गोंदियामध्ये राष्ट्रवादीच्या सभासद नोंदणी अभियानाला सुरवात
राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादीच्या सभासद नोंदणी अभियानाला सुरुवात
गोंदिया येथील NMD महाविद्यालयात पार पडला मेळावा
पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त संख्येने सभासद नोंदणी करुन पक्षाला मजबूत करण्याचे प्रयत्न करण्याचं आवाहन
ठाण्यात पार्क केलेल्या रिक्षाला आग लागल्याची घटना
शहरातील सावरकर नगर येथे घडला धक्कादायक प्रकार
पार्क केलेल्या स्क्रॅप रिक्षाला अचानकपणे लागली आग
आगीत रिक्षा जळून खाक
स्थानिक आणि अग्निशमन दलाच्या साह्याने आगीवर नियंत्रण
घटनेत रिक्षाचे मोठे नुकसान
जळगावातील कांताई सभागृहात आज ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. सरकारने ज्याप्रमाणे लाडकी बहीण योजना आणली त्याप्रमाणे ज्येष्ठांसाठी लाडके आजी, आजोबा म्हणून मदत केली पाहिजे, अशी मागणी या कार्यळाच्या माध्यमातून ज्येष्ठांनी केली आहे.
अजित पवार यांच्या उपस्थिती नांदेडमध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला सुरुवात झाली. नांदेड, लातूर, परभणी व हिंगोली जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याची ही बैठक आहे.
मुंबई-कर्जत लोकलमध्ये वाद झाला. या वादात महिलेला धक्का देणाऱ्या तरुणाला प्रवाशांनी चोप दिला. घाटकोपर ते मुलुंड दरम्यान 3:35 च्या कर्जत लोकलमध्ये ही घटना घडली. इतर प्रवाशांच्या मध्यस्थीने वाद मिटला.
गोंदिया जिल्ह्याच्या नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील मोरगाव अर्जुनी तालुक्यातील शिवरामटोला गावात सकाळच्या सुमारास मोहफूल वेचायला गेलेल्या महिलेवर वाघाने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अनुसया कोल्हे (45 ) असं वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली असून वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.
उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (एचएसआरपी) पाटी बसवण्याच्या सूचना परिवहन विभागाने दिल्यानंतर आता त्याचाच फायदा घेऊन सायबर फसणूक करण्यात येत असल्याच्या घटना समोर येत आहे. सायबर फसवणूक करण्यासाठी बनावट लिंक तयार केल्याचं निदर्शनास आलं असून आता सायबर भामट्यांनी थेट सरकारी संकेतस्थळाशी साधर्म्य असलेले बनावट संकेतस्थळ तयार केलं आहे. उच्च सुरक्षा क्रमांक पाट्यांच्या नोंदणीसाठी बनावट लिंकद्वारे फसवणूक करण्यात येत असल्याची तक्रार मुंबई पोलिसांकडे आली होती. ‘बुक माय एचएसआरपी डॉट कॉम’ नावानेच बनावट लिंक करण्यात आली आहे. त्याद्वारे सामान्य नागरिकांची फसवणूक केली जात आहे. त्याची निर्मिती राजस्थानमधून असल्याचे सायबर तज्ज्ञांच्या तपासणीत निष्पन्न झाले आहे.
“जर मला बोलावलं असतं तर सगळ्या आमदारांना बोलवावं लागलं असतं. नाशिकसाठी कोणी चांगला निर्णय घेतला तर आनंदच होईल. नाशिक कुंभमेळ्याच्या तयारीबद्दल अधिकाऱ्यांकडून माहिती घेत असतील,” असं छगन भुजबळ म्हणाले.
मुंबईतील बैठकीत अमित ठाकरेंवर शाखा अध्यक्षांची जबाबदारी सोपवण्यात आली. तर संदीप देशपांडे हे मनसेचे मुंबईच्या शहर अध्यक्षपदी नियुक्त झाले आहेत.
बच्चू कडूंकडून तिसऱ्या दिवशी अन्नत्याग आंदोलन मागे घेण्यात आलं आहे. मंत्री गोगावलेंच्या मध्यस्थीनंतर बच्चू कडूंकडून आंदोलन स्थगित करण्यात आलं आहे. सरकार दिव्यांगांसाठी सकारात्मक निर्णय घेईल, असं गोगावले म्हणाले.
