माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची आज कल्याणमध्ये सभा होणार आहे. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ठाणे जिल्ह्यात सभा होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आज काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे महाराष्ट्रात येणार आहेत. उद्या राज्यात चौथ्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्यात मतदान केंद्रावर मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बारामतीत अवकाळी पावसाची जोरदार हजेरी. अनेक घरांवरचे पत्रे उडाले. नुकसान भरपाई देण्याची नागरिकांची जोरदार मागणी. यासह राज्य आणि देशातील राजकीय घडामोडी जाणून घ्या.
नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिक दौऱ्यावर आहेत. एकनाथ शिंदे यांचा महिन्याभरात हा तिसरा नाशिक दौरा आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्री उदय सामंत ही बैठकीसाठी राहणार उपस्थित आहेत. महायुतीतील सर्वच घटक पक्षातील स्थानिक नेते उपस्थित आहेत.
भिवंडी लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांची जाहीर सभा होणार आहे. शहापूरमध्ये भव्य दिव्य जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलंय. महाविकास आघाडीचे नेते संजय राऊत जितेंद्र आव्हाड नाना पटोले हे सभेला उपस्थित राहणार आहेत. पंधरा हजार अधिक खुर्च्या सभेसाठी लावण्यात आल्या आहेत. सायंकाळी चार वाजता सभेला सुरुवात होणार आहे.
प्रियंका गांधी यांचं नंदुरबार येथील सभेपूर्वी धुळ्यात काँग्रेस कार्यकर्त्यांकडून सत्कार करण्यात आला आहे. प्रियंका गांधी यांच्या स्वागताला धुळे लोकसभेच्या काँग्रेसच्या उमेदवार शोभा बच्छाव मात्र अनुपस्थित आहेत. स्वागताप्रसंगी काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील शहराध्यक्ष खरं का उपस्थित बच्छाव मात्र अनुपस्थित आहेत. काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चर्चांना उधाण आलंय. काँग्रेसच्या प्रियंका गांधी देशाच्या नेत्या असताना काँग्रेसच्या धुळे लोकसभेच्या उमेदवार शोभा बच्छाव अनुपस्थितीत कशा? अशी चर्चा होऊ लागली आहे.
ज्वारीची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. मध्यंतरी ज्वारीच्या दराने प्रतिकिलो ८०-९० रुपयांपर्यंतचा उच्चांक गाठला होता. परंतु एपीएमसीत आता नवीन ज्वारीचे उत्पादन दाखल होत असल्याने दर आवाक्यात आले आहेत. घाऊक बाजारात ज्वारीची प्रतिकिलो ५०-६० रुपयांनी विक्री होत आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी शेगावात आहेत. कुटुंबासह दर्शन गजानन महाराजांचे घेतलं. निवडणूक नंतर गडकरी प्रथमच शेगावात आहेत. दुपारपर्यंत गडकरी मंदिरातच थांबणार असल्याची माहिती आहे.
भाजपचे खासदार सुभाष भामरे हे तिसऱ्यांदा धुळ्यातून उभे राहीले आहेत. नारबार प्रकल्प, धुळे जिल्ह्यासह मालेगाव जिल्ह्यातील पाण्याचे प्रश्न
येणाऱ्या काळात ते पूर्ण करतील असे भाजपाप्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.
ठाणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी नेरुळ पश्चिम येथे बैठक घेतली. महायुतीला अधिक मतदान व्हावे यासाठी प्रयत्न करण्याचे आव्हान यावेळी त्यांनी केले.
फडणवीस आणि महाराष्ट्र भाजप हे नेहमीच पडत्या काळात, अडचणीत ऊद्धव ठाकरेंसोबत राहतील. ठाकरेंनी महाआघाडीसोबत जात फोर मोठी चूक केली आहे, त्यामुळे त्यांना याचा फटका बसेल असे भाजपा नेते प्रसाद लाड यांनी म्हटले आहे.
दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पुत्र कुणाल टिळक यांनी पुणे लोकसभेचे भाजपा उमेदवार मुरलीधर मोहोळ विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला आहे.
संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची घेतलेली मुलाखत ही काळुबाळूचा तमाशा असल्याचा घनाघाती आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी केला आहे.
