स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा फरार झाल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेने केलेल्या हंगामानंतर स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा रविवारी रात्री मुंबईतून पळून गेला. स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा पदुचेरीला गेल्याचे सांगण्यात येत आहे. रविवारी रात्री अंधेरीच्या एमआयडीसी पोलिस स्टेशन आणि खार पोलिस स्टेशनमध्ये त्याच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला. आणि आता पोलीस कुणाल कामराचा शोध घेत आहेत. नाशिक शहरवासीयांना उन्हाचा चटका, पारा ३७ अंशांवर गेला आहे. वातावरण कोरडे झाल्याने उन्हाची तीव्रता वाढली आहे. रविवारी किमान १६.४ तर कमाल ३७.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून तीन दिवसानंतर अचानक २ अंशाने तापमानात वाढलं आहे. नागपूर हिंसाचार प्रकरणी भाजप आमदार सुलभा गायकवाड आक्रमक झाल्या आहेत. कल्याणमध्ये शेकडो कार्यकर्त्यांसह निषेध मोर्चा, जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. “पोलीसांवर हल्ला म्हणजे दहशतवादाला साथ” – दंगेखोरांवर कठोर कारवाईची मागणी देखील त्यांनी केली. यासह देश-विदेश, राज्यातील, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घटनांचे अपडेट्स मिळवण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा.
नालासोपारामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, मुलीनं आपल्या सावत्र वडिलांवर प्राणघातक हल्ला केला आहे. दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली आहे. सावत्र वडील आपल्यासोबत अश्लिल कृत करत असल्याचा आरोप करत मुलीनं धारदार हत्यारानं प्राणघातक हल्ला केला आहे. या हल्ल्यामध्ये सावत्र वडील गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
स्टॅन्ड अप कॉमेडीयन कुणाल कामरा याचे सर्व CDR तपासले जाणार आहेत. तसेच बँक खात्याची देखील चौकशी केली जाणार असून त्याचा बोलविता धनी कोण आहे हे शोधले जाणार असल्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानपरिषदेत म्हटले आहे.
राष्ट्रीय महामार्गावर खड्डा खणून ठेवल्याने आंदोलनाचा इशारा दिला आहे. बांधकामाकडे बांधकाम कंपनीने दुर्लक्ष दिले आहे. आमगाव शहराच्या जवळच दोन महिन्यापासून खड्डा खोदला आहे. अनेकदा अपघात होऊनही बांधकाम कंपनी दुर्लक्ष करीत आहे. जनआंदोलन करण्याचा नागरिकांनी इशारा दिला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ठाणे की रिक्षा या गाण्यातून टीका करणाऱ्या स्टॅण्डअप कॉमेडिअन कुणाल कामरामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. कुणाल कामरा याने त्याच्या गाण्यातून एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक टीका केली. त्यावरून आता विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या विषयावरून संताप व्यक्त केला आहे. “आपण पण अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य मानणारे. उच्चपदस्थ लोकांवर बोलणं ही कामराची कार्यपद्धती आहे. कामराने शिंदेंवर अतिशय खालच्या पद्धतीने विनोद केला आहे. जनतेच्या मनात आदर असणाऱ्या व्यक्तीवर कामराने विनोद केला. कामरा महाराष्ट्राच्या जनतेपेक्षा मोठा आहे का? कामराने संविधान वाचलं असतं तर बरं झालं असतं. कुणालाही अपमानित करणं सहन केलं जाणार नाही. जी कडक कारवाई करता येईल ती करणारचं.” असं म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ठाणे की रिक्षा या गाण्यातून टीका करणाऱ्या स्टॅण्डअप कॉमेडिअन कुणाल कामरामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. कुणाल कामरा याने त्याच्या गाण्यातून एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक टीका केली. कामराच्या या गाण्यावरुन शिंदेचे शिवसैनिक संतापले असून त्यांनी कामराला धडा शिकवण्याची मागणी केली आहे.तसेच आता यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. “ज्यांनी गद्दारी केली त्यांना घरी पाठवण्याचं काम जनतेनं केलं आहे. आमच्यावर कोणतेही व्यंग करा. आम्हाला अडचण नाही. पण जाणूनबुजून अपमानित करण्याचा आणि मोठ्या नेत्यांना बदनाम करण्याचं काम करू नये. त्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. कामराने माफी मागितली पाहिजे.
“कुणाल कामरा कदाचित मातोश्रीवर लपला असेल. मुंबईत त्याच्यासाठी मातोश्री हे एकमेव सुरक्षित ठिकाण आहे,” अशी खोचक टीका संजय निरुपमने केली आहे.
नवी दिल्ली- नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडून विमान कंपन्यांना निर्देश देण्यात आले आहेत. प्रवाशांचे हक्क आणि नियमांच्या तरतुदीबाबत भर देण्याचे निर्देश दिले आहेत. प्रवाशांनी तिकीट बुक केल्यानंतर त्याची सर्व माहिती ही एसएमएस आणि व्हाट्सअपद्वारे पाठवण्याचे निर्देश आहेत.
विमान कंपन्यांना वेबसाईटवरही तिकिटांची माहिती उपलब्ध करून देण्यास सांगितलं आहे. प्रवाशांच्या तक्रारींबाबतही मंत्रालयाने त्वरित निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत.
“आमच्यावर कोणतेही व्यंग करा, आम्हाला अडचण नाही. पण जाणूनबुजून अपमानित करण्याचा आणि मोठ्या नेत्यांना बदनाम करण्याचं काम करू नये. त्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल,” अशा इशारा फडणवीसांनी दिला.
