आज आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीनगरमध्ये असून तिथे ते आंतरराष्ट्री योग दिवस समारंभात सहभागी होणार आहेत. तिसऱ्यांदा पंतप्रधान बनल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा पहिलाच काश्मीर दौरा आहे. पीएम मोदी आज श्रीनगर स्थित शेर-ए-कश्मीर अंतरराष्ट्रीय सम्मेलनात (एसकेआईसीसी) मध्ये युवा पिढीच सशक्तीकरण, जम्मू-कश्मीरमध्ये बदल या कार्यक्रमात सहभागी होतील. त्याशिवाय ते 1500 कोटीपेक्षा अधिक खर्चाच्या विकास प्रकल्पांच उद्घाटन आणि भूमिपूजन करतील. ते 1800 कोटी रुपये खर्चाच्या कृषी संबंधित सुधारणा योजनांचा शुभारंभ करतील. योग दिनाशी संबंधित प्रत्येक महत्त्वाची बातमी इथे वाचा….
पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर असलेल्या मेकॅनिकल पार्किंगमध्ये लपलेल्या चोरांना पकडण्यासाठी पुणे मनपा अधिकारी, फायर ब्रिगेड आणि पोलिस घटनास्थळी दाखल झालेत. मेकॅनिकल पार्किंगमधील लाखो रुपयेचे लोखंड कॅापर आणि वायर चोरी करण्यासाठी हे चोर आले होते.
नाशिक शहरात एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. पखाल रोड परिसरात एम डी ड्रग्सची विक्री करण्यासाठी आला असता सापळा रचून पोलिसांनी अटक केली. संशयित आरोपी कडून 2 लाख 90 हजारांचे एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले आहेत. शहबाज पठाण असे या संशयित आरोपीचे नाव आहे.
ओबीसी आणि मराठा समाजाला खेळवण्याच काम सरकारने करू नये. सरकारची नियत असेल आणि जाती धर्माच्या मुद्द्याचे ध्रुवीकरण करायचे नसेल तर योग्य निर्णय घ्यावा. दोन्ही आंदोलकाना एकत्र समोरासमोर बसवून दोन्ही बाजू ऐकून घेऊन सरकारने हा प्रश्न सोडवायला हवा, असे मत ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी व्यक्त केले.
ओबीसी नेत्यांची राज्य सरकारसोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे. सह्याद्री अतिथीगृह येथे ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत राज्यातील 10 मोठे ओबीसी नेते उपस्थित आहेत.
नवनिर्वाचित खासदार सुप्रिया सुळे यांनी विजयासाठी प्रयत्न केलेल्या कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत. तसेच विजयामुळे कोणीही हवेत राहू नका, असंही सुळे यांनी म्हटलं. आपण आता संघर्ष केला मात्र मोठी लढाई आपल्याला आता लढायची आहे.ऑक्टोबरमध्ये सगळ्यांना काम करायचं आहे, असं म्हणते सुळे यांनी विधानसभा निवडणुकीच रणशिंग फुंकलं.
आम्ही अनेक मेळावे घेतले पण कधीही नासधूस केली नाही. निवडणुकीत असं पाडा की 5 पिढ्या आठवणीत राहिल्या पाहिजे, असं जरांगे म्हणाले. मग जातीयवाद कोण करतं? असा प्रश्न लक्ष्मण हाके यांनी उपस्थित केला आहे. तसेच मंडळ आयोगाला हात लावणे एवढं सोपं नाही, तसं केल्यास देशातला पंतप्रधान जागेवर राहील का? असंही हाके म्हणाले. तसेच लोकसभेत तुम्हाला मुस्लिम मतं चालली मात्र इम्तियाज जलील दिसला नाही. दलित मते दिसली मात्र प्रकाश आंबेडकर दिसले नाहीत.आपला कोण आणि परका कोण या गोष्टीचा आम्ही निश्चित विचार करतो, असंही हाके म्हणाले.
आज संध्याकाळपर्यंत केजरीवाल यांच्या सुटकेवर सस्पेन्स कायम राहणार आहे. उच्च न्यायालयात सुनावणी होईपर्यंत जामिनावर स्थगिती राहणार आहे. या प्रकरणाची सुनावणी उच्च न्यायालयात सुरू आहे.
