प्रवाशी असलेल्या बसवर दगडफेक, अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल, बसचे नुकसान

| Updated on: Jan 14, 2022 | 6:21 PM

अकोला जिल्ह्यातून आज एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अकोला आगाराची बस MH40 - 5808 वर  अज्ञात व्यक्तींकडून दगडफेक करण्यात आली. या घटनेमध्ये प्रवाशी थोडक्यात बचावले आहेत. अकोला आगाराची ही बस बाळापूरमार्गे शेगावला निघाली होती.

प्रवाशी असलेल्या बसवर दगडफेक, अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल, बसचे नुकसान
Follow us on

अकोला : अकोला जिल्ह्यातून आज एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अकोला आगाराची बस MH40 – 5808 वर  अज्ञात व्यक्तींकडून दगडफेक करण्यात आली (Throwing stones at bus). या घटनेमध्ये प्रवाशी थोडक्यात बचावले आहेत. अकोला (akola) आगाराची ही बस बाळापूरमार्गे शेगावला (shegon) निघाली होती. ही बस राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील शेदळ फाट्याजवळ आली असताना अचानक मागून आलेल्या दोन दुचाकीस्वारांनी बसवर दगडफेक केली. या दगडफेकीमध्ये ड्रायव्हर साईटची बसची काच फुटली आहे. दरम्यान अचानक झालेल्या या दगडफेकीमुळे चालक, वाहक गोंधळून गेले. तसेच प्रवाशांमध्ये देखील भीतीचे वातावरण होते. त्यानंतर ही बस बाळापूर पोलीस स्टेशनमध्ये आणून अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान दगडफेक करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संबंधित हल्लेखोरांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. यापूर्वी देखील अशा अनेक घटना घडल्या आहेत.

फरार दुचाकीस्वारांचा शोध सुरू

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, बस क्रमांक MH40 – 5808 ही अकोल्याहून बाळापूरमार्गे शेगावला निघाली होती. परंतु वाटेतच शेदळ फाटा परिसरात मागून आलेल्या दोन अज्ञात दुचाकीस्वारांनी बसवर दगडफेक केली. या दगडफेकीमध्ये बसचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. बसच्या समोरील काच फुटली आहे. या प्रकारानंतर बसचालक मोहन राऊत आणि कंडक्टर आर. आर. आळे यांनी संबंधित बस ही बाळापूर पोलीस ठाण्यात आणली, त्यानंतर अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता पोलिसांकडून दगडफेक करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेण्यात येत आहे.

बसमधील प्रवासी सुखरूप

दरम्यान या बसमध्ये आठ ते नऊ प्रवासी होते. या दगडफेकीमध्ये जर एखादा दगड प्रवाशांना लागला असता, तर मोठा अनर्थ झाला असता. मात्र सुदैवाने सर्व प्रवासी हे सुखरूप आहेत. अचानक दगडफेक झाल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. गेल्या दोन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरूच आहे. एसटी सेवा ठप्प आहे. काही ठिकाणी बस पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र काही जणांकडून याला विरोध होत असल्याचे पहायला मिळत आहे.

संबंधित बातम्या

निवडणुकीचे तिकीट न मिळाल्याने बसपा नेत्याला रडू कोसळले, ६७ लाख रूपये देऊनही उमेदवार न दिल्याचा आरोप

Chandrapur Crime: चंद्रपूरमध्ये चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीसह मुलीला चाकूने भोसकले; आरोपी पतीला पोलिसांकडून अटक

VIDEO: राऊत नशिबाने प्रसिद्धी झोतात आले, माझ्या दृष्टीपेक्षा शिवसेना संपत चाललीय त्याची चिंता करा: चंद्रकांत पाटील