“पुढच्या महिन्यात काम सुरू झालं पाहिजे, अशी तयारी करणार आहोत. नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी यूपीप्रमाणे कायदा तयार करणार आहोत. नाशिक कुंभमेळ्यासाठी मेळा प्राधिकरण स्थापन करणार,” असं मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“कुंभमेळाव्याच्या निमित्ताने रस्ते, पुलांची उभारणी करणार. विकासकामांना मोठा निधी लागेल, पण निधी कमी पडू देणार नाही. विकास आराखड्याच्या प्रस्तावाला लवकरच मान्यता देण्यात येईल. कुंभमेळ्याच्या निमित्ताने रस्ते, पुलांची उभारणी करणार,” अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली.
त्र्यंबकेश्वरच्या विकास आराखड्याचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. “विकास आराखड्यानुसार दोन टप्प्यात काम करणार. पहिल्या टप्प्याच काम कुंभ मेळ्याआधी पूर्ण करणार” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नाशिक शासकीय विश्रामगृहावर कुंभमेळ्याच्या बैठकीला सुरुवात. मंत्री गिरीश महाजन, मंत्री दादा भुसे आणि इतर अधिकारी उपस्थित.
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई. आरोपींकडून पुणे पोलिसांनी जप्त केली चार पिस्तुल आणि 8 जिवंत काडतुसं. चार आरोपींना पुणे पोलिसांनी केली अटक. चारही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून या चारही आरोपींवर शहरातील विविध पोलीस स्टेशनमध्ये गंभीर गुन्हे दाखल आहेत. गोपाळ संजय यादव, अमन उर्फ मुन्ना दस्तगीर पटेल, विशाल जगन्नाथ पंडी, दयानंद शिवाजी चव्हाण असं अटक केलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांची नावे आहेत.
जनतेच प्रेम आहे. माजी आमदार भास्करराव पाटील खतगावकर, ओमप्रकाश पोखरना यासाठी आलं पाहिजे असं मला आमदार चिखलीकर म्हणाले. कांद्यावरील 20% कर हटवला. जे चुकीचे काम करतात, त्याला कठोर शासन होईल” असं अजित पवार म्हणाले.
अजित पवारांनी जे म्हटले आहे ते आम्हाला दुरुस्त करायचे आहे. देशभक्त आणि भारतीय असलेल्या मुस्लिमांवर आमचे कोणतेही आरोप नाहीत.पण दंगल घडवणारा कोणताही मुस्लिम देशद्रोही आहे, आम्ही त्याच्यावर कारवाई करू आणि अजितदादाही त्याला वाचवू शकणार नाहीत, असे मत संजय निरुपम यांनी मांडले
संजय राऊत यांनी आज सकाळी पत्र परिषद घेतली. त्यावेळी त्यांना नारायण राणे यांच्या दाव्याविषयी विचारण्यात आले. आपण उद्धव ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर यांना या दाव्याविषयी विचारणा केली. पण त्यांना राणेंना फोन केला नाही, असे सांगितल्याचा खुलासा संजय राऊत यांनी केला.
मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही धरणातील पाणीसाठा ३९ टक्क्यांवर आला आहे. वातावरणातील उष्मा वाढू लागला असून हा पाणीसाठा जुलै अखेरीसपर्यंत पुरवावा लागणार आहे.
कोणी कितीही काळ्या बाहुल्या बांधा, माझं वाकडं करु कोणी शकत नाही; जो पर्यंत जनता आणि माय माऊली माझ्या पाठीशी आहे असे वक्तव्य जयकुमार गोरे यांनी केले.
नारायण राणे यांना अटक झाली त्यावेळी त्यांच्या कुटुंबियांकडून उद्धव ठाकरे यांना सोडून देण्यासाठी फोन आला होता. केंद्रातून सुद्धा फोन आला होता, असा गौप्यस्फोट खासदार संजय राऊत यांनी केला.
