ठाणे: ठाण्यात उद्या बुधवार 9 ते 12 जूनपर्यंत अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे ठाण्यात पाणी तुंबू नये म्हणून पालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी आज शहरातील नालेसफाईच्या कमाची पाहणी केली. विशेष म्हणजे ठाण्यात धोधो पाऊस पडत असतानाही सलग दुसऱ्या दिवशी शर्मा यांनी भरपावसात नालेसफाईच्या कामांची पाहणी केली. (tmc commissioner vipin sharma inspects nullah-cleaning work)
पालिका आयुक्त विपिन शर्मा यांचा पाहणी दौरा आज सकाळी 11.00 वाजता वंदना बस डेपो येथून सुरू झाला. आयुक्तांनी नालेसफाई तसेच रस्ते दुरुस्ती कामाचीही पाहणी केली. यावेळी राष्ट्रवादी पक्ष गटनेते नजीब मुल्ला, क्रीडा व सांस्कृतिक कार्य सभापती प्रियांका पाटील, उथळसर प्रभाग समिती अध्यक्षा वहिदा खान, कळवा प्रभाग समिती अध्यक्षा वर्षा मोरे, नगरसेवक संजय वाघुले, सुधीर कोकाटे, सुहास देसाई, उमेश पाटील, गणेश कांबळे, नगरसेविका प्रतिभा मढवी, नम्रता कोळी, अंकिता शिंदे, प्रमिला केणी, अपर्णा साळवी, अनिता गौरी, पूजा करसुळे, विजया लासे, मंगल कळंबे, आरती गायकवाड, अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, उप आयुक्त संदीप माळवी, अशोक बुरपल्ले, मनीष जोशी, नगर अभियंता रवींद्र खडताळे, अतिरिक्त नगर अभियंता अर्जुन अहिरे, वैद्यकीय अधिकारी बालाजी हळदेकर तसेच इतर महापालिका अधिकारी उपस्थित होते.
शर्मा यांनी वंदना बस डेपो, शिवप्रसाद, आंबेडकरनगर, एम. एच. हायस्कूल, सिडको क्रीक रोड, सरस्वती स्कूल राबोडी, साकेत नाला, सह्याद्री नाला, दत्तवाडी तसेच शनिमंदिर, साईनाथनगर आदी नाल्यांची पाहणी केली. आवश्यक त्या ठिकाणी नाल्याची रुंदी वाढविणे, खोली वाढविणे, खाडीच्या मुखाजवळ नाले रुंद करणे तसेच कचरा व सुकलेला गाळ त्वरित उचलण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागास दिल्या. आयुक्तांची नालेसफाईची पाहणी सुरू असतानाच पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे हातात छत्री घेऊन आयुक्तांनी पाहणी दौरा सुरूच ठेवला. आयुक्तच भरपावसात नालेसफाईची पाहणी करत असल्याचे पाहून नगरसेवक आणि अधिकाऱ्यांनीही भरपावसात नालेसफाईची पाहणी केली.
उद्या 9 जून ते 12 जून या काळात अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या काळात नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन महापालिका आयुक्तांनी केले आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेच्यावतीने आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत. तसेच सद्यस्थितीत कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने ठाणे शहर लेव्हल 2 मध्ये आले आहे. तरी देखील नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. (tmc commissioner vipin sharma inspects nullah-cleaning work)
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 8 June 2021 https://t.co/hpiJQx5FRw #News #bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 8, 2021
संबंधित बातम्या:
Vasai Virar | वसई विरारचा लेव्हल 3 मध्ये समावेश, काय सुरू काय बंद? वाचा…
कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे फेक रिपोर्ट्स देऊन उपचारांचं ढोंग, रुग्णालयासह लॅबवर गुन्हा दाखल