शरद पवारांचं बोट धरणार का?, छगन भुजबळ यांचं एका वाक्यात उत्तर; तीर कुठे लागला?

| Updated on: Jun 14, 2024 | 9:10 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी आज 'टीव्ही 9 मराठी'ला विशेष मुलाखत दिली. 'टीव्ही 9 मराठी'चे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी छगन भुजबळ यांची ही 'रोखठोक' मुलाखत घेतली. या मुलाखतीत भुजबळ यांनी अनेक प्रश्नांवर रोखठोकपणे उत्तरं दिली. विशेष म्हणजे आपण राज्यसभेवर जाण्यासाठी इच्छुक होतो हे भुजबळांनी मुलाखतीत स्पष्ट केलं.

शरद पवारांचं बोट धरणार का?, छगन भुजबळ यांचं एका वाक्यात उत्तर; तीर कुठे लागला?
छगन भुजबळ आणि शरद पवार यांचा फोटो
Follow us on

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची राज्यसभेवर जाण्याची इच्छा असताना त्यांना पक्षाकडून संधी मिळाली नाही. त्यामुळे छगन भुजबळ हे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. भुजबळ यांनी आज अखेर आपल्या नाराजीच्या चर्चेवर सविस्तर प्रतिक्रिया दिली. भुजबळ यांनी आज टीव्ही 9 मराठीला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी अनेक प्रश्नांवर भूमिका मांडली. या मुलाखतीत भुजबळांनी आपल्याला राज्यसभेवर जायची इच्छा होती, हे स्पष्ट केलं. पण पक्षाने आपल्या ऐवजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची निवड केली, असं छगन भुजबळ यांनी सांगितली. आपण ज्यांना शाखाप्रमुख केलं ते संसदेत निवडून गेले, केंद्रात मंत्री झाले. त्यामुळे 40 वर्ष विधानसभेत काम केल्यानंतर राज्यसभेवर जायची आपली इच्छा असल्याचं भुजबळांनी व्यक्त केलं. यावेळी भुजबळांना पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांचा बोट धरुन त्यांच्या नेतृत्वात काम करणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी मनमोकळेपणाने प्रतिक्रिया दिली.

छगन भुजबळ यांना यावेळी अजित पवार गटात येण्याचा निर्णय चुकला का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “तुम्हाला वाटत असेल. मला नाही वाटत. मी जे बोललो. ते मतपेटीने दाखवून दिलं”, अशी प्रतिक्रिया दिली. शरद पवार गटाकडे जाण्याचा दरवाजा उघडा ठेवलाय का? असा प्रश्न भुजबळांना विचारण्यात आला तेव्हा, “असं तुम्हाला वाटतं. हा तुमचा प्रचार आहे. या सर्वात मी नेहमी सत्याची बाजू घेत आलो आहे. मला जे वाटतं खरं आहे, तेच बोलतो. मला वाटलं की या प्रश्नाचं उत्तर अवघड आहे. तेव्हा सांगतो मला उत्तर नाही द्यायचं. असं काही नाही. ना माझी खिडकी उघडी आहे ना माझा दरवाजा उघडा आहे. ना कोणी माझ्यासाठी रेड कार्पेट टाकलं आहे, असं काही नाही. वस्तुस्थिती काय आहे हे लक्षात घेऊन पुढची पावलं टाकायची आहे. त्यातून काही धडा घ्यायचा आहे. पक्षाला आणि युतीला. ज्या त्रुटी आहे, त्या दूर करायच्या आहेत. मी आहे त्या पक्षात युतीसोबत राहणार”, असं स्पष्ट उत्तर दिलं.

उद्धव ठाकरेंची पाठराखण केली?

“घाटकोपरला होर्डिंग कोसळलं. १८ लोक ठार झालं. होर्डिंगवाल्यासोबत उद्धव ठाकरेंचा फोटो आहे, असं काही लोक बोलत असल्याचं मला सांगितलं. तेव्हा स्पॉन्टिनिअस उत्तर आलं. उद्धव ठाकरेंचा काय संबंध आहे? सरकार आमचं आहे. पालिका आमच्या ताब्यात आहे. उद्धव ठाकरेंचा संबंध कसा येतो. अडवाणींसोबत अनेकांचे फोटो. आमच्यासोबत अनेकांनी फोटो घेतले. मी बाजू घेतली नाही. मी सत्य मांडलं. या वयात मी काहीही कुणाची बाजू घेणार नाही. काय संबंध उद्धव ठाकरेंचा. ज्याची चूक त्याच्यावर बोला ना. मी खरं आहे. त्याची बाजू घेतली. उद्धव ठाकरेंमुळे होर्डिंग पडलं यावर लोक विश्वास कसा ठेवणार? मी जे बोललो तेच लोक बोलत आहे”, अशी भूमिका छगन भुजबळ यांनी मांडली.

“एवढ्या वर्षाचा अनुभव आहे. राजकारण कुणाच्या बाजूने आहे. सहानुभूती कुणाकडे आहे याचा एवढ्या वर्षात अंदाज येणारच ना. पवार आणि उद्धव ठाकरेंचे आमदार आणि खासदार आमच्याकडे आहेत. मग यांच्या सभा एवढ्या मोठ्या होतात कश्या. लोकं त्यांच्याकडे येतात कसे. याचा अर्थ कुठे तरी त्यांना सहानुभूती मिळते आहे असं मला वाटतं. तेच मी सांगितलं. सहानुभूतीचं परिवर्तन मतपेटीत होईल की नाही हे सांगता येत नाही. दुसऱ्यांच्या भूमिका काय आहेत. त्या गोष्टी माहीत नसतात. मला काही प्रश्न विचारले जातात. त्यावर मला जे सूचतं ते सांगतो. नाही तर मी उत्तर देत नाही”, असं भुजबळ म्हणाले.

“निकालातून सहानुभूती दिसली की नाही. मी जेव्हा बोललो तेव्हाच सावध होऊन जोमाने काम करणं आवश्यक आहे. उद्धव ठाकरे साईडलाईन झाले हे समजू नका. ते मैदानात आहेत. आपल्याला काम करावे लागेल. कार्यकर्त्यांना तयार करावा लागतं”, असं भुजबळ म्हणाले.