नवी दिल्ली : टोमॅटोचे भाव सध्या गगनाला भिडले आहेत. मुंबईत पावकिलो टोमॅटोचा भाव 40 रुपये आहे. देशाच्या वेगवेगळ्या भागात किलोमागे टोमॅटोचा भाव 120 ते 150 रुपये आहे. दोन महिन्यांपूर्वी टोमॅटोच्या किंमती घसरल्या होत्या. अत्यंत नगण्य असा दर झाला होता. टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना लागवडीचे पैसेही मिळत नव्हते. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात शेतकऱ्यांनी नाईलाजान अनेक क्विंटल टोमॅटो रस्त्यावर फेकून दिला होता. कारण व्यापारी शेतकऱ्यांकडून 2 ते 3 रुपये किलोने टोमॅटो विकत घेत होते.
महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात कांदा आणि टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना ट्रान्सपोर्ट् भाडं आणि लेबर चार्ज जोडून स्वत:च्या खिशातून व्यापाऱ्यांना पैसे द्यावे लागले होते. आता टोमॅटो आणि केळीचे दर वाढले आहेत. दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये एक किलो टोमॅटोचा भाव 120 ते 160 रुपये किलो आहे.
शेतकऱ्यांना काय फायदा होतोय?
मार्केटमध्ये टोमॅटो इतक्या महागड्या किंमतीला ग्राहकांना विकत घ्यावा लागतोय. पण त्याचा फायदा टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना मिळतोय का? कि, मधल्यामध्ये मध्यस्थ या महागाईचा फायदा उचलतायत. “भाज्या महागल्यामुळे सर्वसामान्य जनता हैराण आहे. पण त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना मिळत नाहीय” असलं MSP कमिटीचे सदस्य विनोद आनंद यांनी सांगितलं.
कोणाचे खिसे भरले जातायत?
राजधानी दिल्लीसह देशाच्या वेगवेगळ्या बाजारपेठांमध्ये भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. याचा फायदा शेतकऱ्यांऐवजी मध्यस्थ उचलतायत. “बाजारात भाज्या चढ्या किंमतीला विकतल्या जात आहेत, पण त्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळत नाहीय. देशाच्या सगळ्याच भागात मध्यस्थाचे खिसे भरले जात आहेत. सोबत व्यापाऱ्यांचा फायदा सुद्धा होतोय” असं विनोद आनंद यांनी सांगितलं.
व्यापारी शेतकऱ्यांकडून किती रुपये किलोने टोमॅटो विकत घेतायत?
शेतकरी सुरुवातीलाच आपलं पीक विकतात. टोमॅटो अशी वस्तू आहे, जी एक आठवडा सुद्धा स्टोर करुन ठेवता येऊ शकत नाही. दिल्ली-एनसीआरसह उत्तराखंड, महाराष्ट्र आणि कर्नाटक या भागात टोमॅटोची आवक होत आहे. या राज्यात शेतकऱ्यांकडून व्यापारी 20 ते 30 रुपये किलोने टोमॅटो विकत घेत आहेत. याच टोमॅटोचा ट्रान्सपोर्ट आणि लेबर चार्ज जोडून 120 ते 160 रुपये किलोने टोमॅटो विकला जात आहे.