नाशिक जिल्ह्यात 650 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू

| Updated on: Nov 09, 2021 | 5:03 PM

नाशिक जिल्ह्यात मंगळवारी 650 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात निफाड येथील 116 रुग्णांचा समावेश आहे.

नाशिक जिल्ह्यात 650 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू
प्रातिनिधीक छायाचित्र
Follow us on

नाशिकः नाशिक जिल्ह्यात मंगळवारी 650 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात निफाड येथील 116 रुग्णांचा समावेश आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 4 लाख 1 हजार 959 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत साडेसहाशे रुग्णांवर उपचार सुरू आहे. उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये 44 ने घट झाली आहे. तसेच आत्तापर्यंत 8 हजार 686 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे. उपचार घेत असलेल्या पॉझिटिव्ह रुग्णात नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक 30, बागलाण 9, चांदवड 20, देवळा 22, दिंडोरी 19, इगतपुरी 8, कळवण 8, मालेगाव 4, नांदगाव 8, निफाड 116, पेठ 1, सिन्नर 95, सुरगाणा 1, त्र्यंबकेश्वर 4, येवला 33 अशा एकूण 378 रुग्णांचा समावेश आहे. नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 233, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात 8 तर जिल्ह्याबाहेरील 31 रुग्ण असून असे एकूण 650 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात 4 लाख 11 हजार 295 रुग्ण आढळून आले आहेत. जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीणमध्ये 97.10 टक्के, नाशिक शहरात 98.18 टक्के, मालेगावमध्ये 97/13 टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 97.42 टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण 97.73 इतके आहे.

लसीकरणाची गती वाढवणार

येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत 100 टक्के कोरोना लसीकरण करावे, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे आणि जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना दिले आहेत. त्यामुळे राज्यात विक्रमी लसीकरण करणाऱ्या नाशिक विभागात येत्या काळात या मोहिमेची गती अजून वाढणार आहे. त्याची सुरुवात आजपासून करण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यात एकही डोस न घेतलेले किती जण आहेत, दुसरा डोस किती जणांचा राहिला आहे याची माहिती गोळा करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. आज सोमवारपासून जिल्ह्यात तब्बल 474 केंद्रावर लसीकरण सुरू ठेवण्यात आले आहे.

लस घेण्यासाठी प्रोत्साहन

आदिवासी पाड्यावरील ग्रामस्थ, लस घेण्यासाठी टंगळमंगळ करणारे, दुसरा डोस घेण्यासाठी इच्छुक नसणाऱ्या व्यक्तींचे आशा कर्मचारी, नगरपालिका आणि महापालिका आरोग्य कर्मचारी प्रोत्साह वाढवून त्यांना लस घेण्यासाठी तयार करणार आहेत. नाशिक विभागात नाशिकसह अहमदनगर, जळगाव, धुळे आणि नंदुरबार हे जिल्हे येतात. त्यात अहमदनगर जिल्ह्यात 22 ऑक्टोबरपर्यंत एकूण 32 लाख 52 हजार 514 जणांचे लसीकरण करण्यात आले असून, यामध्ये 24 लाख 10 हजार 016 जणांनी पहिला डोस घेतला असून 08 लाख 42 हजार 498 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. (Treatment started on 650 corona patients in Nashik district)

इतर बातम्याः

बहुचर्चित कांदे-भुजबळ वादाची मुख्यमंत्र्यांकडून दखल; प्रशासकीय कागदपत्रे मागवली

साहित्य संमेलन गीतामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाचा स्पष्ट उल्लेख नाही; भूमिपुत्रालाच डावलल्याने नाराजीचे सूर