माजी आमदाराच्या बंगल्यावर चोरट्यांचा दरोडा, इतक्या किलोचे दागिने लंपास

| Updated on: Dec 11, 2022 | 7:16 PM

माजी आमदाराच्या घरावरच चोरट्यांनी दरोडा टाकला आहे. घरी कोणी नसल्याने डाव साधत चोरटे ऐवज घेऊन फरार झाले.

माजी आमदाराच्या बंगल्यावर चोरट्यांचा दरोडा, इतक्या किलोचे दागिने लंपास
Follow us on

रत्नागिरी : माजी आमदाराच्या घरावर चोरट्यांनी दरोडा टाकला आहे. काल रात्री ही घटना घडली आहे. चोरट्यांनी बंगल्यात चोरी केल्यानंतर आज सायंकाळी घराच चोरी झाल्याची माहिती समोर आली. दोन दिवसांपूर्वी घरमालक मुंबईला कामानिमित्त गेल्यामुळे घर बंद होते. चोरटे ऐवज घेऊन लंपास झाले आहेत. माजी आमदार बापू खेडेकर हे कुटुंबासह दोन दिवसासाठी मुंबईत कामानिमित्त गेले होते. त्यादरम्यान चोरट्यांनी हा डाव साधला.

चोरटे मात्र सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. घरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारावर आपल्या घरी चोरी झाल्याचं कुटुंबियांनी कळलं. पोलिसांकडून घटनेचा तपास सुरु आहे.

माजी आमदार बापू खेडेकर यांचे घर बंद असल्याने चोरट्यांनी संधी साधत तीन किलो चांदी लंपास केली आहे. यासोबतच आणखी काही ऐवज चोरीला गेल्याची माहिती आहे. एकूण किती मुद्देमाल चोरीला गेला आहे. याची माहिती अद्याप पुढे आलेली नाही.