उत्तर मुंबई लोकसभेतील भाजपचे उमेदवार केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी आज मालाड, आक्सा, मढ परिसरात घरोघरी प्रचार आणि रोड शो केला. कोळी समाजाचा जो मुद्दा काँग्रेस काढत होता तो पूर्णपणे खोटा होता, या मुद्द्यावर लोकांचा विश्वास नाही आहे, लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे, असे पियुष गोयल म्हणाले.
निखिल यादव असं या तरुणाचे नाव असून तो काही मित्रानं सोबत पवना नदीत पोहण्यासाठी गेला होता. गेली आठ दिवसांपासून वातावरणात मोठा उकाडा जाणवत होता तर अंगाची लाहीलाई होत होती. अश्यातच निखिल यादव याने मित्रानं सोबत पोहण्याचा बेत आखला होता.
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या एक दिवस आधी पिंपरी चिंचवड शहरात जोरदार बॅनरबाजी पाहायला मिळत आहे. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कट्टर समर्थकांनी नवी सांगवी परिसरामध्ये बॅनरबाजी केली आहे.
शिरुर लोकसभा मतदार संघ हा शहरी आणि ग्रामीण आदिवासी डोंगराळ भागात विखुरलाय. त्यामुळे मतदान प्रक्रियेवेळी कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाकडुन 11 हजार 586 आधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले असुन 2 हजार 509 मतदान केंद्रावर 25 लाख 39 हजार मतदार आपल्या मतदानाचा आधिकार बजावणार आहेत. यावेळी कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी आणि मतदान प्रक्रियेवेळी अडथळा येऊ नये यासाठी पोलीसांचाही तगडा बंदोबस्त तैनात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या काशीत रोड शो करणार आहेत. यावेळी ते जनतेशी ते संवादही साधणार आहेत. त्यानंतर परवा म्हणजे मंगळवारी ते नामांकन अर्ज दाखल करणार आहेत. या दोन दिवसांच्या काळात मोदी वाराणासीत तळ ठोकून राहणार आहेत.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ते कसले फतवे काढत आहेत? लोकशाही वाचविण्यासाठी इंडिया आघाडीला मतदान करा, आता आम्हीही फतवा काढतो. तुम्ही कसलेही फतवे काढता? काही कळतं का त्यांना?, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
चौथ्या टप्प्यातील उद्या मतदान होत आहे. बीड लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. बीडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कर्मचाऱ्यांना ईव्हीएम मशीनचे वाटप करण्यात येत आहे. जिल्ह्यात एकूण 2 हजार 355 मतदान केंद्र आहेत.
छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघासाठी उद्या मतदान प्रक्रिया पार पडत आहे. यासाठी तब्बल 2040 मतदान केंद्रावर 12 हजार कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून मतदान प्रक्रिया पार पडली जाणार आहे. यासाठी तब्बल 5 हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले असून 20 लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. नागरिकांनी मोठ्या संख्येने बाहेर पडून मतदान करावे असे आव्हान छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे.
वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची आज पालघरमध्ये सभा होणार आहे. वंचितच्या उमेदवार विजया म्हात्रे ढीकर यांच्या प्रचारासाठी प्रकाश आंबेडकर पालघरमध्ये येणार आहेत. बोईसर येथील खैरापाडा मैदानावर ही सभा होणार आहे. आज दुपारी 2 वाजता ही सभा होणार आहे.
जळगाव जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर तब्बल पाच ते सहा हजारांपेक्षा जास्त अधिकारी कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. संवेदनशील केंद्रांवर सीआरपीएफ तसेच बीएसएफ जवान तैनात करण्यात आले आहेत. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाकडून संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यातील 3000 अधिकारी कर्मचाऱ्यांचा तर अमरावती, धुळे अशा बाहेरील जिल्ह्यांमधील पोलिसांचाही जिल्ह्यात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
आमदार गोपीचंद पडळकर नाशिकच्या भुजबळ फार्म या भुजबळांच्या कार्यालयात दाखल झाले आहेत. मंत्री छगन भुजबळांची भेट घेण्यासाठी गोपीचंद पडळकर नाशिकमध्ये दाखल झाले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट होत आहे.