“तुम्ही कॉमेडी करा, व्यंग करा. पण अपमानित करण्याचं काम कोणी करत असेल तर ते सहन केलं जाणार नाही. कुणाल कामराने माफी मागितली पाहिजे,” असं फडणवीस म्हणाले.
“स्टँडअप कॉमेडी करण्याचा कुणालाही अधिकार आहे. पण स्वातंत्र्याचा स्वैराचार करण्याचा अधिकार नाही. कुणाल कामराला हे माहीत असायला पाहिजे. राज्यातील जनतेने २०२४ मध्ये कोण गद्दार आणि कोण खुद्दार हे दाखवून दिलं आहे. कुणाकडे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा गेला हे जनतेनं ठरवलं आहे,” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणाचा तपास गेवराईचे पोलीस उपाधीक्षक नीरज राजगुरू यांच्याकडे वर्ग. महादेव मुंडे यांचे कुटुंब आणि आमदार सुरेश धस यांच्या मागणीवरून हा तपास परळी पोलिसांकडून अंबाजोगाई उपअधीक्षकांकडे देण्यात आला होता. मात्र या प्रकरणात म्हणावी तशी प्रोग्रेस होत नसल्याचे लक्षात घेता हा तपास आता गेवराई पोलीस उपअधीक्षक करणार आहेत.
मंत्री प्रताप सरनाईक खार पोलीस ठाण्यात दाखल. कुणाल कामराविरोधात खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. स्टँडअप कॉमेडियन कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल गायलं आक्षेपार्ह गाणं.
कुणाल कामराविरोधात आंदोलन आणि तोडफोड करणाऱ्या राहुल कनाल , कुणाल सरमळकर यांना 11.30 वाजता बांद्रा कोर्टात हजर करण्यात येणार. खार पोलीस ठाण्यात दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल. कोर्टाकडून दोघांना शिक्षा होणार की दंड ठोठावण्यात येणार हे पाहणं महत्वाचं.
“कुणाल कामराचा स्टुडिओ तोडला ही गुंडागर्दी. मुंबईच्या पोलीस आयुक्ताची बदली झाली पाहिजे. खारमध्ये कामराचा स्टुडिओ तोडला त्याची भरपाई कोण करणार?. महाराष्ट्राला कमकुवत गृहमंत्री मिळाला आहे. हे देवेंद्र फडणवीस यांच्या कंट्रोलमध्ये नाही” अशी टीका संजय राऊत यांनी केली.
नागपूर हिसांचारप्रकरणातील आरोपी फहीम खानच्या घरावर बुलडोझर चालवण्यात येणार आहे. नागपूर पालिकेचं पथक फहीम खानच्या घरी दाखल झालं आहे.
नाशिकच्या सातपूर अंबड लिंक रोडवर असलेल्या तीन ते चार दुकानांना रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. फर्निचरच्या दुकानांना आग लागून मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली. अग्निशामक दलाच्या चार ते पाच गाड्या घटनास्थळी दाखल, आग आटोक्यात आणली. आगीचे कारण अस्पष्ट, वेळीच आग भिजवल्याने मोठा अनर्थ टळला.
जळगावातील कानसवाडा येथील शिवसेनेच्या माजी उपसरपंच खूनप्रकरणातील तिसऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. भरत भास्कर पाटील असे तिसऱ्या आरोपीचे नाव आहे.
जुन्या वादातून माजी उपसरपंच युवराज सोपान कोळी यांची तिघांनी हत्या केल्याची घटना घडली. घटनेच्या दिवशी पोलिसांनी दोन जणांना अटक केली होती, दोघेही पोलिस कोठडीत आहेत. तिसरा आरोपी हत्येच्या घटनेपासून फरार होता. या फरार तिसऱ्या आरोपीला नशिराबाद पोलिसांनी अटक केली आहे
सर्वसमावेशक अर्थसंकल्प सादर करण्याचा प्रयत्न, राज्याला आर्थिक शिस्त लावण्याचा प्रयत्न आहे – अजित पवार
कुणाल कामराचं लोकेशन ट्रेस करण्याचं काम सुरू आहे, असं गृहराज्यमंत्री कदम यांनी सांगितलं.
दिल्ली विधानसभेच अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होणार आहे. आज आर्थिक सर्वेक्षण अहवाल मांडला जाणार आहे. मुख्यमंत्री रेखा गुप्ता उद्या म्हणजेच मंगळवारी सादर अर्थसंकल्प करणार आहेत. भाजपची सत्ता आल्यानंतर पहिल्यांदाच सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाकडे दिल्लीकरांचे लक्ष लागलं आहे.
कुणाल कामरा याने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना धमकी दिली आहे. मी पुद्दुचेरीत आहे काय ऊखाडता ऊखाडा अशा भाषेत दिली धमकी… खार पोलिसांत याबाबत तक्रार दाखल… राहूल कनाल यांनी दिला दुजोरा
फक्त प्लॅटफॉर्म १२ आणि १३ वर नाही तर सर्वच ठिकाणी गर्दी… रविवार असल्याने प्रवशी जास्त प्रमाणात आले होते… रात्री उशिराच्या गाड्या जास्त असल्याने लोक स्टेशनवर जास्त जमले होते… कुठलाही गोंधळ झाला नसून परिस्थिती सगळी नियंत्रणात… रेल्वे विभागाकडून स्पष्टीकरण…