मालेगावात कॅनेडियन नागरिकाला मारहाण प्रकरणाची दखल कॅनेडियाच्या राजदुताकडून घेण्यात आली आहे. या प्रकरणी मालेगाव येथील किल्ला पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज अर्थात शंभूराजे यांची शनिवारी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने त्यांना अभिवादन केले जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांना अभिवादन करण्यासाठी तुळापूर येथे जाणार आहे. जळगाव जिल्ह्यात एकाच दिवशी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तब्बल 34 हजार 423 घरकुलांचे भूमिपूजन करण्यात आले. जळगाव जिल्ह्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 मध्ये सन 2024-25 या वर्षात एकूण 86,689 घरकुल मंजूर करण्यात आली होती. यासह महाराष्ट्र, देश-विदेश, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या बातम्यांचे अपडेट्स घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा.
मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यासाठी पोलीस प्रशासन अॅक्टिव्ह मोडवर
शिवाजी पार्क येथे पोलिसांची परेड
अपर पोलीस आयुक्त अनिल पारसकर, डीसीपी गणेश गावडे यांनी घेतला आढावा
शिवाजी पार्कवर लाखोच्या संख्येत येणार मनसैनिक
तुळजापूर ड्रग्ज प्रकरणांमध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांनी जातीने लक्ष घातले आहे, तुळजापूर ड्रग्ज प्रकरणांमध्ये योग्य ती कारवाई सुरू आहे, कोणीही राजकारण करू नये करू नये असे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वतः म्हटले आहे की काम सुरू करण्यास काहीच हरकत नाही असेही राणा जगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.
मुंबईच्या कफपरेड येथील Y.B chavan Centerमध्ये आयोजित संविधान गौरव सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि खासदार चंद्रकांत हांडोरे उपस्थित आहेत.
नुकताच मंत्री गिरीश महाजन अमळनेर शैक्षणिक घोटाळ्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘मागच्या काळात निश्चित घोळ झालेला आहे, हे उघड सुध्दा झालेल आहे. त्यांची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी त्या खात्याला दिले आहेत. त्यानंतर किती घोळ आहे समोर येईल. सखोल आणि कडक चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहे’ अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली आहे.
वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने धनंजय मुंडे यांना करुणा शर्मा यांना पोटगी देण्याचा आदेश दिला होता. यावर मुंडे यांनी उच्च न्यायालयात स्थगितीची याचिका दाखल केली. कोर्टात मुंडे यांच्या वकिलांनी लग्नाचा अभाव आणि करुणा शर्मा यांची आर्थिक क्षमता या मुद्द्यांवर युक्तीवाद केला. त्यानंतर अंजली दमानिया यांनी यावर प्रतिक्रिया दिली. ‘हा त्यांचा कौटुंबिक प्रश्न आहे, जर ते विवाहित असतील तर त्यांनी पुरावा द्यावा. जर पुरावे दिले तर धनंजय मुंडे यांची आमदारकी रद्द होईल’ असं त्या म्हणाल्या
पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या विकास आराखड्या अंतर्गत झालेल्या विकास कामांची चौखांबी, सोळखांबी यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली. फडणवीस यांच्यासमवेत आमदार अभिजीत पाटील, आमदार समाधान आवताडे, पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील, आमदार बाबासाहेब देशमुख उपस्थित होते.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात विद्यार्थिनींसमोर अश्लील कृत्य करणाऱ्या तरुणाला अखेर शिक्षा सुनावण्यात आली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अमोल शिंदे यांनी रविवारपर्यंत म्हणजे 30 मार्च 2025 पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अनिश वसंत गायकवाड असे पोलीस कोठडी सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी गायकवाड याने मंगळवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास विद्यापीठाच्या आवारात विद्यार्थिनींसमोर अश्लील कृत्य केल्याची घटना घडली होती.त्यावरून आता अखेर शिक्षा सुनावण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर बच्चू कडू उद्या पहिल्यांदाच राज्यभरातील प्रहार कार्यकर्त्यांची संवाद साधणार आहेत. बच्चू कडूंनी आयोजित केलेल्या प्रहारच्या मेळाव्याला राज्यभरातील प्रहारचे जिल्हाध्यक्ष, तालुकाप्रमुख शहर प्रमुख , महानगर प्रमुख व मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थितीत राहणार आहेत. बच्चू कडू कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात देखील बच्चू कडू कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार असल्याचं म्हटलं जात आहे.
