राज्यातील उद्योग धंद्यांना अडथळा आणणाऱ्यांना सोडले जाणार नाही नाही. अशा संघटीत गुन्हेगारीला चाप लावण्यासाठी त्यांच्यावर थेट मोक्का लावण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीव्ही नाईन कॉनक्लेव्हमध्ये बोलताना केली आहे. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साल २०३० पर्यंत महाराष्ट्र ट्रीलियन डॉलर इकॉनॉमी होणार आहे. हे टार्गेट आपण साल २०२८ मध्येच गाठणार होतो, परंतू दोन वर्षे कोरानामुळे आर्थिक झळ बसल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केले. मुंबईतील टीव्ही ९ कॉनक्लेव्हमध्ये टीव्ही ९ मराठी चॅनलचे व्यवस्थापकीय संपादक उमेश कुमावत आणि TV9 भारतवर्ष डिप्टी एग्जिक्यूटिव प्रोड्यूसर गौरव अग्रवाल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली त्यावेळी ते बोलत होते.
देशात अनेक राज्यं म्हणतात आम्ही ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी करणार. पण सर्वात आधी महाराष्ट्राने आयडिया दिली. आम्ही रोड मॅप तयार केला. आम्ही २० सीईओची कमिटी तयार केली. सेक्टोरियल प्लान तयार केला. आम्ही ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी महाराष्ट्रातच आधी तयार करणार आहोत. ज्या प्रकारची गती आम्ही पाहत आहोत, त्यानुसार २०३० पर्यंत आम्ही ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी होणार आहोत. आपण साल २०२८ मध्येच ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी होणार होतो. पण कोरोनामुळे दोन वर्ष आर्थिक झळ बसल्याचे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
महाविकास आघाडीच्या काळातील ग्रोथ रेट निगेटिव्ह आहे. त्याचे दोन कारण आहेत. कोविड आहे. पण त्या काळात अन्य राज्यांनी पॉझिटिव्ह ग्रोथ रेट दिला आहे. देशानेही दिला आहे. त्या काळात सरकारची पॉलिसी कामं रोखणारी होती. आमचे विकासाचे दोन मॉडल आहे. पायाभूत सुविधांचा विकास आणि दुसरा डेव्हल्पमेंट लेड ग्रोथचा आहे. इन्फ्रा स्ट्रकचरल लीड ग्रोथमध्ये जे की प्रोजेक्ट रोखले तर विकास कसा होता. कोस्टल रोडपासून मेट्रोपर्यंतची कामे रोखली. अनेक कामे रोखली. त्यामुळे विकास झाला नाही. आता मात्र विकास होत आहे. आम्ही हा विकास अधिक करत आहोत असाही दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला आहे.
इंडस्ट्री वेगळ्या राज्यात जात आहे हा आरोप तथ्याशिवाय आणि कोणत्याही प्रकारचा अभ्यास न करता होत आहे. आता मी दावोसमध्ये होतो. सहा राज्य होते. एकाही राज्याला एक लाख कोटीचीही गुंतवणूक आणता आली नाही. आम्ही १६ लाख कोटींची गुंतवणूक आणली. २०२३, २०२४ आणि २०२५मध्ये प्रत्येकवर्षी एफडीआयमध्ये महाराष्ट्र नंबरवन आहे. आजही एफडीआयचे थर्ड क्वॉर्टर रिझल्ट आले आहेत. महाराष्ट्रही नंबरवन आहे. दोन नंबरचं जे राज्य आहे, त्याच्या पेक्षा तीनपट गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. देशात १० राज्य स्पर्धा करतात. त्यामुळे प्रत्येक प्रोजेक्ट महाराष्ट्रात येईलच असं नाही. पण याचा अर्थ महाराष्ट्र मागे गेला आहे, असं नाही. आपण नंबर वन आहोत. नंबर वन असू असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था चांगली आहे. त्यामुळे कंपन्या येत आहे. काही अपघात होतात. पण त्यावर आमची झिरो टॉलरन्स पॉलिसी आहे. त्यामुळे कंपन्यांना आमच्यावर विश्वास आहे. कोका कोलाच्या सीईओशी चर्चा झाली. त्यांनी आमचे आभार मानले. काही लोकांनी कोका कोलाच्या प्लांटमध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. त्याला आम्ही दंड केला. आता उद्योगांमध्ये जो कोणी अडथळा आणेल तर त्याला आम्ही थोडा जरी गुन्ह्याचा इतिहास असणाऱ्याला मोका लावणार आहोत अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.