पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरण. पुणे पोलीस ‘एआय’द्वारे जिवंत करणार अपघाताची घटना. डिजिटल पुराव्यासाठी पोलिसांचा मोठा निर्णय. कल्याणीनगर अपघातातील दोषींना कडक शिक्षा व्हावी, यासाठी पोलिसांकडून तांत्रिक पुरावे गोळा करण्यावर भर. ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’ द्वारे जिवंत करणार अपघाताची घटना. ‘एआय’ मधील तज्ज्ञांसह वाहन आणि रस्ते वाहतुकीशी संबंधित केंद्रीय संस्थांची मदत घेतली जाणार. समृद्धी महामार्गावर ट्रकचा भीषण अपघात. वाशिमच्या कारंजा तालुक्यातील पोहा गावाजवळ घडला अपघात. या अपघातात एक जण जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी. नाशिकवरून नागपूरकडे ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रकने पाठीमागून समोर उभ्या असलेल्या ट्रकला दिली धडक. समृद्धी महामार्ग पोलीस व ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल. अडकलेल्या ड्रायव्हर आणि वाहकाला काढण्याचा जेसीबी द्वारे प्रयत्न. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.