नीट, यूजी आणि यूजीसी नेट परीक्षेच्या मुद्द्यावरून छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी टीकास्त्र सोडलं. बघेल यांनी सांगितलं की, गेल्या 10 वर्षांत परीक्षेचे 70 पेपर लीक झाले आहेत. हजारो कोटींचा घोटाळा झाला आहे. आमची पहिली मागणी परीक्षा रद्द करा आणि दुसरी मागणी एनटीएच्या अध्यक्षांना दूर करा. हा तपास सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली व्हायला हवा.
केंद्र सरकार आणि भाजपा पुन्हा एकदा ओम बिर्ला यांच्यावर लोकसभा अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवू शकतात. लोकसभा अध्यक्षपदासाठी सरकार ज्या नावांचा विचार करतंय त्यात ओम बिर्ला यांचेही नाव आहे. 26 जून रोजी अध्यक्ष पदाची निवडणूक होणार आहे. ओम बिर्ला हे 2019 ते 2024 पर्यंत लोकसभेचे अध्यक्ष होते.
महागाई ,बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या मालाला भाव यासह विविध मागण्यासाठी काँग्रेसच्या वतीने चिखलफेक आंदोलन करण्यात आले. राज्य सरकार व केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी प्रतिकात्मक पुतळा बनवून त्यावर चिखलफेक करण्यात आली.
नीट पेपर लीकच्या मुद्द्यावर तेजस्वी यादव म्हणाले की पेपर लीकच्या किंगपिनवर कारवाई झाली पाहिजे. पेपर रद्द करून परीक्षा पुन्हा घेण्यात यावी, अशी आमची मागणी आहे. अमित आनंद आणि नितीश कुमार यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. तेजस्वी म्हणाले की, भाजपचे सरकार आल्यावर पेपर फुटला . राज्यात आणि केंद्रात भाजपचे सरकार आहे, चौकशी करा.
दिल्लीत हवामानाचा मूड बदलला आहे. अनेक भागात पाऊस झाला. या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. गुरुग्राममध्येही काही भागात हलका पाऊस झाला आहे.
बच्चू कडू यांचे पत्र आले आहे. स्थानिक गुन्हे शाखा याचा सर्व बाजूने तपास करत आहे. सुरक्षा वाढवण्याची गरज भासल्यास आम्ही बच्चू कडू यांची पोलीस सुरक्षा वाढवू. सायबरच्या माध्यमातून देखील आम्ही चौकशी करत आहोत, असे अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी म्हटले.
दिल्ली हायकोर्टाने सुनावणी होईपर्यंत सुटकेला दिली स्थगिती. ईडीने दाखल केलेल्या याचिकेवर दिल्ली हायकोर्टात सुनावणी
महायुती सरकारच्या विरोधात काँग्रेसच आंदोलन. चिखल फेक आंदोलन करत सरकारचं निषेध. महागाई , बेरोजगारी , नीट परीक्षा ,खते बियाण्याचा काळाबाजार या विरोधात आंदोलन
मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिलाय. तुम्ही आम्हाला फसवले तर आम्ही तुम्हाला डुबवणार असल्याचे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
सरकार म्हणतंय OBC आरक्षणाला धक्का लागणार नाहीये. सरकारने आमच्या आरक्षणाला धक्का कसा लागणार नाहीये हे पाहावे, असे हाके यांनी म्हटले.
लक्ष्मण हाके यांच्या मागण्यासंदर्भात आज संध्याकाळी पाच वाजता बैठक होत आहे. ओबीसी शिष्टमंडळ सरकारशी चर्चा करणार आहे.
बीड परळी महामार्गावर ओबीसी कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे रस्त्यावर वाहनांच्या रंगा लागल्या आहे. लक्ष्मण हाके यांच्या समर्थनार्थ रस्ता रोको आंदोनल करण्यात आले.
देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष्मण हाके यांच्याशी फोनवर चर्चा केली. त्यांना शिष्टमंडळ चर्चेसाठी पाठवण्याचे आवाहन केले. शिष्टमंडळासोबत होणाऱ्या त्या बैठकीला गोपीचंद पडळकर स्वत: जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपोषणस्थळी भेट द्यावी, अशा घोषणा लक्ष्मण हाके यांच्या समर्थकांनी केला. सरकार दुटप्पी भूमिका कसे घेऊ शकते? ओबीसीसारख्या मोठ्या वर्गाकडे दुर्लक्ष कसे केले जात आहे, असे कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.