नाशिक- आमदार गोपीचंद पडळकर हे मंत्री छगन भुजबळांची भेट घेणार आहेत. नाशिकच्या भुजबळ फार्म्स या त्यांच्या कार्यालयात ते भेट घेणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट घेणार असल्याची माहिती आहे. महायुतीतील अनेक मोठ्या नेत्यांनंतर गोपीचंद पडळकर हे छगन भुजबळांच्या भेटीला जाणार आहेत. चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, दादा भुसे यांच्यानंतर गोपीचंद पडळकर हे मंत्री छगन भुजबळांची भेट घेणार आहेत.
एकनाथ शिंदेंकडे स्वत:चं असं काही नाही. शिंदेंकडे मतंही नाहीत. शिंदेंची धावपळ ही अखेरची फडफड असेल. कारण महाराष्ट्रात शिंदे, अजित पवार गट एकही जागा जिंकणार नाही. पैशांच्या थैल्या वाटल्या तरी ते एकही जागा जिंकणार नाहीत. शिवसेना चोरणाऱ्यांच्या मागे लोकांनी का उभं राहावं, अशा शब्दांत संजय राऊतांनी टीका केली.
नाशिकमध्ये मोठा भूसंपादन घोटाळा झाला आहे. येत्या 14 मे रोजी हा घोटाळा उघड करणार आहे. 800 कोटी रुपये बिल्डरांना वाटले गेले आहेत. बिल्डर अचानक शेतकरी कसे झाले?, असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला.
कायदेविषयक चाचणी परीक्षा असलेली समाईक विद्यापीठ प्रवेश परीक्षा 2024 (सीयुईटी) आणि विधि पाच वर्षांच्या अभ्यासक्रमाची राज्य समाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) एकाच दिवशी येत आहे. त्यामुळे सीईटी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय सीईटी सेलने घेतला आहे. आतापर्यंत विधि पाच वर्षांच्या अभ्यासक्रमाची सीईटी परीक्षा तीन वेळा पुढे ढकलण्यात आली आहे. सध्या सुरू असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सीईटी सेलतर्फे घेत येणाऱ्या विविध परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पाऊस आणि गारपिटीचे असणार आहेत. हवामान विभागाने मध्य विदर्भाला अवकाळीसह गारपिटीचा आणि उर्वरित भागात अवकाळी पावसासाठी येलो आणि ऑरेंज अलर्ट दिला आहे. मुंबईत रविवारी, सोमवारी तर ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरीमध्ये बुधवारपर्यंत पावसाच्या हलक्या सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
हिंगोली जिल्ह्यात एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने 1 हजार 600 हेक्टरचे नुकसान झाले. त्याचा 2 हजार 834 शेतकऱ्यांना फटका बसला. नुकसान भरपाईसाठी 3 कोटी 39 लाख 57 हजार रुपये निधीची आवश्यकता आहे. जिरायतीचे 750 हेक्टर, बागायतीचे 745 तर 100 हेक्टरवरील फळपिकांचे नुकसान केले.
इलेक्ट्रिक वाहन चार्जिंगसाठी नागपूर जिल्ह्यात 53 चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले आहेत. ईव्ही वाहनाला आता महावितरणचे बुस्टर मिळणार आहेत. इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगसाठी लागणारी पायाभूत सुविधा उभारण्याची राज्याला नोडल एजन्सी म्हणून महावितरणला जबाबदारी सोपविण्यात आली आहे. महावितरणच्या पुढाकाराने नागपूर परिमंडळात एकूण 65 चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले आहेत
त्यातील 53 चार्जिंग स्टेशन नागपूर जिल्ह्यात आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अमित शाह यांच्यावर तुफान हल्ला चढवला. त्यांना महाराष्ट्रात ठाकरे-पवार हेच दिसत आहेत. त्यांना यंदा महाराष्ट्राचा शाप काय असतो ते लक्षात येईल, असा घणाघात त्यांनी केला.
राज्यात कोविड १९ च्या kp २ या व्हेरिएंटचे ९१ रुग्ण आहेत. एकट्या पुण्यात ५१ रुग्णांची नोंद झाली आहे ठाण्यात २० रुग्ण आहेत. अमरावतीत ७ आणि संभाजीनगरात ७ रुग्ण आहेत. KP २ हा वेरिएंट सर्रास यूएस मध्ये आढळून येतो.
