नाशिकः नाशिकध्ये बुधवारी, 22 डिसेंबर रोजी अनेक भागात पाणी येणार नाही. गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्र येथून नाशिकरोडमधील पाण्याची टाकी भरणाऱ्या मुख्य पाईपलाईनला गळती लागली आहे. या गळतीच्या दुरुस्तीसाठी बुधवारी नाशिकरोडच्या काही भागात सकाळी आणि संध्याकाळी दुरुस्तीचे काम सुरू राहणार आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना बुधवारी पाणीपुरवठा केला जाणार नाही, अशी माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे. येथे गुरुवारी पाणीपुरवठा होईल. मात्र, तोही कमी दाबाने असेल. त्यामुळे शुक्रवारपासून येथील पाणीपुरवठा सुरळीत सुरू होणार आहे.
प्रभाग क्रमांक 17
नाशिकरोडच्या प्रभाग क्रमांक सतरामधील तिरुपतीनगर, टाकळीरोड परिसर, कॅनोल रोड परिसर, नारायण बापूनगर, चंपानगरी, गोदावरी सोसा, दसकगाव, शिवाजीनगर, एसएससीबी कॉलनी या भागात पाणीपुरवठा होणार नाही, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे कळवण्यात आले आहे.
प्रभांग क्रमांक 18, 19
नाशिकरोडच्या प्रभाग क्रमांक 18 मधील भगवा चौक, शिवशक्तीनगर, पंचक गाव, सायखेडारोड, पवारवाडी, इंगळे चौक, अयोध्या कॉलनी, शिवाजीनगर, मॉडेल कॉलनी या भागात पाणीपुरवठा होणार नाही. तर प्रभाग क्रमांक एकोणीसमधील गोरेवाडी भागात पाणी येणार नाही, असे कळवण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी उद्या मंगळवारी पाणी व्यवस्थित भरून ठेवले, तर त्यांना अडचण येणार नाही.
प्रभाग क्रमांक 20, 21
नाशिकरोडच्या प्रभाग क्रमांक वीसच्या पुनारोड परिसर, डावखरवाडी, जयभवानी रोड परिसर, अश्विनी कॉलनी, जेतवनगर, बिटको कॉलेज तरणतलाव या भागात पाणीपुरवठा होणार नाही. नाशिकरोडच्या प्रभाग क्रमांक एकवीसमधील जयभवानी रोड परिसर, सहाणे मळा, लवटेनगर एक आणि दोन, आर्टीलरी सेंटर रोड, दत्तमंदिर रोड, धोंगडेनगर, जगतपा मळा, तरणतलाव परिसर, चव्हाण मळा, फर्नांडिस वाडी, भालेराव मळा, जाचकनगर, नंदनवन कॉलनी, आवटेनगर या भागात पाणीपुरवठा होणार नाही.
प्रभाग क्रमांक 22
नाशिकरोडच्या प्रभाग क्रमांक बावीसमधील रोकडोबावाडी, डोबी मळा, सुंदरनगर या भागात पाईपलाईन दुरुस्तीच्या कामामुळे पाणीपुरवठा सुरू राहणार नाही, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने कळवण्यात आले आहे. या भागात गुरुवारी पाणीपुरवठा होईल. मात्र, हा पाणीपुरवठाही कमी दाबाने होण्याची शक्यता आहे. शुक्रवारपासून या भागातील पाणीपुरवठा सुरळीत सुरू होणार आहे.
Nashik| अचाट खाणे न् मसणात जाणे…काय, तर टोमॅटोच्या कॅरेटमधून दारूची तस्करी, 15 लाखांचा साठा जप्त