आजच आम्हाला दसऱ्याचा उत्सव साजरा करण्याचं भाग्य लाभलं, असं का म्हणाले छगन भुजबळ

| Updated on: Oct 11, 2024 | 7:01 PM

अभिनेते सयाजी शिंदे यांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. यावेळी पक्षाचे नेते अजित पवार यांनी त्यांचं पक्षात स्वागत केले. यावेळी बोलतान छगन भुजबळ म्हणाले की, आजच आम्हाला दसरा साजरा करण्याचं भाग्य लाभलं आहे.

आजच आम्हाला दसऱ्याचा उत्सव साजरा करण्याचं भाग्य लाभलं, असं का म्हणाले छगन भुजबळ
Follow us on

अभिनेते सयाजी शिंदे यांनी आज राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला. सयाजी शिंदे यांच्या पक्षप्रवेशावेळी पक्षाचे मोठे नेते उपस्थित होते. सयाजी शिंदे खडतर परिस्थितून पुढे आले आहेत. त्यांनी सिनेक्षेत्रात अद्वितीय स्थान निर्माण केलं आहे. मराठी मनाला अभिमान वाटावं असं काम आहे. त्यांनी आपल्याला सीमित ठेवलं नाही. त्यांनी पर्यावरणावर चांगलं काम केलं आहे. असं त्यांचं पक्षात स्वागत करताना सुनील तटकरे म्हणाले.

छगन भुजबळ यांनी म्हटले की, ‘उद्या दसरा आहे. आजच आम्हाला दसऱ्याचा उत्सव साजरा करण्याचं भाग्य लाभलं आहे. नाव जरी मराठी असलं तरी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर अभिनयाचा ठसा उमटवला आहे. ते अभिनेते आहेतच. पण आता ते नेते होणार आहेत. कारण सामाजिक कामातही त्यांनी तेवढंच मोठं काम केलं आहे. दक्षिण भारतातही काम केलं आहे. लोकांचं मनोरंजन केलंच. पण लोकांच्या दुखाला हात घालून ते दुख कमी करण्याचं काम त्यांनी केलं. ते सीनिअर आर्टिस्ट आहेत. त्यांची ओळख करून देण्याची गरज नाही. मराठी माणूस असूनही त्यांनी पहिल्यांदा झेंडा रोवला तो दाक्षिणात्य सिनेमापासून. मला त्यांचं मोठं आश्चर्य वाटतं.’

‘रजनीकांत आणि सयाजी यांना त्यांची भाषा कशी समजते, ते कसं काम करतात हे मला कळत नाही. रजनीकांत यांचं आडनाव गायकवाड. ते टॉलिवूडचे देवच झाले आहेत. भाषा बोलणं सोपं आहे. पण सिनेमात बोलणं, एक्सप्रेशन देणं हे कठिण काम आहे. त्यांनी कठिण गोष्टी केल्या. आता राजकारणात त्यांना कठिणाई वाटणार नाही. तुमचा चेहरा मराठी माणसाला माहीत आहे. सिनेमा, टीव्हीच्या माध्यमातून माहीत आहे. एखाद्याला नेता करताना कष्ट लागतात. पण तुम्हाला नेता करण्यासाठी कष्ट घ्यावी लागणार नाहीत.’

‘सयाजी शिंदे यांच्यासारखी मंडळी अनुभवी आहे. राजकारणआातील घडामोडी त्यांना माहीत आहे. ते आमच्याकडे साथ देण्यासाठी आले ही अभिमानाची गोष्ट आहे. सयाजी शिंदे यांचा प्रवेश ही अजितदादांच्या कामाला मिळालेली पावती आहे. आम्ही तुमचा पूर्ण मानसन्मान राखू.’ असं ही ते म्हणाले.