बाळ जन्माला आल्यानंतर ते वयाची १६ वर्षे पूर्ण करेपर्यंत त्याचे विविध प्रकारच्या आजारांच्या प्रतिबंधासाठी लसीकरण करणे आवश्यक आहे. अशा लसीकरणासाठी मनपाच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच नागरी आरोग्य मंदिरांमध्ये व्यवस्था करण्यात आलेली आहे.मात्र लसीकरणासाठी आरोग्य यंत्रणेपर्यंत येउ न शकणा-या समुदायातील बालके लसीकरणापासून वंचित राहू नयेत यासाठी फिरते लसीकरण केंद्राद्वारे लसीकरणाला गती देण्यात आलेली आहे.
राज्यातील 26 जागांवर आरटीओ अधिकारी नाही.नागपूर,अमरावतीची जबाबदारी एकाच प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यावर आहे. प्रादेशिक परिवहन अधिकारी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, आणि सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अशा जागांवर अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. जागा रिक्त असल्याने पदोन्नती रखडली;कामे वाढली आहेत.
नाशिकमध्ये पहाटेपासूनच पावसाची रिमझिम सुरू आहे. गेल्या दोन दिवसांपासून नाशिक शहरात अवकाळी पावसाची हजेरी लावली. ढगाळ वातावरणामुळे उकड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला.
शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर पहिल्यांदाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे ठाण्यातील आनंद आश्रम या ठिकाणी आनंदी दिघे यांच्या प्रतिमेस अभिवादन करतील. त्यानंतर राज ठाकरे यांची कळव्यातील 90 फिट रोड येथे सभा होणार आहे. लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश मस्के यांच्यासाठी ही महायुतीची जाहीर सभा असणार आहे. त्यासाठी मोठी जय्यत तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे .मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे काय कानमंत्र देणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे..
औरंगजेबाचा मुद्दा हा निवडणुकीचा मुद्दा होऊ शकतो का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावरूनही त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. औरंगजेब हा प्रचाराचा मुद्दा होऊ शकतो का? हाच तर माझा मुद्दा आहे. तुम्ही 10 वर्ष काय केलं? हे सांगितलं पाहिजे. औरंगजेबाचं काय सांगत आहात? शेतकरी आत्महत्या करत आहेत. तिकडे हे लक्ष देत नाहीत.
2023 साली पीएमपीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत याला मान्यता देण्यात आली आहे. मात्र अजूनही या प्रस्तावावर निर्णय झालं नाही. पहिल्या टप्प्यात 20 इलेक्ट्रिक डबल डेकर बस घेण्याचा निर्णय आहे. मात्र आचारसंहितेमुळे हा निर्णय रखडल्याची प्रशासनाची माहिती आहे.
पुणे पोलीस दलातील 100 पेक्षा जास्त अधिकारी, 5 हजार 500 पोलीस अंमलदार, 2 हजार होमगार्ड, सीआयएसएफ आणिऔद्योगिक कंपन्यांचे सुरक्षा रक्षक असा शहरात बंदोबस्त असणार आहे. पुणे शहराच्या हद्दीत 2 हजार 18 मतदान केंद्र आहेत. पुणे पोलिसांची नागरिकांवर करडी नजर असणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही पोलीस काळजी घेणार आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून नाशिक शहरात अवकाळी पावसाची हजेरी सुरू आहे. ढगाळ वातावरणामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. आजही सकाळपासून जिल्ह्यात रिमझिम सुरू झाली आहे. अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडले आहेत.
ईव्ही वाहनाला आता महावितरणचे बूस्टर मिळणार आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगसाठी लागणारी पायाभूत सुविधा उभारण्याची राज्याला नोडल एजन्सी म्हणून महावितरणला जबाबदारी सोपविण्यात आली आहे.महावितरणच्या पुढाकाराने नागपूर परिमंडळात एकूण 65 चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले आहेत. त्यातील 53 चार्जिंग स्टेशन नागपूर जिल्ह्यात आहेत.