नाशिकः मोठ्या धूमधडाक्यात सुरू असलेले कार्यक्रम, कोरोना प्रतिबंधाच्या नियमांना लावलेल्या वाटाण्याच्या अक्षता आणि पर्यटननगरी नाशिकमध्ये जमलेला पर्यटकांचा मेळा यामुळे कोरोनोच्या रुग्णसंख्येत पुन्हा एकदा झपाट्याने वाढ झालेली दिसत आहे. जिल्ह्यात आज कोरोना रुग्णांचा आकडा चक्क 573 वर पोहचला आहे. दुसरीकडे गेल्या आठ दिवसांत कोरोनामुळे 9 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नाशिकरांच्या ह्रदयाचे ठोके वाढलेले दिसत आहेत.
अशी झाली रुग्णवाढ
जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 4 लाख 4 हजार 649 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत 573 रुग्णांवर उपचार सुरू आहे. तसेच आत्तापर्यंत 8 हजार 756 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे. उपचार घेत असलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक 30, बागलाण 15, चांदवड 06, देवळा 18, दिंडोरी 26, इगतपुरी 08, मालेगाव 02, नांदगाव 03, निफाड 49, सिन्नर 19, सुरगाणा 01, त्र्यंबकेश्वर 03, येवला 15 अशा एकूण 195 पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 358, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात 8 तर जिल्ह्याबाहेरील 12 रुग्ण असून, अशा एकूण 573 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात 4 लाख 13 हजार 978 रुग्ण आढळून आले आहेत. त्यात नाशिक ग्रामीणमध्ये काल आढळून आलेल्या रुग्णांमध्ये नाशिक 09, बागलाण 05, चांदवड 01, देवळा 01, दिंडोरी 07, इगतपुरी 01, मालेगाव 01, नांदगाव 01, निफाड 06, सिन्नर 05, सुरगाणा 01, त्र्यंबकेश्वर 01, येवला 01 असे एकूण 40 पॉझिटीव्ह रुग्ण ग्रामीण भागात आढळून आले आहेत.
रुग्ण बरे होण्याची टक्केवारी
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीणमध्ये 97.19 टक्के, नाशिक शहरात 98.12 टक्के, मालेगावमध्ये 97.12 टक्के, तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 97.73 टक्के आहे. तसेच जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.75 टक्के इतके आहे. नाशिक ग्रामीणमध्ये आतापर्यंत 4 हजार 247, तर नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून 4 हजार 25 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मालेगाव महानगरपालिका क्षेत्रातून 358 व जिल्हा बाहेरील 126 अशा एकूण 8 हजार 756 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
नियमांंकडे पाठ
कोरोनाचे वाढलेले रुग्ण पाहता नाशिकमध्ये आता सर्व सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यावर रात्री 9 ते सकाळी 6 यावेळेत बंदी असेल. त्यामुळे कसल्याही पार्ट्या होणार नाहीत. लग्न समारंभासाठी बंदिस्त सभागृहांमध्ये एकावेळी उपस्थितांची संख्या ही घटवण्यात आली आहे. मात्र, या नियमांचे पालन होताना दिसत नाही. त्यामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. शिवाय गेल्या आठ दिवसांत 9 जणांचे मृत्यू झाल्याचेही समोर आले आहे.
8 दिवसांतील मृत्यू
-23 डिसेंबर 2021-01
-26 डिसेंबर 2021-01
-27 डिसेंबर 2021-02
-28 डिसेंबर 2021-02
-29 डिसेंबर 2021-02
-31 डिसेंबर 2021-01
Omicron| नाशिकमध्ये 6 तर जिल्ह्यात 39 केंद्रांवर मुलांचे लसीकरण; सोमवारपासून होणार सुरुवात