बीड : जिल्ह्यातील परळी येथील वैद्यनाथ मंदिर आरडीएक्सने उडवून देण्याची धमकी आलीय. या धमकीमुळे येथे एकच खळबळ उडाली आहे. नांदेडहून हे पत्र आल्याचे सांगण्यात येत असून या मंदिरातील पोलीस बंदोबस्त तत्काळ वाढवण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार परळी येथील वैद्यनाथ मंदिर आरडीएक्सने उडवून देण्याची धमकी देण्यात आलीय. हे पत्र नांदेडून आले आहे. या पत्रामुळे येथे एकच खळबळ उडाली आहे. धमकी नेमकी कोणी दिली याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, 50 लाख रुपये द्या अन्यथा मंदिर उडवू असं, या पत्रात सांगण्यात आलंय. या धमकीमुळे मंदिर प्रशासन चांगलेच धास्तावले आहे.
दरम्यान, याबाबत परळी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच धमकीचे पत्र आल्यानंतर मंदिर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
इतर बातम्या:
MPSC Chairman | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी किशोर राजे-निंबाळकर यांची नियुक्ती