Eknath Shinde : चांदणी चौकातील वाहतूक कोंडीचे गाऱ्हाणे थेट मुख्यमंत्र्याजवळ, शिंदेकडून ‘ऑन दी स्पॉट सोल्युशन’

| Updated on: Aug 26, 2022 | 10:42 PM

चांदणी चौकातील वाहतूक कोंडी संदर्भात पुणे महापालिका आयुक्त, पिपंरी चिंचवड पोलिस आयुक्त, पुणे जिल्हाधिकारी, नॅशनल हायवे प्राधिकरण आणि राज्याचे मुख्य सचिव यांना शिंदे यांनी फोन करून प्रवाश्यांची समस्या दूर करण्यास सांगितले. त्यानुसार शनिवारी सकाळी 11.30 वाजता चांदणी चौकात संबंधित सर्व आस्थापनांचे वरिष्ठ अधिकारी येऊन पहाणी करणार आहेत

Eknath Shinde : चांदणी चौकातील वाहतूक कोंडीचे गाऱ्हाणे थेट मुख्यमंत्र्याजवळ, शिंदेकडून ऑन दी स्पॉट सोल्युशन
पुणे येथील चांदणी चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे .यांनी मार्गी लावला
Follow us on

पुणे : मुख्यमंत्री विराजमान झाल्यानंतरही (Eknath Shinde) एकनाथ शिंदे यांनी अनेक समस्या ह्या केवळ एका फोनद्वारे मार्गी लावल्या आहेत. त्यामुळे कामाबाबतची औपचारिकता आता संपुष्टात येऊ लागली आहे. असाच प्रकार (Pune) पुण्यातील चांदणी चौकात झाला. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सुरू असलेल्या फ्लायओव्हरच्या कामामुळे होणाऱ्या प्रचंड (Traffic Jam) वाहतूक कोंडी संदर्भात स्थानिक प्रवाश्यांनी थेट साताराला जात असताना वाटेतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधत गाऱ्हाणे मांडले. मुख्यमंत्र्यांनीही लागलीच संबंधित अधिकाऱ्यांना फोनवरुन संपर्क केला आणि उद्या सकाळी 11 वाजता येथील वाहतूक कोंडीचा आढावा घेण्यास सांगितले. एवढेच नाहीतर प्रवाशांचा प्रश्न मार्गी लावा असे आदेशही दिले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ऑन दी स्पॉट प्रवाशांच्या समस्या सोडवल्याने समाधान व्यक्त होत आहे.

नेमके कसा घडला प्रसंग?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साताऱ्याकडे निघाले होते. दरम्यान, पुण्यातील चांदणी चौकात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सुरू असलेल्या फ्लायओव्हरच्या कामामुळे होणाऱ्या प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. यावेळी उपस्थित प्रवाश्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधला आणि आपल्या समस्या मांडल्या. मुख्यमंत्री हे आपल्या मूळ गावी निघाले असतानाच त्यांनी चांदणी चौकातील वाहनधारकांच्या समस्या ऐकूण तर घेतल्याच पण त्यावर सोल्युशनही काढले.

फोनद्वारेच प्रश्न निकाली

चांदणी चौकातील वाहतूक कोंडी संदर्भात पुणे महापालिका आयुक्त, पिपंरी चिंचवड पोलिस आयुक्त, पुणे जिल्हाधिकारी, नॅशनल हायवे प्राधिकरण आणि राज्याचे मुख्य सचिव यांना शिंदे यांनी फोन करून प्रवाश्यांची समस्या दूर करण्यास सांगितले. त्यानुसार शनिवारी सकाळी 11.30 वाजता चांदणी चौकात संबंधित सर्व आस्थापनांचे वरिष्ठ अधिकारी येऊन पहाणी करणार आहेत. पहाणी करून झाल्यावर प्रवाश्यांना भेडसावत असलेल्या समस्या कशाप्रकारे सोडवता येतील याचा अहवाल तयार करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर केला जाणार आहे.

हे सुद्धा वाचा

प्रवाशांमध्येही समाधान

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आतापर्यंत अनेकवेळा फोनद्वारेच समस्या निकाली काढल्याचे व्हिडिओ अनेकवेळा व्हायरल झाले आहेत. अशाच प्रकारचा हा पुण्यातील किस्सा समोर येतोय. चांदणी चौकातील वाहतूक कोंडीचा सामना मुख्यमंत्र्यानाही करावा लागला होता. याच दरम्यान वाहतूक कोंडीची समस्या नेमकी काय आहे ही त्यांनी जाणून घेतली आणि त्यावर तोडगाही काढला आहे.