कर्जत: ठाण्यासह रायगड जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे खालापूर-कर्जत परिसरातील तलाव, धरण आणि धबधब्यांवर जाण्यास पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. कर्जत, खालापूर तालुक्यातील एकूण 23 ठिकाणी पर्यटकांना मज्जाव करण्यात आल्याचं कर्जतच्या उपविभागीय अधिकारी वैशाली परदेशी यांनी सांगितलं. (tourist are not allowed in picnic spot in raigad district)
हवामान खात्याने 10 आणि 11 जून रोजी रायगड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी व वादळीवाऱ्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे खालापूर तालुक्यातील 12 व कर्जत तालुक्यातील 11 धबधबे, धरण, तलाव क्षेत्रात नागरिकांना प्रवेश बंदी जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती वैशाली परदेशी यांनी दिली.
खालापूर तालुक्यात झेनिथ धबधबा, आडोशी धबधबा परिसर, बोरगाव धबधबा, भिलवले धरण, आडोशी पाझर तलाव, मोरबे धरण, नढाण वरोसे धरण, वावर्ले धरण, डोणवत धरण, माडप धबधबा, धामण कातरवाडी धरण, कलोते धरण आदी ठिकाणी जाण्यास पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे.
कर्जत तालुक्यातील आषाणे कोषाणे धबधबा, सोलनपाडा धरण/पाझर तलाव, पळसदरी धरण, कोढांणे धरण धबधबा, पाली भुतवली धरण, नेरळ जुम्मापट्टी धरण, बेडीसगाव धरण, पाषाणे तलाव, बेकरे धबधबा, आनंदवाडी धबधबा, टपालवाडी धबधबा आदी ठिकाणी प्रवेशास मज्जाव करण्यात आला आहे.
रायगड जिल्ह्यातील सर्व नद्यांची पातळी इशारा पातळी पेक्षा कमी आहे. कुडंलिका, आंबा, सावित्री, पाताळगंगा, उल्हास, गाढी या सहा मुख्य नद्या रायगडमध्ये आहेत. तसेच सावीत्री आणि कुडंलिका नदी अतिधोकादायक समजली जाते. त्यामुळे पावसाळ्यात या नदीपरिसराकडे न जाण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. (tourist are not allowed in picnic spot in raigad district)
VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7.30 AM | 10 June 2021https://t.co/SPrmCv1eJS
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 10, 2021
संबंधित बातम्या:
Mumbai Rain Update | मुंबई मुसळधार पाऊस, समुद्राला येणार भरती
Malad Building Collapsed | मुंबईतील मालाड भागात इमारत कोसळली, 11 जणांचा मृत्यू, 8 जण गंभीर
(tourist are not allowed in picnic spot in raigad district)