Nashik Accident | भीषण अपघात ट्रकचा चुराडा, Mumbai-Nashik महामार्गावरील भीषण दुर्घटना

Nashik Accident | भीषण अपघात ट्रकचा चुराडा, Mumbai-Nashik महामार्गावरील भीषण दुर्घटना

| Updated on: Feb 11, 2022 | 3:48 PM

मुंबई-नाशिक महामार्गावर (Mumbai Nashik highway) पिंपरी फाटा येथे ट्रकचे चाक पंक्चर झाले असताना ते काढताना उभ्या असलेल्या 2 ट्रकला मागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. यात दोघे जखमी झाले.

मुंबई-नाशिक महामार्गावर (Mumbai Nashik highway) पिंपरी फाटा येथे ट्रकचे चाक पंक्चर झाले असताना ते काढताना उभ्या असलेल्या 2 ट्रकला मागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. या धडकेत एक ट्रक रस्त्याचा बाजूला असलेल्या नालीत कोसळला यात 2 जण जखमी झाले आहेत. त्यांना महामार्ग वाहतूक पोलीस (Police) यांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत पुढील उपचारासाठी इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात (Hospiral) दाखल केले आहे. ट्रकचालक धडक देऊन पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दोन्ही ट्रक बाजूला करण्याचे काम सुरू असून वाहतूक सुरळीत सुरू आहे. या अपघातात धडक इतकी जोरदार होती, की ट्रकचा चुराडा झाला आहे. ट्रकमधील दोघेजण जखमीही झाले आहेत. दुसरीकडे बेदरकारपणे चालवणारा चालक मात्र या घटनेनंतर घटनास्थळावरून पसार झालाय.