नंदुरबार : नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात तापमान ४४ अंश सेल्सिअस पर्यंत गेल्याने त्याचा परिणाम आता महावितरण कंपनीच्या ट्रान्सफार्मरला देखील बसला आहे. तापमान अधिक वाढल्यामुळे उन्हाच्या गरम झळा देखील लागत आहेत, त्यामुळे ट्रांसफार्मर गरम होत असतं, त्यासाठी कुलर लावण्यात आले असून, ट्रान्सफॉर्मरला थंड ठेवण्यात थोडंफार कुठेतरी मिळालं आहे. दिवसभर विद्युत पुरवठा (Power Supply) होत असल्याने ट्रान्सफॉर्मर गरम होत असतो, त्यामुळे शॉर्टसर्किट होण्याची मोठी भीती असते, त्यासाठी ट्रान्सफॉर्मर थंड ठेवण्यासाठी कुलर लावला जात असून 12 तास हे कुलर सुरू राहतात आणि ट्रान्सफॉर्मरला थंड करत असतं, नंदुरबार जिल्ह्यात यावर्षी तापमानाचा (temprature) पारा चांगला वाढत असल्याने याचा परिणाम मानवी जीवनाप्रमाणेच शेती पिकांना देखील होत आहे.
नंदुरबार जिल्ह्यात दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढत असताना धरणातील पाणीसाठा देखील कमी होत असल्याचे चित्र पाहायला आहे. जिल्ह्यात असलेल्या मध्यमाने लघु प्रकल्पातील पाणीसाठा अत्यंत कमी असून काही ठिकाणी लघु आणि मध्यम प्रकल्पांनी तळ गाठला आहे. धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने त्याचा परिणाम ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनांवरही होण्याची भीती निर्माण झाली आहे. असून ग्रामीण भागातील पाणीटंचाई तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शहादा तळोदा अक्कलकुवा धडगाव नंदुरबार नवापूर तालुक्यातील लघु प्रकल्पांनी तळ गाठले असून अनेक ठिकाणी तीव्र पाणीटंचाई जाणवत असून जिल्हा प्रशासनाच्या वतीने योग्य त्या उपाययोजना केल्या जात असल्या तरी पाणीटंचाईच्या झाडा अजून बसतील अशी स्थिती निर्माण झाली आहे.
उन्हणाची दाहकता वाढली असून शहरा लगत असलेल्या लळिंग जंगल परिसरात वन्य प्राण्यांसाठी वनविभागाच्या वतीने पानवटे तयार करण्यात आले आहे. या पर्यटन वन्यजीवांना पाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी त्यात आता पाणी टाकण्यात आले आहे. त्यामुळे प्राण्यांचे तहान भागणार आहे. धुळे शहरालगत नवीन कुराण असून यात बिबटे, हरीण, कोल्हे, ससे, मोर इतर प्राणी आहेत. सध्या जिल्ह्याचं तापमान 41 अंशाच्या पुढे गेले आहे. वनविभागाच्या वतीने जंगल परिसरात वन्य प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी पंधरा कृती पालवटे तयार करण्यात आले आहेत. या मानवट्यात अनेक दिवसापासून पाणी नव्हते त्यामुळे वन्य प्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. प्राण्यांच्या पाण्याची व्यवस्था केल्याने त्यांची भटकंती कमी होणार आहे.