धावती लोकल पकडताना पडलेल्या महिलेचे जवानाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्राण ; घटना CCTV कैद

| Updated on: Dec 04, 2021 | 6:43 PM

दोघांनीही प्रसंगावधान राखत क्षणाचा ही विलंब न लावता त्या दिशेने धाव घेतली. महिलेला सुखरूप बाहेर ओढले. त्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळं महिलेचा जीव वाचला. महिलेला बाजूला घेत बाकड्यावर बसवले. कुठे जखम वैगेरे झाली आहे का? याची विचारपूस केली. या घटनेचा सर्व थरार स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.

धावती लोकल पकडताना पडलेल्या महिलेचे जवानाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्राण ; घटना CCTV  कैद
Dombivali local Train
Follow us on

मुंबई- डोंबिवली रेल्वे स्थानकावर एम एस एफ जवानाच्या सतर्कतेमुळे धावती लोकल पकडताना पडलेल्या महिलेचे प्राण वाचले आहेत. डोंबिवली रेल्वेस्थानकावरून सकाळी एक महिला डोंबिवली रेल्वे स्थानकाहून मुंबईच्या दिशेने जाणारी लोकल पकडत होती. इतक्यात लोकल सुरू झाल्याने सुरू झालेली लोकल पकडण्याच्या प्रयत्नात असलेली महिला तोल जाऊन प्लटफॉर्म आणि लोकलच्या गॅपमध्ये पडली.

प्रसंगावधान राखल्याने वाचले प्राण
याच वेळी स्थानकावर कार्यरत असलेले एम एस एफच्या जवान विवेक पाटील व किरण राऊत यांचे या महिलेकडे लक्ष गेले. त्या दोघांनीही प्रसंगावधान राखत क्षणाचा ही विलंब न लावता त्या दिशेने धाव घेतली. महिलेला सुखरूप बाहेर ओढले. त्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळं महिलेचा जीव वाचला. महिलेला बाजूला घेत बाकड्यावर बसवले. कुठे जखम वैगेरे झाली आहे का? याची विचारपूस केली. या घटनेचा सर्व थरार स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.

एस एस एफ जवानांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे महिलेचा जीव वाचला. जवानांनी दाखवलेल्या धैर्याबद्दल स्थानकावरील नागरिकांनी त्यांचे कौतुक केले. नागरिकांनी धावत्या लोकलमध्ये चढण्याचा प्रयत्न करू नये. असे आवाहनही रेल्वे प्रशासनाकडून स सातत्याने केले जात आहे.

Nagpur धोका ओमिक्रॉनचा : विद्यापीठाच्या इमारतीत मनपाचे कोव्हिड हॉस्पिटल, जाणून घ्या काय आहेत सुविधा

Nawab Malik: जो डर गया, वो मर गया; नवाब मलिक यांचा प्रवीण दरेकरांना टोला

Sara tendulkar : सचिनची मुलगी सारा तेंडुलकरच्या स्पेशल डेटची सोशल मीडियावर चर्चा