एका व्यक्तीमुळे राज्यात जाती जातींमध्ये तेढ निर्माण झाला आहे, असे वाघमारे यांनी शिष्टमंडळाला सांगितले. सरकार सर्व प्रश्नावर मार्ग काढणार आहे. विश्वास ठेवा, असे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.
भुजबळ, जानकर आणि पडळकर यांनी एकत्र बसून चर्चा करावी. त्यानंतर सरकारसोबत ओबीसी शिष्टमंडळाने वाटाघाटी कराव्या, असे गिरीश महाजन यांनी म्हटले.
कुणबी नोंदणी प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम थांबवा, अशी मागणी लक्ष्मण हाके यांनी शिष्टमंडळाकडे केली. नवनाथ वाघमारे यांनी मागण्या मान्य न झाल्यास मरेपर्यंत उपोषण करण्याची तयारी असल्याचे म्हटले आहे.
मी मुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा केली आहे. ओबीसी आरक्षणाला कसलाही धक्का लागणार नाही. लक्ष्मण हाके यांनी त्यांचे शिष्टमंडळ मुंबईला पाठविलं पाहिजे, असे गिरीश महाजन यांनी लक्ष्मण हाके यांना सांगितले आहे.
सरकारची ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, ही भूमिका आहे. लक्ष्मण हाके यांनी उपोषण मागे घ्यावे. त्यांनी मध्यम मार्ग काढावा आणि सरकारशी चर्चा करावी, अशी विनंती मंत्री गिरीश महाजन यांनी केली.
जरांगे आणि सरकार यांच्यापैकी कोण खरे बोलत आहे? असा सवाल लक्ष्मण हाके यांनी राज्य सरकारला केला आहे. सरकारच्या शिष्टमंडळाशी चर्चा करताना लक्ष्मण हाके यांनी मागणी मान्य होत नाही, तोपर्यंत उपोषण कायम राहणार असल्याचे म्हटले आहे.
ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, यासाठी उपोषणास बसलेल्या लक्ष्मण हाके यांच्या उपोणस्थळी सरकारचे शिष्टमंडळ पोहचले. शिष्टमंडळाने लक्ष्मण हाके यांना उपोषण सोडण्याची विनंती केली. परंतु लक्ष्मण हाके उपोषणास ठाम आहे.
पंढरी वारीसाठी रेल्वेच्या विशेष 196 फेऱ्या होणार आहे. पंढरीकडे 12 जुलैला पहिली रेल्वे धावणार तर 12 ते 21 जुलै दरम्यान विशेष रेल्वेचे नियोजन केले आहे. पंढरपूर – नागपूर, पंढरपूर – खामगाव, पंढरपूर – अमरावती , पंढरपूर – भुसावळ , पंढरपूर – जालना , पंढरपूर – नांदेड, पंढरपूर – औरंगाबाद , मिरज – नागपूर , मिरज – कुर्डूवाडी – मिरज , पंढरपूर – सोलापूर , पंढरपूर – लातूर , नागपूर – मिरज , पंढरपूर – मिरज या मार्गांवर फेऱ्या असणार आहेत
यवतमाळमध्ये लोकसभा निवडणुकीत पक्ष विरोधी काम करणाऱ्या लोकांना पक्षात स्थान दिल्यास पक्षातील कार्यकर्ते सामूहिक राजीनामा देतील असा ठराव घेण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या आढावा बैठकीत असा ठराव घेण्यात आला.
धुळे शहरातील गरुड मैदानावर आंतरराष्ट्रीय योग दिन झाला. जिल्हा प्रशासन आणि क्रीडा भारती, क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने योग दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला. योग दिनानिमित्त शाळकरी विद्यार्थी अधिकारी कर्मचारी राजकीय पदाधिकारी हजारो संख्येने उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवाचा आढावा घेण्यासाठी बसपा प्रमुख मायावती यांनी २३ जून रोजी पक्षाची राष्ट्रीय स्तरावरील बैठक बोलावली. या बैठकीत पक्षाच्या पुनरुज्जीवनासाठी मायावती अनेक महत्त्वाचे निर्णय घेणार आहेत. प्रमुख राज्यांच्या प्रभारींमध्ये बदल करण्यासोबतच बसपा पक्षाच्या राष्ट्रीय समन्वयकपदाची जबाबदारीही पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आनंद यांच्याकडे सोपवली जाणार आहे.
नाफेडच्या अनेक केंद्रांवर गैर कारभार आढळून आल्याचा दावा नाफेडचे अध्यक्ष जेठाभाई अहिर यांनी केला. अचानक व्हिजिट केल्याने अनेक गोष्टी उघड झाल्या. नाफेडचे अनेक अधिकारी देखील गैरकारभार करत असल्याचं समोर आला आहे. काही व्यापारी आणि एजंट यांना कायमस्वरूपी ब्लॅकलिस्ट करणार असल्याचे त्यांनी सांगितले. नाफेडच्या दोषी अधिकारांवर देखील कारवाई करणार असल्याचे ते म्हणाले.
सिंधुदुर्गमधील लाखो पर्यटकांचे आकर्षण असलेला आंबोलीचा मुख्य धबधबा प्रवाहीत झाला आहे. हा धबधबा यंदा काहीसा उशीरा प्रवाहीत झाला.काल झालेल्या मुसळधार पावसामुळे आंबोलीतील मुख्य धबधब्यासह इतर छोटे मोठे धबधबे पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाले आहेत. त्यामुळे वर्षा पर्यंटनासाठी आंबोलीत येणाऱ्या पर्यटकांना ही पर्वणी ठरली आहे.
कोल्हापुरातील व्हिनस कॉर्नर येथे तुळजापूर-मालवण एसटीची चार चाकीला किरकोळ धडक बसली. त्यानंतर कार चालक आणि एसटी चालकांमध्ये वादविवाद झाला. चार चाकी चालकाने एसटीच्या चालकाला मारहाण केली. चारचाकी चालकाने एस टीचे नुकसान करत दहशत माजवली.
वंदे भारत ट्रेनमधील जेवणात पुन्हा झुरळ आढळले आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यात पण असाच प्रकार घडला होता. सोशल मिडिया प्लॅटफॉर्म X वर याविषयीची तक्रार करण्यात आली होती. नेहमीप्रमाणे IRCTC ने पुन्हा माफीनामा सादर केला आहे. प्रवाशांनी या सर्व प्रकारावर संताप व्यक्त केला आहे.
सिंहगडच्या रस्त्याच्या किरकटवाडी परिसरात कोयता गँगचा हैदोस… कोयता गँगच्या गुंडांकडून तरुणावर हल्ला, घटना सीसीटीव्हीत कैद
मरिन ड्राईव्ह परिसरात सुशोभीकरण, शिंदे, फडणवीसांच्या हस्ते उद्धाटन… कोस्टल रोडमुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. लवकरच मुंबई ट्राफीक मुक्त होईल… असं वक्तव्य देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं आहे.
शहरातील राजाराम स्टेडियम येथे जागतिक योगा दिन मोठ्या उत्साहात साजरा… इचलकरंजी महानगरपालिका व हार्ट ऑफ लिविंग यांच्या वतीने योगा दिन घेण्यात आला… योगा दिनासाठी शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते… योगाची प्रात्यक्षिके करण्यात आली… यावेळी माजी आमदार महापालिकेचे आयुक्त डॉक्टर वकील पालक मोठ्या संख्येने उपस्थित…
कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे सकाळपासून शहर बस वाहतूक सेवा ठप्प… गेल्या दोन महिन्यापासून पगार थकल्याने पुन्हा कर्मचाऱ्यांनी पुकारला संप… गेल्या काही महिन्यापासून कर्मचारी करत आहेत वारंवार संप… पगार आणि इतर सुविधा मिळत नसल्याने कर्मचारी आक्रमक… जवळपास 300 कर्मचारी संपावर, 200 ते 250 बस तपोवन डेपोत थांबले
नागपूरच्या हिट अँड रन प्रकरणार चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. वडिलांपाठोपाठ आता चिमुकलीचाही मृत्यू झाल्यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दिघोरा नात्यावरील हिट अँड रन प्रकरणात आतापर्यंत तिघांता मृत्यू झाला आहे.
माझा अपघात झाल्याची अफवा पसरवली जात आहे… बच्चू कडूंचं जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांना पत्र… जीवाला धोका असल्याचं बच्चू कडूंचं पोलीस अधीक्षकांना पत्र…
योग फक्तच विद्या नाही, विज्ञान आहे. मानवीय मस्तिष्कासाठी एका विषयावर लक्ष केंद्रीत करण कठीण बनलय. एकाग्रता मानवी मनाची मोठी ताकद आहे. योगाच्या माध्यमातून ही एकाग्रता साध्य करणं शक्य होतय.
#WATCH | Srinagar, J&K: On International Day of Yoga, PM Narendra Modi says, “We can feel the energy in Srinagar, that we gain through Yoga. I extend greetings to people of the country and people performing Yoga in every corner of the world on Yoga Day. International Yoga Day has… pic.twitter.com/N3sVDnF8XC
— ANI (@ANI) June 21, 2024
मागच्या 10 वर्षात योगाचा विस्तार झाला. त्याने योगा संदर्भातील धारणा बदलल्या आहेत. नवीन योग इकोनॉमी पुढे जात आहे. ऋषिकेश, काशीमध्ये योग पर्यटन दिसून येतेय. लोक फिटनेससाठी पर्सनला योग ट्रेनर ठेवत आहेत. योगामुळे नवीन संधी, नवीन रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत.
10 व्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीनगरच्या SKICC हॉलमध्ये पोहोचले आहेत. पीएम मोदी 7000 लोकांसोबत मिळून योगासन करणार आहेत.
10 व्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपूरमध्ये योगासन करताना.
#WATCH | Nagpur, Maharashtra: Union Minister Nitin Gadkari performs Yoga, on the occasion of International Day of Yoga. pic.twitter.com/aFZaqD0F7I
— ANI (@ANI) June 21, 2024
पोलीस भरतीसाठी आलेल्या तरुणांच अमरावतीमध्ये आंदोलन. काल झालेल्या पावसामुळे अमरावतीमध्ये पोलीस भरतीच्या मैदानावर झाला चिखल. त्यामुळे मैदानी चाचण्या अजूनही रखडलेल्या. पोलीस भरती स्थगित करून पावसाळ्या नंतर घेण्याची विद्यार्थ्यांची मागणी.
10 व्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्ताने देशाच्या उत्तर सीमेवर भारतीय जवानांची बर्फाच्छादीत डोंगर रागांमध्ये योगासनं.
#WATCH | Indian Army personnel perform Yoga in icy heights on the northern frontier on #InternationalYogaDay2024
(Source: Indian Army) pic.twitter.com/7zjIBfJ0Ye
— ANI (@ANI) June 21, 2024
10 व्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्ताने भाजपा नेत्या शायना एनसी आणि अन्य मुंबईत योगासन करताना.
#WATCH | BJP leader Shaina NC and others perform Yoga in Mumbai, on the occasion of International Day of Yoga. pic.twitter.com/DtcZXEg8Kt
— ANI (@ANI) June 21, 2024
10 व्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्ताने परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि अन्य राजनैतिक अधिकारी दिल्लीत योगासन करताना
#WATCH | EAM Dr S Jaishankar and other diplomats perform Yoga in Delhi, on the International Day of Yoga. pic.twitter.com/MSbucUs40x
— ANI (@ANI) June 21, 2024
15 हजार फुटापेक्षा जास्त उंचीवर असणाऱ्या सिक्कीच्या मुगुथांग सब सेक्टरमध्ये ITBP च्या जवानांनी 10 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने योगासनं केली.
ITBP personnel perform Yoga at Muguthang Sub Sector in Muguthang Sub Sector, Sikkim at an altitude of more than 15,000 feet, on the 10th International Yoga Day. pic.twitter.com/uDqlILQvUT
— ANI (@ANI) June 21, 2024
केंद्रीय आरोग्य मंत्री आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा दिल्लीत योग सत्रात सहभागी झाले आहे. आज आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे.
#WATCH | Union Health Minister JP Nadda participates in a Yoga session in Delhi, on the occasion of International Day of Yoga. pic.twitter.com/kmmUv4mPER
— ANI (@ANI) June 21, 2024