लोकसभा निवडणुकीचा प्रचाराचा तिसरा टप्पा पूर्ण झाला. आता चौथ्या टप्प्यासाठी रणधुमाळी जोरात सुरु झाली आहे. तिसऱ्या टप्प्यातील राज्यातील ११ जागांसाठी उद्या ७ मे रोजी मतदान होणार आहे. त्यात देशाचे लक्ष लागलेल्या बारामती मतदार संघाचा समावेश आहे. बारामतीत एकूण 2516 मतदान केंद्रावर मतदान पार पडणार आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात 23 लाख 72 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस अलर्ट मोडवर आले आहे. पुणे शहरात 24 तास पोलिसांचा कडा पहारा आहे. मावळ लोकसभा महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पिंपरी चिंचवड शहरात येत आहे. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
एमआयएमचे उमेदवार अनिस सुंडकेंचा रविंद्र धंगेकरांवर गंभीर आरोप केलाय. रविंद्र धंगेकरांनी वक्फ बोर्डाची जमीन बळकवल्याचा आरोप सुंडकेंनी केला आहे. वक्फ बोर्डाची जमीन धंगेकरांच्या पत्नीच्या नावावर आहे. अनिस सुंडकेच्या आरोपांमुळे धंगेकरांच्या अडचणीत वाढ झालीय.
अहमदनगर जिल्ह्यात गुंडाराज वाढला असून या निवडणुकीत जनताच हा गुंडाराज संपवेल, अशी टीका महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी निलेश लंके यांच्यावर केलीय. विखे पाटलांच्या या टीकेला निलेश लंके यांच्यासह राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी जोरदार प्रतिउत्तर दिलंय. तर माझ्याविरोधात प्रधानमंत्र्यांसह अनेक मोठ्या नेत्यांच्या सभा होत आहेत. इथेच माझा विजय झाला असून माझा विजय फिक्स आहे, असा टोला देखील निलेश लंके यांनी लगावलाय.
पंजाबमध्ये काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. काँग्रेसचे युवा नेते चुस्पिंदरबीर चहल यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला आहे. आपल्या शेकडो मित्रांसह आम आदमी पक्षात प्रवेश केला आहे. त्यांचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी स्वागत केले आहे. चुस्पिंदर चहल हे युवक काँग्रेसचे सरचिटणीस आहेत.
गृहमंत्री अमित शाह यांच्या बनावट व्हिडिओप्रकरणी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने आरोपी अरुण रेड्डीला एक दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने रेड्डी यांना 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्याची मागणी केली होती.
टी20 विश्वचषकादरम्यान दहशतवादी हल्ल्याच्या धमकीनंतर बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला म्हणाले की, जिथे विश्वचषक स्पर्धा आयोजित केली जातात, त्या देशांच्या सुरक्षा यंत्रणांच्या सुरक्षेची जबाबदारी असते. अमेरिका आणि वेस्ट इंडिजच्या सुरक्षा यंत्रणांशी चर्चा केली जाणार आहे. आम्ही आयसीसीकडूनही माहिती घेऊ. खेळाडू आणि प्रेक्षकांच्या सुरक्षेसाठी जी काही पावले उचलावी लागतील ती आम्ही उचलू.
झारखंड सरकारच्या मंत्र्याच्या पीएस नोकराच्या घरावर ईडीच्या छाप्यात मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आली आहे. नोटा मोजण्यासाठी मोठे मशीन आणण्यात आले आहे. या मशिनद्वारे एकावेळी 4 नोटांचे बंडल मोजता येणार आहेत. याशिवाय 5 लहान नोटा मोजण्याचे यंत्र मागवण्यात आले असून ते नोटा मोजण्याचे काम करू शकतात. नोटा मोजण्यासाठी आतापर्यंत एकूण 7 मशिन्स वापरण्यात येत आहेत.
अनिल जाधव यांच्या माघारीसाठी शेवटच्या मिनिटाला पळापळ झाली. हेमंत गोडसे यांच्याकडून जाधव यांच्या माघारीचे प्रयत्न करण्यात आले. अवघा एक मिनिट शिल्लक असताना अनिल जाधव जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले मात्र वेळ कमी असल्याने जाधव यांच्यासह हेमंत गोडसे यांचीदेखील पळापळ झाली.
सुप्रिया सुळे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे. बारामती लोकसभेतील ३०० बूथपैकी १५३ बूथ संवेदनशील आहे. योग्य बंदोबस्त आणि गैरप्रकार रोखण्याची यंत्रणा लावा, असं सुप्रिया सुळे यांनी पत्रात म्हटलं आहे.