नांदेड जिल्ह्यातील नरसी येथे जिल्ह्याचे जेष्ठ नेते माजी खासदार भास्कर पाटील खतगावकर, माजी आमदार ओमप्रकाश पोखर्णा यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होणार आहे. अजितदादा सोबत सुनील तटकरे आहेत, माजी मंत्री नवाब मलिक, मंत्री बाबासाहेब पाटील आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती वरून नांदेडकडे रवाना झाले आहेत. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि नवाब मलिक देखील अजित पवार यांच्यासोबत विमानातून नांदेडकडे रवाना झाले आहेत.
नाट्य रसिकांची वर्षभराची प्रतीक्षा संपणार.. ठाण्यात नूतनीकरणाला वेग.. १ मे रोजी उद्घाटन केले जाणार… पूर्वी आखडून खुर्च्या होत्या आता आरामदायी खुर्च्या बसविण्यात आल्या आहेत ..त्यामुळे आसन क्षमता 120 ने कमी झाली असून ती आता 960 पर्यंत आली आहे….
भिंत कोसळल्याची घटना पहाटे घडल्याने मोठा अनर्थ तळला… मांडवी खुर्द जिल्हा परिषद शाळेत जीव धोक्यात घालून विद्यार्थी घेत आहे शिक्षण… मांडवी खुर्द जिल्हा परिषद शाळेतील पाच वर्ग खोल्या धोकादायक स्थितीत… २८८ पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषद शाळेची अत्यंत दुरावस्था… पहिली ते सातवीपर्यंतचे विद्यार्थी घेतात शिक्षण… मोठमोठ्या भेगा या सोबतच छत देखील तुटण्याचा मार्गावर.. तुटलेल्या छताला लाकडाचा आधार देत त्याखाली विद्यार्थ्यांना दिलं जात आहे शिक्षण… वारंवार तक्रार देऊनही शाळा दुरुस्ती होत नसल्याने पालक आक्रमक… भिंत कोसळल्याने पालक आक्रमक मोठी घटना घडली असती तर याला जबाबदार कोण पालकांचा संतप्त सवाल…..
नागपूरमध्ये घडलेल्या दंगलीच्या घटनेनंतर मुंबई पोलीस अलर्ट मोडमध्ये आहेत. रमजान ईद आणि गुढीपाडवा सणानिमित्ताने मुंबई पोलीस अलर्ट मोडवर आहेत. औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्यावरुन नागपूरमध्ये मोठा हिंसाचार झाला होता. त्या पार्श्वभूमीवर मुंबईत कुठलीही अनुचित घटना घडू नये, यासाठी काही पावलं उचलली आहेत.
कल्याणच्या खाडीकिनारी छत्रपती शिवाजी महाराज नौदल संग्रहालयासमोर अजस्त्र होर्डिंग, परिसराचे विद्रुपीकरण… घाटकोपरसारख्या दुर्घटनेची भीती; काँग्रेसने होर्डिंग हटवण्याची मागणी केली.. उद्घाटनापूर्वी होर्डिंग हटवा, अन्यथा आम्हीच तोडू – काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे… केडीएमसी प्रशासनाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष.
ठाण्यासह कल्याण ,उल्हासनगर, भिवंडीत सर्वाधिक कुपोषित मुले आहेत. ठाणे जिल्ह्यात दहा हजार 697 बालके पिढीत आहेत. शहरात 869 तर ग्रामीण भागात 93 तीव्र कुपोषित बालके आहेत… ठाणे जिल्हा कुपोषणाच्या विळख्यात. सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर चार चाकी गाडीचा टायर फुटल्यामुळे भीषण अपघात झाला आहे. अपघातात 2 जणांचा मृत्यू तर 4 जण गंभीर जखमी झालेत. अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद… मुंबईवरून अक्कलकोटच्या दिशेने जात असताना हॉटेल वळसंग वाडा समोर हा अपघात झालाय… भरधाव वेगाने जाणाऱ्या कारचा टायर फुटल्यामुळे उभ्या असलेल्या मालवाहू टेम्पोला मागून धडक दिल्यामुळे भीषण अपघात झाला… या भीषण अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यासह देश-विदेश, राज्यातील, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घटनांचे अपडेट्स मिळवण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा.