मुंबईच्या मरीन ड्राईव्ह परिसरात पहाटेपासूनच धुळवडीचा रंगतदार उत्सव साजरा होत आहे. तरुण-तरुणी सह सर्वच वयोगटातील नागरिक मोठ्या संख्येने एकत्र येऊन एकमेकांना रंग लावत आहेत. रस्त्यापासून मुंबईचा गल्लीबोळ्या देखील धुळवड चा उत्साह मोठ्या धुमधडाक्यात साजरा होत आहे. मोठा जोश उत्साह सर्वत्र दिसून येत आहे .. तर मरीन ड्राईव्ह परिसरात सकाळी सहा वाजल्यापासून अनेक नागरिक एकामेकांना रंग लावत डान्स करत उत्साह साजरा करत आहे… पुणे शहरात धुळवडीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावेळी नागरिक मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर एकत्र येऊन रंगांची उधळण करतात. सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढत असल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम होतो. याच पार्श्वभूमीवर पुणे मेट्रो प्रशासनाने सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी सकाळी 6 ते दुपारी 3 वाजेपर्यंत सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे…
‘आप’ने १० वर्षे दिल्ली लुटली, घोटाळेबाज तुरुंगात जातील, असं प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितलं.
यूपी एटीएसने रवींद्र कुमार नावाच्या एका व्यक्तीबद्दल एक प्रेस रिलीज जारी केली आहे. ही व्यक्ती पाक आयएसआय हँडलर्सना सर्व संवेदनशील माहिती शेअर करत होता. सध्या त्या व्यक्तीची चौकशी सुरू आहे.
पाकिस्तान पोलिसांनी सांगितले की, खैबर पख्तूनख्वा येथील दक्षिण वझिरीस्तानमध्ये शुक्रवारच्या नमाज दरम्यान एका मशिदीत बॉम्बस्फोट झाला. ज्यामध्ये जेयूआयचे जिल्हा प्रमुख अब्दुल्ला नदीम आणि इतर तीन जण जखमी झाले.
मोठी बातमी समोर आली आहे. सतीश उर्फ खोक्या भोसलेला 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. खोक्याला 20 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात येणार आहे. तरुणाला अमानुष मारहाण आणि प्राण्यांची शिकार प्रकरणार ही कारवाई करण्यात आली आहे.
नाशकात दाजीबा वीर मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. जुन्या नाशकात शेकडो वर्षांची परंपरा जपली जात आहे. डोक्यावर बाशिंग बांधून वाजत गाजत मिरवणूक काढली जाते. लहान मुलांनाही या मिरवणुकीत नाचवलं जातं. पारंपरिक वाद्याच्या गजरात दाजीबा वीर नाचतात. नाशकात तीनशे वर्षांपासून ही परंपरा कायम आहे. नवसाला पावणारा देव असा नागरिकांची भावना आहे. होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच धुळवडच्या दिवशी शहरात वीराची मिरवणूक काढली जाते.
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे मस्साजोगमध्ये गावकऱ्यांनी होळी साजरी न करण्याचा निर्णय घेतला आहे. हत्याकांड प्रकरणातील सर्व आरोपींना फाशी दिल्याशिवाय आमचं सुतक फिटणार नाही, असा निर्धार मस्साजोग गावातील ग्रामस्थांनी केला आहे.
जळगावातील तांबापुरा परिसरात हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्र धुलीवंदन साजरे करत एकतेचा संदेश आहे. जिल्हा पोलिस दलाच्यावतीने रमजान ईद आणि रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर अनोख्या उपक्रमाचे आयोजन केले होते.
भगवा रंग ज्याला परवडेल, भगवा रंग ज्याला आवडेल त्याने सोबत यावं अशी ऑफर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसच्या नाना पटोले यांना दिली आहे.