हरिश्चंद्र चव्हाण यांनी माघार घेतली आहे. हरिश्चंद्र चव्हाण दिंडोरी लोकसभेतून निवडणूक करणार होते. भाजपा पदाधिकाऱ्यांच्या मध्यस्तीला यश आलंय. भाजप उमेदवार भारती पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
महाविकास आघाडीच्या काँग्रेसच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांच्या प्रचारार्थ धुळ्यात उद्धव ठाकरे यांची सभा होत आहे. महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांकडून जागेची पाहणी केली जात आहे. उद्या ७ मे रोजी सभेचे आयोजन करण्यात आलं आहे. शहरातील जेल रोडवर दुपारी ४ वाजता सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. ठाकरे शिवसेना गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे सभेला संबोधित करणार आहेत.
निष्पाप नागरिकांना कसाबने मारले असल्याचे भाष्य नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
आज मला आनंद आणि अभिमान आहे की आज हा जाहीरनामा प्रकाशित होतो आहे. धंगेकर यांचे कार्य आणि त्यांचे शहराबद्दल असलेले प्रेम हे यातून दिसले आहे. देशाची लोकशाही वाचवण्यासाठी यंदाची निवडणूक आहे, असे शशी थरूर यांनी म्हटले.
उद्धव ठाकरे यांनी आनंद दिघेंना खूप जास्त त्रास दिल्याचे मोठे विधान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
शिरूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा आहे.
गुजरात: अहमदाबादमधील तीन शाळांना ईमेलद्वारे बॉम्बची धमकी देण्यात आली आहे. अहमदाबाद पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणाशी संबंधित ईडी आणि सीबीआय प्रकरणांमध्ये बीआरएस नेत्या के. कविता यांना जामीन देण्यास नकार दिला आहे. दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयाने जामिनास नकार दिला.
नाशिक- वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार करण गायकर यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. अंतरवली सराटीत रात्री उशिरा भेट घेत चर्चा केली. करण गायकर हे मराठा आरक्षणाच्या आंदोलनात सक्रिय होते. वंचितकडून उमेदवारी मिळाल्यानंतर करण गायकर आणि जरांगे पाटील यांच्यात भेट झाल्याने विविध राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. निवडणुकीत आशीर्वाद द्यावं यासाठी भेट घेतल्याची करण गायकर यांनी माहिती दिली.
मध्य आणि कोकण रेल्वेमार्गावरून पनवेल ते मडगाव आणि सावंतवाडी दरम्यान विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहेत. पनवेल- मडगाव विशेष रेल्वेगाडी पनवेल इथून 8 मे रोजी पहाटे 4 वाजता निघेल. ही गाडी त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजता मडगाव येथे पोहचेल.
पनवेल- सावंतवाडी रोड विशेष रेल्वेगाडी 6 मे रोजी रात्री 8 वाजता पनवेल इथून सुटेल. दुसऱ्या दिवशी ती गाडी सावंतवाडी रोडला सकाळी 6 वाजता पोहचेल. तसंच सावंतवाडी रोड- पनवेल विशेष गाडी 7 मे रोजी दुपारी 4 वाजता सावंतवाडी रोडवरून निघेल. दुसऱ्या दिवशी ही गाडी रात्री 3 वाजता पनवेलला पोहोचेल.
सोलापूर ग्रामीण भागात निवडणूक काळात 15 गँग्स आणि 56 लोकांना तडीपार केले आहे… निवडणूक प्रक्रिया सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी संबंधित कारवाई केलेली आहे…. मात्र तडीपार केलेल्या लोकांना मतदानाचा अधिकार आम्ही अबाधित ठेवला आहे…. जिल्ह्यातील संवेदनशील मतदान केंद्रावर पोलीस फोर्स तैनात करण्यात आला आहे.
सोलापूर लोकसभा मतदार संघात एकूण 1968 मतदान केंद्र… सोलापूर लोकसभेत एकूण 20 लाख 30 हजार 119 मतदार संख्या आहे… त्यापैकी 10 लाख 41 हजार 470 पुरुष मतदार तर 9 लाख 88 हजार 450 महिला मतदार आहेत… त्याचबरोबर 199 तृतीयपंथी मतदार आहेत… सोलापूर लोकसभा मतदारसंघात एकूण 8660 अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.
गेल्या २० दिवसात पवार साहेबांच्या ५५ सभा झाल्या आहेत. केवळ ४ तास ते झोपले… काही प्रमाणात घशाला इन्फेक्शन झालं आहे…. १ दिवसाचा आराम ते करणार आहेत… घरी बसून सुद्धा ते काम करत आहेत… असं वक्तव्य रोहित पवार यांनी केलं आहे.
