले, तुम्हाला रस भांडणात की विकासात कशात आहे. आजपासून पुलाचे उद्घाटन झाले आहे. त्यामुळे आता वाहातूक कोंडी होणार नाही. एरोली टनेलचे काम जोरात सुरू आहे. त्याचे काम लवकर होईल. ज्यांनी या पुलाला मदत केली त्यांचे आभार मानतो. शिळ फाट्याची वाहतूक कोंडी कमी होईल, अशी अपेक्षा मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली.
ठाण्यात पुलाच्या उद्घाटनानंतर रंगली श्रेयवादाची लढाई सुरू झाली. श्रीकांत शिंदे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात दुसऱ्यांदा वाकयुध्द
रंगले, पुल आम्ही बनवला म्हणणाऱ्या आव्हाडांना पैसे कोणाच्या सरकारने दिले, असा प्रतिप्रश्न श्रीकांत शिंदे यांनी आव्हाडांना केला.
मी आणि शिंदे साहेबांनी एकत्र काम केले. त्यांच्याबद्दल मला आदर आहे. तीन महिन्यांपूर्वी मला मनेसेचे नेते म्हणत होते की
पुलाचे उद्घाटन करू. मात्र मुख्यमंत्री आल्याशिवाय उद्घाटन होणार नाही मी असं म्हटलं, अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड एकाच मंचावर आले. कळवा खाडीवरील तिसऱ्या पुलाच्या मार्गिकेचं लोकार्पण मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. नवीन पुलाची आवश्यकता होती. त्यामुळं या पुलाचं काम पूर्ण झालं. प्रकल्प हा लोकांच्या फायद्यासाठी झाला पाहिजे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर वाहतूक कोंडी कमी होईल. एमएमआरडीए आणि स्थानिक महापालिका काम करते. मेट्रोसुद्धा पुढं जात आहे. पब्लिक सेवा चांगली होणं आवश्यक आहे. शहरातली अडचणीची ठिकाण कमी केली पाहिजे, असंही मुख्यमंत्री म्हणाले.