Chandrapur | चंद्रपुरात पहाटेच्या सुमारास वाघोबाचे दर्शन, Video Viral
चंद्रपुरात (Chandrapur) पहाटेच्या सुमारास वाघोबाचे (Tiger) दर्शन झाले आहे. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या नागपूर (Nagpur) मार्गावरील प्रवेशद्वारावर वाघाचा मुक्त संचार बघायला मिळाला आहे.
चंद्रपुरात (Chandrapur) पहाटेच्या सुमारास वाघोबाचे (Tiger) दर्शन झाले आहे. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या नागपूर (Nagpur) मार्गावरील प्रवेशद्वारावर वाघाचा मुक्त संचार बघायला मिळाला आहे. या भागात कार्यरत कामगारांना वाघाचे दर्शन झाले. या प्रवेशद्वारातून थेट वसाहत आणि कोळसा हाताळणी यंत्राकडे मार्ग जातो. वीज केंद्राच्या परिसरात वाघासह अन्य वन्यजीव कामगारांसाठी धोकादायक ठरत आहेत. या समस्येवर वनविभाग आणि वीज केंद्र व्यवस्थापन यांनी संयुक्तरित्या उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. या परिसरात वाघाचे दर्शन सातत्याने होत आहे. अशावेळी एकादा अपघात घडू शकतो, अशी शक्यता आहे. कामगार आणि स्थानिकांनी वनविभागाला विनंती केली आहे, की या वाघाचा तत्काळ बंदोबस्त करावा. अन्यथा एखाद्याचा जीवही जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Latest Videos