धुलीवंदनाच्या दिवशी पुण्यात मद्यप्राशन करून तुम्ही वाहने चालवत असाल तर तळीरामांचा बंदोबस्त करण्यासाठी पुणे पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला आहे. विशेष म्हणजे ड्रंक अँड ड्राईव्हची मोहीम हाती घेतलेली असून, त्यासाठी वाहतूक पोलीस आणि स्थानिक पोलिसांची तब्बल 80 पथके व 5000 पोलीस कर्मचारी शहरातील चौकात चौकात तैनात करण्यात आली आहेत.
वसंतदादा इन्स्टिट्यूट या ठिकाणी काही शास्त्रज्ञ आले होते. त्यांना घेऊन मी आज बारामती येथील कृषी विज्ञान केंद्र या ठिकाणी गेलो होतो. या ठिकाणी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून ऊस शेती केलेली आहे, असे जयंत पाटील यांनी म्हटले.
धुळवडीसाठी मुंबईत पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवला आहे. मद्यधुंद वाहनचालकांवर नाकाबंदी कारवाई केली जात आहे. टवाळखोर आणि नशेखोरांच्या कृत्यांमुळे सणाला गालबोट लागू नये यासाठी विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे.
पोलिसांचे पथक सतीश उर्फ खोक्याला घेऊन शिरूर कासार दिवाणी व फौजदारी न्यायालयात हजर झाले आहे. न्यायाधीश अक्षय जगताप यांच्या कोर्टासमोर खोक्याला हजर करण्यात आले आहे. पोलिसाच्या वतीने अधिक तपासासाठी सतीश उर्फ खोक्याच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती. ही मागणी मंजूर झाली असून ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
नगरमधील राष्ट्रवादी काँगेस शरद पवार पक्षाचे युवक प्रदेश उपाध्यक्ष बालराजे पाटील यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विधानसभेचे तिकीट मिळवून देतो म्हणून काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय ओबीसी समन्वयक मंगल भुजबळ यांच्याकडून टोकन म्हणून दिड लाख रुपये उकळले. दीड लाख रुपयांची ऑनलाइन देवणाघेणाव झाल्यावर दहा लाख रुपये ऑफलाइन दिल्याचा आरोप मंगल भुजबळ यांनी केला आहे.
कल्याण ग्रामीणचे शिवसेना आमदार आणि डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे यांनी आज कार्यकर्त्यांसोबत रंगपंचमीचा उत्सव साजरा केला. काही दिवसांपूर्वी पाहणी दौर्यादरम्यान त्यांच्या हाताला दुखापत झाल्यामुळे शस्त्रक्रिया करण्यात आली होती. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असूनही, त्यांनी कार्यकर्त्यांसोबत रंगपंचमीचा आनंद घेतला आणि जल्लोषात सहभागी झाले.
इचलकरंजी – धुळवड खेळताना राखेचा गोळा फेकून एसटीची तोडफोड करण्यात आली आहे. यावेळी कर्नाटक राज्याची गाडी फोडण्यात आली. हुलगेश्वरी रोडवर ही घटना घडली. यावेळी गाडीमधील काही पॅसेंजर जखमी झाले. होळीची धुळवड मागताना कर्नाटक गाडीची तोडफोड करण्यात आली. यात एसटी रिक्षा स्कार्पिओ मोठे ट्रक अशा सात ते आठ गाड्यांची तोडफोड करण्यात आली. पैसे दिले नाही म्हणून काही वाहन धारकांना मारहाण करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
आताचे राजकीय रंग हे विषारी रंग झाले. एकमेकावर द्वेष भावनेचे रंग फेकून खाली ओढण्याचं काम सध्या सुरू आहे, असे एकनाथ खडसे म्हणाले. एकमेकांच्या अंगावर आता कोण कसा रंग उडाळेल हे सांगता येत नाही, असे ते म्हणाले.
महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा अधिनियम 2024 वर आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी सडकून टीका केली आहे. जनतेची पिळवणूक करणारा कायदा आहे. या कायद्यात सरकार कडे कुठलीही बाजू मांडता येणार नाही. देशातील जनतेचा हक्क हिरावून गुलाम बनवण्याची प्रक्रिया चालू केलेली आहे, असे कुंभार म्हणाले.
