राज्यात दिवसभरात आढळून येणाऱ्या कोरोनाचा रुग्णांची (Corona Patients) संख्या मागील काही दिवसांपासून 40 हजाराच्या पुढेच आहे. आजही राज्यात 42 हजार 462 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 23 कोरोना रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू (Corona Death) झाला आहे. दिवसभरात 39 हजार 646 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. . तर राज्यातील ओमिक्रॉनबाधितांचा दिवसभरातील आकडा 125 इतका आहे. त्यामुळे कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गडद होताना दिसतंय. गेल्या दोन तीन दिवसांपासून मुंबईकरांना मात्र थोडासा दिलासा मिळाला आहे. कारण मुंबईतली कोरोना रुग्णसंख्या मागच्या आठवड्यात 20 हजारांच्या पुढे गेली होती, त्यामुळे मुंबईकरांना धडकी भरली होती, मुंबई पुन्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आली होती, मात्र मागील दोन तीन दिवसांपासून मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा घटत असल्याचे दिसून येत आहे. आज दिवसभरात मुंबईत 10 हजरा 661 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर मुंबईत दिवसभरात 11 कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
#CoronavirusUpdates
15th January, 6:00pmPositive Pts. (24 hrs) – 10661
Discharged Pts. (24 hrs) – 21474Total Recovered Pts. – 8,99,358
Overall Recovery Rate – 91%
Total Active Pts. – 73518
Doubling Rate – 43 Days
Growth Rate (8 Jan – 14Jan)- 1.56%#NaToCorona
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) January 15, 2022
निर्बंध आणखी कडक होणार?
राज्यात सध्या कोरोना वाढत आहे. नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. कोरोना नियमांचे उल्लंघन झाल्यास संसर्ग मोठ्याप्रमाणात वाढू शकतो. राज्यात कोरोना आणि ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. राज्य सरकारने जी नियमावली जाहीर केली आहे, त्यामध्ये कोणताही बदल होणार नसल्याचे पवार यांनी म्हटले. तसेच जे नागरिक कोरोना नियमांचे उल्लंघ करतील त्यांच्यावर देखील कडक कारवाईचा इशारा यावेळी पवार यांनी दिला आहे.
परीक्षांबाबत काय निर्णय?
राज्यात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील विविध भागांमध्ये शाळा बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला. कोरोनाचा वाढता संसर्ग पहाता दहावी बारावीच्या परीक्षा होणार का? परीक्षा झाल्यास त्या ऑनलाईन होणार की ऑफलाईन असे अनेक प्रश्न आता विद्यार्थ्यांसोबतच पालकांना देखील पडले आहे. यावर आता खुद्द अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. परीक्षेसंदर्भात बोलताना अजित पवार म्हणाले की, दाहवी आणि बारावीच्या परीक्षा या व्हायलाच हव्यात, तसेच त्या ऑनलाईन घेऊन चालणार नाही. त्या ऑफलाईनच व्हायला हव्यात असे माझे मत असल्याचे पवार यांनी म्हटले आहे. गेल्या वर्षी काय निकाल लागला हे सर्वांनीच पाहिले. त्यामुळे गेल्या वर्षीची पुनावृत्ती टाळायची असेल तर परीक्षा या ऑफलाईनच घेतल्या जाव्यात असे अजित पवार यांनी म्हटले आहे.