ज्या व्यक्तींना प्रचारासाठी आणलं जात आहे त्यांना किमान उमेदवाराचे नाव सांगा. अशी परिस्थिती निर्माण होत असेल तर विरोधक मागे आहेत. अभिनेता गोविंदाला माहीत नाही म्हणजे बारणेंनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे… असं वक्तव्य संजोग वाघेरे यांनी केलं आहे.
नाशिक रोड परिसरात बारदानाच्या गोडाऊनला भीषण आग लागली आहे. नाशिक रोड परिसरात असलेल्या सुभाष रोड येथे घडली आगीची घटना घडली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आगीचे मोठमोठे लोट परिसरात पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आग नेमकी कशामुळे लागली हे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
फडणवीसांची शिवसेना म्हणत संजय राऊतांची शिंदे गटावर टीका. माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी शिंदे गटावर खालच्या शब्दात टीका केली.
भाजप उमेदवार सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे. दुपारी 1 वाजता मोदी यांचं सभास्थळावर आगमन होणार आहे. याआधी नगर शहरात मोदींच्या तीन सभा पार पडल्या आहे. उद्या होणाऱ्या सभेत नरेंद्र मोदी काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलंय.
पुणे-कोलाड राष्ट्रीय महामार्गावर पिरंगुट घाटात बसला लागली आग,स्वारगेट येथून निघालेल्या खासगी बसला भीषण आग लागली. सुदैवाने कोणालाही दुखापत झालेली नाही.
संपूर्ण बारामती तालुक्यात 380 मतदान केंद्र असणार आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर 5 कर्मचारी काम पाहणार. बारामती तालुक्यात एकच संवेदनशील मतदान केंद्र आहे सावंतवाडी. पोलीस बंदोबस्त चोख असणार आहे. सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची माहिती.
बारामतीतील एमआयडीसी गोडावूनवर मतपेट्यांच वाटप केलं जाणार. प्रशिक्षित कर्मचाऱ्यांना पोलीस बंदोबस्तात पेट्या दिल्या जाणार. ग्रामीण भागात आज पेट्या पोहोचणार. इलेक्शन सेंटरवर मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. मतपेट्यांच वाटप केलं जाणार आहे
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी उद्या मतदान. तिसऱ्या टप्प्यात कोल्हापूर, हातकणंगले आणि सांगलीमध्ये हाय व्होल्टेज लढती. कोल्हापुरात दुरंगी तर हातकणंगले आणि सांगलीमध्ये तिरंगी लढती. कोल्हापुरात शाहू छत्रपती विरुद्ध संजय मंडलिक. तर हातकणंगलेमध्ये ठाकरे गटाच्या सत्यजित पाटील सरूडकर महायुतीचे धैर्यशील माने आणि स्वाभिमानीच्या राजू शेट्टी मध्ये काटे की टक्कर. सांगलीमध्ये संजय काका पाटील विरुद्ध चंद्रहार पाटील आणि अपक्ष विशाल पाटलांमध्ये रंगणार सामना.
नाशिकच्या गंगापूर रोडवरील icici बँकेत मोठी चोरी. तब्बल 4.92 कोटी रुपयांच्या सोन्याची चोरी. सोने तारण शाखेत झाली चोरी, बँकेतील सीसीटीव्ही देखील आहेत बंद. माहितीगार व्यक्तीने चोरी केल्याचा पोलिसांना संशय. करोडो रुपयांच्या सोन्याची चोरी झाल्याने खळबळ. नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पोलिसांकडून अधिक तपास सुरू.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस अलर्ट मोडवर आले आहे. पुणे शहरात 24 तास पोलिसांचा कडा पहारा आहे. पुणे पोलिसांकडून शहरात 20 चेक पोस्ट उभारण्यात आल्या आहेत.
प्रत्येक चेक पोस्टवर वाहनांची पोलिसांकडून कसून तपासणी केली जात आहे.
नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे.
आज कोण अर्ज मागे घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महायुतीमध्ये भाजपाचे अनिल जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे निवृत्ती अरिंगळे यांनी बंडखोरी करत दाखल केला आहे.
नाशिकच्या गंगापूर रोडवरील icici बँकेत मोठी चोरी झाली. तब्बल 4.92 कोटी रुपयांचे सोन्याची चोरी झाली आहे. करोडो रुपयांचे सोन्याची चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
बारामती लोकसभा मतदार संघाच्या मतदानासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. 7 मे रोजी बारामती लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. एकूण 2516 मतदान केंद्रावर पार मतदान होणार आहे. मतदार संघातील 23 लाख 72 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. मतदानासाठी बारामती लोकसभा मतदारसंघात 13,000 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्त केली आहे.