तुळजाभवानी मंदिरात ‘या’ भविकांना नो एन्ट्री, संस्थानने काय केली नियमावली?

| Updated on: May 18, 2023 | 2:41 PM

tuljabhavani-temple : देशभरातील प्रसिद्ध मंदिरांमध्ये भाविकांसाठी नियमावली झाली आहे. आता तुळजाभवनी मंदिरात भाविकांसाठी नियमावली करण्यात आली आहे. नियमांचे पालन न करणाऱ्या भाविकांना नो एन्ट्री असणार आहे.

तुळजाभवानी मंदिरात या भविकांना नो एन्ट्री, संस्थानने काय केली नियमावली?
Image Credit source: tv9
Follow us on

संतोष जाधव, धाराशिव : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचे मंदिरासाठी नियमावली तयार केली आहे. मंदिर परिसरात यासंदर्भात फलक लावण्यात आला आहे. संस्थानच्या या निर्णयाचे अनेक जणांकडून स्वागत करण्यात आले आहे. नियमावलीचे पालन न करणाऱ्या लोकांना मंदिराच्या प्रवेशद्वारावर आडवण्यात आले. जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत मंदिर संस्थानच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यांची अंमलबजावणी गुरुवारपासून सुरु झाली.

काय आहे नियम

तुळजाभवानी मंदिरात अंगप्रदर्शन करणारे वेस्टर्न कपडे घालणाऱ्यांना नो एन्ट्री केली आहे. याबाबतचा निर्णय घेतल्यानंतर तुळजाभवानी मंदिर संस्थानने मंदिर परिसरात याबाबतचे फलक लावले आहेत. गुरुवारपासून त्याची अंमलबजावणी सुरु केली आहे. भाविकांना मंदिर प्रवेशदारावर अडवण्यात आले आहे. अंगप्रदर्शन, उत्तेजक, असभ्य, हाफ पॅन्ट, बर्मुडाधारकांना मंदिरात प्रवेश नाही. भारतीय संस्कृती व सभ्यत्याचे भाव ठेवण्याचे मंदीर संस्थांनने आवाहन केले आहे.

हे सुद्धा वाचा

tulja bhavani temple implement dress code rule

पुरुषांसाठी आहे नियम

कपडे परिधान करण्याचा नियम फक्त महिलांसाठी नाही. हा नियम पुरुषांसाठीसुद्धा आहे. ड्रेसकोडबाबत मंदिराने कडक नियम घालून दिले आहेत. गुरुवारी बरमुडावर आलेल्या अनेक मुलांना मंदिरात प्रवेश दिला गेला नाही. संस्थानच्या या निर्णयाचे मंदिरातील पुजारी आणि स्थानिक भाविकांनी स्वागत केले आहे.

बैठकीत घेतला निर्णय

18 मे रोजी मंदिर आणि मंदिर परिसरात जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संस्कृती संदर्भात बोर्ड लावले आहेत. यानिमित्ताने मंदिर संस्थानचे तहसीलदार तथा व्यवस्थापक प्रशासन सौदागर तांदळे व सहाय्यक व्यवस्थापक धार्मिक नागेश शितोळे यांचा सर्व पुजारी वर्गाने सत्कार करण्यात आला. यावेळी अधिकारी आणि कर्मचारी तसेच सुरक्षारक्षक उपस्थित होते.

  • मध्य प्रदेशातील गुना येथील जैन मंदिरात प्रवेशाचा नियम आहे. येथे पाश्चात्य कपडे परिधान करून कोणतीही महिला किंवा मुलगी प्रवेश करू शकत नाही. या मंदिराचे मूळ नाव श्री शांतिनाथ दिगंबर जैन अतिशय क्षेत्र आहे, जे १२३६ मध्ये बांधले गेले.
  • माँ कामाख्याचे मंदिरामध्ये ड्रेस कोडचा नियम आहे. विशेष बाब म्हणजे या मंदिरात मातेच्या पूजेसाठी कोणतीही मूर्ती स्थापित केलेली नाही, परंतु मंदिराच्या आवारात एक शिळा आहे ज्याची पूजा केली जाते. त्या ळेला काळभैरव असे म्हणतात.
  • केरळचे पद्मनाभस्वामी मंदिर देशभर प्रसिद्ध आहे. हे देशातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे. या ठिकाणी भगवान विष्णूची पहिली मूर्ती सापडल्याचे सांगितले जाते. असे म्हटले जाते की महिला येथे विष्णूची पूजा करू शकतात परंतु मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करू शकत नाहीत. महिलांसोबतच येथील पुरुषांनाही भारतीय ड्रेसमध्ये मंदिरात जावे लागते.