पालघर : ऑनलाईन क्लास (Online class) करायला सांगितल्याचा राग आल्याने घर सोडून दिल्लीतून (Delhi) वसईला आलेल्या एका 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीची रिक्षाचालकाच्या (Rickshaw driver) प्रसंगावधानाने पुन्हा एकदा तिच्या आई-वडिलांशी भेट झाली आहे. रिक्षाचलकाने या मुलीला पोलिसांच्या मदतीने पुन्हा तिच्या वडिलांच्या ताब्यात दिले आहे. संबंधित मुलगी दिल्लीला राहाते. तेथून ती थेट वसईला आली होती. राजू करवाडे असे या रिक्षाचालकाचे नाव आहे. राजू करवाडे यांच्या एका कामगिरीने वसईची शान वाढली आहे. आपलं घर सोडून आलेल्या एका अल्पवयीन मुलीला प्रसंगावधान दाखवत त्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिलं आणि पोलिसांनी तिला सुरक्षीतपणे तिच्या वडिलांच्या ताब्यात दिलं. घटना 29 जानेवारीची आहे. सकाळी साडेसहच्या सुमारास वसईच्या रेल्वे स्थानकाजळच्या रिक्षा स्टॅंण्ड परिसरात एक 15 वर्षाची अल्पवयीन मुलगी फिरत होती. तिने रिक्षाचालक राजू यांना आपणाला नोकरी पाहिजे तसेच राहण्यासाठी घर देखील पाहिजे असे सांगितले. मात्र ही मुलगी एकटीच फिरत असल्याने राजू यांना संशय आला. त्यांनी प्रसंगावधान दाखवत तिला थेट वसईच्या माणिकपूर पोलीस ठाण्यात नेलं. तेथील पोलिसांनी या मुलीची विचारपूस करत तिच्या वडिलांचा नंबर मिळवला व तुमची मुलगी वसईला असल्याची माहिती तिच्या वडिलांना दिली.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच वडील देखील पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यांनी मुलीला ताब्यात घेतले आहे. वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार ही मुलगी दिल्लीची राहणारी आहे. मुलगी ऑनलाईन क्लास करत नव्हती. त्यामुळे वडिलांना ऑनलाईन क्लास का अटेंड करत नाही म्हणून तिच्याकडे विचारणा केली. वडील रागावल्याचा राग आल्याने संबंधित मुलीने आपले घर सोडले व ती वसईमध्ये आली. वसईमध्ये एकटी फीरत असताना ती रीक्षाचालक राजू करवाडे यांना दिसती त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी संबंधित मुलीच्या वडिलांशी संपर्क साधून त्या मुलीला तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिले आहे.
दरम्यान या अल्पवयीन मुलीचे वडील हे सैन्यात अधिकारी पदावर आहेत. आपली मुलगी आपल्याला परत भेटल्याने त्यांनी पोलिसांचे आभार मानले आहेत. तसेच प्रसंगावधान दाखवत राजू यांनी या मुलीला पोलीस स्टेशनला आणल्यामुळे वाहतूक पोलीस आणि माणिकपूर पोलिसांनी राजू यांचा सत्कार केला. माझ्यामुळे आज एक मुलगी पुन्हा एकदा तिच्या कुटुंबाला भेटू शकली याचा आनंद वाटत असल्याची प्रतिक्रिया राजू यांनी यावेळी दिली आहे.
Bigg Boss 15 Grand Finale LIVE: तेजस्वी प्रकाश बिग बॉस 15 ची विजेती, प्रतिक सेहजपाल उपविजेता