नाशिक : आगामी काळातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतिने जोरदार तयारी केली जात आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या उपस्थित औरंगाबादमध्ये जाहीर सभा पार पडली होती. त्यानंतर अमित शाह स्वतः नाशिकमध्ये जाहीर सभा घेत राज्य अधिवेशन घेणार आहे. त्याची तयारी भाजपकडून केली जात आहे. महाराष्ट्र भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत कोअर कमिटीच्या पदाधिकाऱ्यांना यामध्ये निमंत्रित केले जाणार आहे. फेब्रुवारीमध्ये भाजपचे राज्य अधिवेशन हे नाशिकमध्ये होणार असल्याचे निश्चित झाले आहे. दहा आणि अकरा तारखेला तपोवनातील साधुग्राम मैदानावर हे अधिवेशन होणार आहे. त्या दृष्टीने नाशिकचे प्रभारी आणि पदाधिकारी याबाबत नियोजन करत आहे. 2024 च्या निवडणुकीची पूर्वतयारी भाजपकडून केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर जाहीर सभा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबतचा प्रचार कायम ठेवण्यासाठी भाजपकडून जाहीर सभा घेतल्या जात आहे.
2024 च्या निवडणुकीत भाजपच्या वतिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच नावावर निवडणुका भाजप लढवणार आहे हे जवळपास स्पष्ट आहे.
त्याच पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात भाजपने जाहीर सभा, पक्षीय अधिवेशन, कोअर कमिटीच्या बैठका आयोजित करत निवडणूक पूर्व तयारी केली जात आहे.
नाशिकमध्ये उत्तर महाराष्ट्राची जाहीर सभा होणार आहे. यामध्ये भाजपकडून जोरदार तयारी केली जात आहे. फेब्रुवारी महिन्यातील दहा आणि अकरा तारखेला साधूग्राम मैदानावर आयोजन करण्यात आले आहे.
भाजपचे राष्ट्रीय नेते तथा केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या उपस्थित हे राज्य अधिवेशन होणार आहे. हजारो पदाधिकारी आणि कोअर कमिटीचे पदाधिकारी या राज्य अधिवेशनाला सहभागी होणार आहे.
अधिवेशन यशस्वी करण्यासाठी भाजपच्या वतिने अनेक मंत्री आणि पदाधिकारी नाशिकमध्ये ये-जा करत आहे. औरंगाबादमध्ये झालेल्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील अधिवेशन यशस्वी करण्यासाठी स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन लक्ष देऊन आहे.