एका वडापाववरून वाद झाला, पत्नीने चेन ओढली, पती थेट हॉस्पिटलमध्ये पोहोचला

| Updated on: Nov 15, 2023 | 11:02 PM

बालाजी दिगंबर जानोळे हे आपली पत्नी मुक्ता जानोळे आणि दोन मुलांसह छत्रपती संभाजी नगर येथून हैदराबादला जाण्यासाठी ट्रेनमध्ये चढले होते. ही ट्रेन लातूर जिल्ह्यातील तिच्या रेल्वे स्थानकावर आली. त्यावेळी मुलांनी खाऊ मागितला. त्यामुळे जानोळे यांनी खाद्यपदार्थ विकणाऱ्या व्यक्तीला काही विचारले.

एका वडापाववरून वाद झाला, पत्नीने चेन ओढली, पती थेट हॉस्पिटलमध्ये पोहोचला
CRIME NEWS
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

लातूर | 15 नोव्हेंबर 2023 : छत्रपती संभाजी नगर येथून हैदराबादकडे जाणाऱ्या ट्रेनमधील एक घटना समोर आलीय. ट्रेन लातूर जिल्ह्यातील रेल्वे स्थानकावर आली असता खाद्यपदार्थ विकणाऱ्या व्यक्तीसोबत वडापाववरून वाद झाला. मात्र, हा वाद त्या प्रवाशाला चांगलाच महागात पडला. त्या प्रवाशाला थेट हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागेल. त्यांच्या डोक्याला, हाताला, पायाला इतर ठिकाणी गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बालाजी दिगंबर जानोळे असे जखमी झालेल्या प्रवाशाचे नाव आहे.

बालाजी दिगंबर जानोळे हे आपली पत्नी मुक्ता जानोळे आणि दोन मुलांसह छत्रपती संभाजी नगर येथून हैदराबादला जाण्यासाठी ट्रेनमध्ये चढले होते. ही ट्रेन लातूर जिल्ह्यातील तिच्या रेल्वे स्थानकावर आली. त्यावेळी मुलांनी खाऊ मागितला. त्यामुळे जानोळे यांनी खाद्यपदार्थ विकणाऱ्या व्यक्तीला काही विचारले. तोपर्यंत गाडी सुटली आणि तो विक्रेता गाडीत चढला. त्याने जानोळे यांच्यासोबत वाद घालण्यास सुरवात केली. वादाचे कारण अगदीच किरकोळ होते.

जानोळे यांच्यासोबत वाद घालणाऱ्या त्या विक्रेत्याने त्यांना थेट चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकले. यानंतर कोचमध्ये एकच गोंधळ उडाला. ही घटना घडली त्यावेळी जानोळे यांची पत्नी आणि दोन मुलेही सोबत होती. पत्नीने आधी आरडाओरड केली. मात्र, प्रसंगावधान राखून तिने तत्काळ ट्रेनची चेन ओढून ट्रेन थांबवली.

पत्नी मुक्ता हिने आपल्या मुलांसह ट्रेनमधून खाली उतरली. तेव्हा तिला पती बालाजी गंभीर जखमी होऊन रुळाच्या बाजूला पडलेले दिसले. तोपर्यंत साखळी कुणी खेचली हे पाहण्यासाठी आरपीएफचे जवान पोहोचले होते. त्या जवानांच्या साह्याने पत्नी मुक्ता हिने त्यांना रुग्णालयात दाखल केले.

पत्नी मुक्ता हिने दिलेल्या माहितीच्या आधारे आरपीएफने खाद्य पदार्थांची विक्री करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत जानोळे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या डोक्याला, हाताला, पायाला आणि शरीराच्या इतर भागावर अनेक गंभीर जखमा झाल्या आहेत.

आपल्या पतीला धक्काबुक्की करणाऱ्याला तत्काळ अटक करावी अशी मागणी पत्नी मुक्ता जानोळे यांनी केली आहे. तिच्या पतीला चालत्या ट्रेनमधून फेकणाऱ्याला अटक करून त्याच्यावर कडक कारवाई कारवाई अशी मागणीही त्यांनी केलीय. दरम्यान, आरपीएफने या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आरपीएफ स्टेशनचे प्रभारी यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच, आरोपीचा शोध सुरू आहे. पुढील कार्यवाही सुरू आहे असे सांगितले.