बॉलिवूड सेलिब्रिटी टॅलेंट मॅनेजर दिशा सालियान मृत्यूप्रकरणात मोठी माहिती समोर येत आहे. मालवणी पोलिसांनी सादर केलेल्या क्लोजर रिपोर्टमध्ये दिशा सालियानच्या मृत्यूबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. दिशा जेव्हा 14 व्या मजल्यावरून पडली तेव्हा तिला जणांनी पडताना पाहिले. तसेच दिशाचा अंगावर कपडे असल्याची माहिती देखील समोर आली आहे.
पोटच्या अल्पवयीन मुलीं समोर नग्न होऊन नृत्य तसेच असतील वर्तन करत विनयभंग करणाऱ्या 41 वर्षे इतिहास न्यायालयाने नऊ महिने सप्त मंजुरी आणि वीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
तुळजापूर ड्रग्ज प्रकरणांमध्ये एसआयटीची नेमणूक करुण सखोल चौकशी करावी तसेच दोषी आरोपीवर मकोका लावावा अशी मागणी करण्यात येत आहे. महाविकास आघाडीचे तुळजापूर येथील शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याविषयीचे निवेदन देणार आहे.
जालना जिल्ह्यावर पाणी टंचाईच संकट ओढावले आहे. जिल्ह्यातील 64 प्रकल्पापैकी 2 प्रकल्प कोरडे ठाक पडले आहेत. इतर प्रकल्पात केवळ 28 टक्केच उपयुक्त पाणी साठा शिल्लक आहे.
अहिल्यानगर – मनमाड महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे.कोल्हार येथे वाहतूक कोंडी झाली आहे. आज शनी अमावस्येनिमीत्त शिर्डीहून शिंगणापूर जाणारे ट्रॅफिक जाममध्ये अडकले आहेत.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज धाराशिव जिल्हा दौऱ्यावर आहेत थोड्याच वेळात तुळजापूर मध्ये ते तुळजाभवानीच दर्शन घेणार आहेत दर्शन घेतल्यानंतर मंदिर संस्थांच्या कार्यालयामध्ये ते तुळजाभवानीच्या विकास आराखडा संदर्भात बैठक देखील घेणार आहेत.
छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुण्याच्या तुळापूर येथे छत्रपती संभाजी महाराज यांना शासकीय मानवंदना देण्यात येत आहे
तो अल कायद्याचा सदस्य आहे का? तो देशद्रोही, दहशतवादी, फुटिरतावादी आहे का? असा सवाल करत एकनाथ शिंदे यांना काही बोलू द्या, तो असं काही नाही असे ते म्हणाले. तो एक कलाकार आहे.. तो एक कवी आहे. आणि मी त्याला सांगितले आहे की आपण कायद्याला सामोरे जायला हवे, अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली.
धाराशिव- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज धाराशिव जिल्हा दौऱ्यावर असून थोड्याच वेळात तुळजापूरमध्ये ते तुळजाभवानीचं दर्शन घेणार आहेत, दर्शन घेतल्यानंतर मंदिर संस्थांच्या कार्यालयामध्ये ते तुळजाभवानीच्या विकास आराखडा संदर्भात बैठक देखील घेणार आहेत.
अनेक वर्षांनंतर उगमस्थानी गोदावरी नदी मोकळा श्वास घेणार आहे. त्र्यंबकेश्वर येथे बंदिस्त झालेली गोदावरी नदी आता मोकळा श्वास घेणार आहे. काही वर्षांपूर्वी नदीवर काँक्रिटीकरण केल्याने नदी बंदिस्त झाली होती. काँक्रीटीकरण करून नदीवर स्लॅब टाकल्याने कुशावर्तपासून नदी बंदिस्त झाली होती.