अहिल्यानगर जिल्ह्यातील काकडवाडी देवीच्या मंदिरातील सोने आणि चांदी चोरी प्रकरणात मुद्देमालासह सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली. अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. रविवारी 9 मार्च रोजी पहाटे चोरीची घटना घडली होती.
देशात काही लोकांनी माहौल बिघडवला आहे. हा संकुतिचपणा देशाला, धर्माला परवडणार नाही, अशी सणसणीत चपराक खासदार संजय राऊत यांनी लगावली.
धर्माच्या राजकारणामध्ये आघाडी असो किंवा युती असो, यांनी शेतकऱ्यांना चकनाचुर करून टाकलं, यांच्या रंगपंचमीमध्ये आमची रंगपंचमी लाल होतय, काळी गर्द झालेली आहे, अशी जळजळीत प्रतिक्रिया प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी दिली.
होय, मालेगाव विधानसभा निवडणुकीसाठी बाहेरून पैसा आला, असा खळबळजनक दावा माजी आमदार आसिफ शेख यांनी केला आहे.
रंगोत्सवाचा उत्साह शिगेला पोहचला आहे. तर सलग तीन दिवस सुट्टी आल्याने अनेक जणांनी आज धुळवडीसाठी मांसाहाराचा बेत आखला आहे. मटण, चिकन दुकानावर सकाळपासूनच गर्दी दिसून येत आहे.
लहान मुलांनापासून युवकांमध्ये मोठ उत्साहाचं वातावरण… पुण्यात सर्वञ जोष जल्लोष आणि उत्साह धुळवडीच्या निमित्ताने अनेक तरुण-तरुणी रंगोत्सवात नहाले… पुण्यातील भोई प्रतिष्ठानच्या वतीने विशेष मुलांसाठी तसेच तरुण तरुणींसाठी भव्य रंगोत्सवाचे आयोजन… कार्यक्रम सोहळ्यासाठी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ,रुपाली चाकणकर ही उपस्थित…
होळी, धूलिवंदनाचा सण आनंदात साजरा करता यावा, यासाठी मुंबई पोलिसांनी ११ हजार जणांचा फौजफाटा तैनात केला आहे. त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी पादचाऱ्यांवर रंगाचे पाणी उडविणे, अश्लील टीका, टिप्पणी करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे. सार्वजनिक शांतता व सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी पोलिसांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत…
रस्ते रंगवत बच्चू कडूंनी केल्या सरकार कडे अनेक मागण्या… शेतकऱ्यांची कर्जमाफी करा, स्वामीनाथन आयोग मान्य करा , शेतकऱ्यांच्या मालाला भाव द्या. पेरणी ते कापणी पर्यत कामे रोजगार हमी योजने अंतर्गत करावी… दिलेले आश्वासन सरकारने पूर्ण करावे. दिव्यांगांना प्रति महिना सहा हजार रुपये मानधन देण्यात यावे. घरकुल बांधकाम करण्यासाठी पाच लाख रुपये अनुदान… शहीद परिवार व गड किल्ल्यांसाठी स्वतंत्र धोरण; युवा धोरण पेपर फुटीचा कायदा मंजूर करावा… बांधकाम कामगाराप्रमाणे शेतमजुरांनासुद्धा योजनेचा लाभ द्यावा शेतमजूर व प्रकल्पग्रस्तांसाठी वित्तीय महामंडळ निर्माण करावे…
ठाण्यात मटण दुकानांवर नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे, कारण धूलिवंदन शुक्रवारी आल्यामुळे मटण आणि चिकनच्या मागणीत वाढ झाली आहे, ज्यामुळे दुकानाबाहेर लोकांच्या रांगा दिसत आहेत. ठाण्यातील नौपाडा परिसरात सकाळ पासूनच ही लाभच लांब रांगा पहायला मिळत आहे. मटणाच्या दुकानांवर जास्त गर्दी असण्याच कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी कोंबड्यांना झालेली बर्ड फ्लू ची लागण त्यामुळे मटणासाठी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे…