किरीट सोमय्यांविरोधात सिव्हिल आणि क्रिमिनल याचिका दाखल करणार : अतुल लोंढे

| Updated on: Nov 03, 2021 | 10:17 PM

किरीट सोमय्या यांनी एका खासगी वृत्तवाहिनीवर बोलताना वसुलीच्या पैशातील 40 टक्के शिवसेना, 40 टक्के राष्ट्रवादी काँग्रेस आणि 20 टक्के काँग्रेसला मिळतो, असा धादांत खोटा आरोप करून काँग्रेस पक्षाची बदनामी केली आहे.

किरीट सोमय्यांविरोधात सिव्हिल आणि क्रिमिनल याचिका दाखल करणार : अतुल लोंढे
congress
Follow us on

नागपूर : भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या हे वारंवार काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना नेत्यांच्याविरोधात गरळ ओकत असतात. बिनबुडाचे आरोप करून नाहक बदनामी करत असतात. सोमय्या यांच्या बेताल आणि बिनबुडाच्या वक्तव्याप्रकरणी आता त्यांच्याविरोधात कोर्टात सिव्हिल आणि क्रिमिनल याचिका दाखल करणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिली.

धादांत खोटा आरोप करून काँग्रेस पक्षाची बदनामी केली

पत्रकारांशी बोलताना अतुल लोंढे म्हणाले की, किरीट सोमय्या यांनी एका खासगी वृत्तवाहिनीवर बोलताना वसुलीच्या पैशातील 40 टक्के शिवसेना, 40 टक्के राष्ट्रवादी काँग्रेस आणि 20 टक्के काँग्रेसला मिळतो, असा धादांत खोटा आरोप करून काँग्रेस पक्षाची बदनामी केली आहे. सोमय्या यांच्या या बेताल, बिनबुडाच्या आरोपाविरोधात आता त्यांच्या विरोधात कोर्टात तक्रार दाखल करणार असून दोन कवडीचा दावा दाखल करता येत नाही म्हणून 1 रुपयाचा दावा दाखल करणार आहे.

एक रुपयाचा दावा दाखल करणार

सतत खोट्या आरोपांची राळ उडवून महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेत्यांना बदनाम करण्याचे काम सोमय्या करत आहेत. स्वतःच तपास अधिकारी व स्वतःच न्यायाधीश असल्याच्या आविर्भात त्यांची असंबंध बडबड सुरू असते. त्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या असून, या बेताल बडबडण्याला चाप बसला पाहिजे म्हणून दीडदमडीच्या सोमय्यांची जेवढी लायकी आहे, तेवढ्याच किमतीचा म्हणजे एक रुपयाचा दावा दाखल करणार आहे, असेही लोंढे म्हणाले.

माफी मागावी अन्यथा मानहानीचा दावा

किरीट सोमय्या यांच्याविरोधात फौजदारी आणि दिवाणी बदनामे करणारे गुन्हे दाखल करण्याची मागणी लोंढे हे न्यायालयात करणार आहेत. काल टीव्ही डिबेटमध्ये किरीट सोमय्या यांनी राज्य सरकारवर सुलीचा आरोप केला होता. केलेल्या आरोपाचे किरीट सोमय्या यांनी पुरावे द्यावे अन्यथा माफी मागावी असेही लोंढे म्हणाले. या संदर्भातील पुरावा व्हीडिओ पुरावा पोलीस आयुक्तांना दिल्याचं त्यांनी सांगितले. काँग्नेसनं ॲड. सतीश उके यांची वकील म्हणून नेमणूक केली आहे. सोमय्यांविरोधात न्यायालयात जाणार असून मानहानीचा दावा करणार करणार असल्याचं ते म्हणाले.

भाजपचा खोटेपणा लोकांसमोर आणायचाय

किरीट सोमय्या हे खोटे बोलतात, हे आम्हाला जनतेसमोर आणायचे आहे. भाजपचा खोटेपणा लोकांसमोर आणायचा आहे, असा दावा अतुल लोंढे यांनी केला. सोमय्यांविरोधात एक रुपयाचा मानहानीचा दावा नागपूरच्या न्यायालयात दाखल करण्यात येणार आहे. महाराष्ट्राच्या जनतेची सोमय्या यांना माफी मागावी लागणार असल्याचंही लोंढे यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या

ड्रग्ज प्रकरणाचा मास्टरमाइंड समीर वानखेडेच, अटक करून चौकशी करा; काँग्रेसची जोरदार मागणी

परमबीर सिंग गायब, ईडीकडून अनिल देशमुखांना अटक, कितीही प्रयत्न करा, मविआ सरकार पडणार नाही : नाना पटोले