आता त्र्यंबकेश्वर शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीवरचे स्लॅब काढण्यात येणार आहेत. त्यामुळे पूर्वीप्रमाणे त्र्यंबकेश्वर शहरातून गोदावरी नदी वाहणार आहे. यापुढे नदी बाराही महिने वाहत राहणार. यासाठी एखाद्या धरणातून नदीमध्ये पाणी सोडण्याचे देखील नियोजन करण्यात येणार आहे. जलसंपदा आणि कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी ही मोठी घोषणा केली आहे.
छत्तीसगड- सुकमा जिल्ह्यात सुरक्षा दलाने मोठी कारवाई केली आहे. सुकमामध्ये नक्षलवाद्यांसोबत चकमक झाली आहे. या चकमकीत 16 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश मिळालं आहे. या चकमकीत 2 जवान जखमी झाल्याची माहिती समोर येथ आहे. मागच्या काही दिवसांतील ही मोठी कारवाई असल्याची माहिती आहे.
“शिंदेंच्या लोकांना कामरा शत्रू वाटतो म्हणून काही आम्ही बोलू नये का? आम्हालाही मोदी, शाह हे महाराष्ट्राचे शत्रू वाटतात. अजित पवारांना हे सगळं मान्य आहे असं दिसत नाही,” असं वक्तव्य संजय राऊतांनी केलंय.
धुळे एमआयडीसीमध्ये तीनशे किलो बनावट पनीर जप्त करण्यात आलं आहे. मुंबई आणि इंदूरला हे पनीर पाठवलं जात होतं. स्थानिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे. दररोज सुमारे दोन हजार किलो पनीर बनवला जात असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
जळगावात 19 वर्षीय तरुणाने खोटं नाव सांगून अल्पवयीन मुलीशी मैत्री केली.. तिच्यासोबत काढलेले आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिचा विनयभंग केला… याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाय तरुणाला अटक करण्यात आली असून त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे
अफगाणिस्तानात दुसऱ्यांदा जाणवले भूकंपाचे धक्के… पहाटे 5.16 मिनिटांनी जाणवले भूकंपाचे धक्के… भूकंपाची तीव्रता 4.7 रिक्टर स्केल
हिंसाचारानंतर जमावाने अनेक दुकानांची तोडफोड करत लावली आग… पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत 34 लोकांना केली अटक… तणाव वाढल्याचं लक्षात येताच प्रशासनाकडून इंटरनेट करण्यात आल बंद… पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात…
ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांचा पाडवा होणार गोड होणार आहे. कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगातील फरकाचा हप्ता मिळाला आहे. सातवा वेतन आयोग लागू झाल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात 12 ते 15 टक्के वाढ झाली आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना गेल्या सात वर्षातील वेतन फरकाची रक्कम देण्यास सुरुवात झाली आहे.
छत्रपती संभाजी महाराजांच्या 336 व्या बलिदान दिनानिमित्त सांगलीत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानकडून मुकपदयात्रा काढण्यात आली. सांगलीत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानकडून महिनाभर संभाजी महाराजांचा बलिदान मास पाळला जातो.
लोणावळ्यातील आयएनएस शिवाजी आणि नागफणी सुळका या परिसरात दोन बिबट्यांचा संचार दिसून आला आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भागात बिबट्याचा शोध घेण्यासाठी वन विभागाने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत.
मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयात कार्यरत असणाऱ्या 431 पोलीस अंमलदार, पोलीस शिपाई, पीएसआय यांना बढती मिळाली आहे. पोलीस आयुक्त मधुकर पांडये, अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उपायुक्त जयंत बजबळे यांच्या उपस्थितीत विरार च्या मांडवी पोलीस ठाण्यातील कार्यक्रमात बढती झालेल्या सर्व पोलीस आणि पोलीस अधिकारी यांचा सन्मान करण्यात आला आहे.