वर्धा – वर्धा येथे समृद्धी महामार्गावर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी स्वतः कार चालवत पाहणी केली. या कामाची पाहणी करण्यासाठी शिंदे वर्धा (Vardha)येथे आले होते. नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा हा मे महिन्यात सुरू होणार आहे. दुसरा टप्पा हा डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण केला जाणार आहे. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून ईडी, सीबीआय (CBI) चौकशीचे फेरे सुरू आहेत. पण त्याच्यामध्ये सरकारला काही अडचण होणार नाही. सरकार पूर्णपणे उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वात काम करतंय. कोविड, निसर्ग वादळ, चक्रीवादळ सारखे संकट आले तरी सुध्दा विकासाची गती कुठे थांबू दिली नाहीय असंही ते म्हणाले. शिर्डी समोर मोठ्या प्रमाणात डोंगर असल्याने महामार्गाच्या कामाला वेळ लागतोय, अशी कबुलीही शिंदे यांनी दिली आहे.
समृद्धी महामार्गाच्या केवळ एक्सिट पॉईंटवरच टोल नाके राहणार
महामार्गाचं काम अतिशय उत्कृष्ट झालंय. 120 च्या गतीने वाहन चालवून सुद्धा 60 ते 70 च्या गतीने वाहन चालवत असल्याचं वाटत होतं. सध्या रस्ता इको फ्रेंडली केल्या जातं असून साडेअकरा लाख झाड लावले जातं आहेत. हा महामार्ग अतिशय पर्यावरण पूरक असा महामार्ग आहे. अडीचशे मेगाव्हाट सोलरवर इलेक्ट्रिक सुद्धा येथे जनरेटर केली जाणार आहे. महामार्ग ज्या ठिकाणावरून जातं आहे तेथील वनसंपदाचे जतन करण्याचं काम सुद्धा या ठिकाणी करण्यात आलं असून जळापास 76 अंडरपास आणि 8 ओव्हरपास बनविण्यात आले आहेत. समृद्धी महामार्गाच्या केवळ एक्सिट पॉईंटवरच टोल नाके राहणार आहे, जेणेकरून यात्रेकरूंचा वेळ वाया जाणार नाही.
वर्ध्यात समृद्धी महामार्गाचे 58 किलोमीटरचं काम पूर्ण
वर्ध्यात समृद्धी महामार्गाचे 58 किलोमीटरचं काम पूर्ण झालं. महामार्गाची लांबी 58 किमी, तर रुंदी 120 मीटर आहे. हा मार्ग सहापदरी आहे. 2 हजार 762 कोटींचा महामार्गावर खर्च झाला. समृद्धी महामार्गाकरिता वर्धा जिल्ह्यातील तीन तालुक्यांतील 782 हेक्टर जमिनीचे अधिग्रहण करण्यात आली. समृद्धी महामार्गामुळे नागरिक मुंबई व नागपूर या महानगरांना जोडला जाणार आहे. वर्ध्यातील सेलू, वर्धा व आर्वी या तीन तालुक्यांतील 34 गावांमधून हा महामार्ग गेला. जिल्ह्यातून गेलेल्या या समृद्धी महामार्गाची लांबी 58 किमी, तर रुंदी 120 मीटर असून, सहापदरी हा मार्ग आहे. 5 मोठ्या आणि 27 लहान पुलांसह विनाअडथळा वाहतूक होण्याकरिता 9 उड्डाणपूल तयार करण्यात आलेत. 34 भुयारी मार्ग निर्माण करण्यात आलेत. पादचाऱ्यांकरिता 12 भुयारी मार्गांचा समावेश आहे. येळाकेळी व विरुळ येथे इंटरचेंजेसही देण्यात आले. महामार्गाच्या वाहनांमुळे वन्यप्राणी विचलित होऊ नये, यासाठी दोन ठिकाणी उन्नत मार्ग राहणार आहेत, अशी माहितीही शिंदे यांनी दिली.