Maharashtra Political News LIVE : पुणे कार अपघात प्रकरण, व्हायर व्हीडिओचा पोलिसांकडून तपास

| Updated on: May 26, 2024 | 8:03 AM

Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 25 मे 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Political News LIVE : पुणे कार अपघात प्रकरण, व्हायर व्हीडिओचा पोलिसांकडून तपास
Follow us on

लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्याचे मतदान आज सुरु झाले आहे. एकूण 58 जागांसाठी सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. त्यात उत्तर प्रदेशामधील 14 जागांचा समावेश आहे. एकूण आठ राज्यातील 58 जागांसाठी आज होणार मतदान होत आहे. त्यात मेनका गांधी, मनोज तिवारी, महबूबा मुक्ती, कन्हैया कुमार, बासुरी स्वराज यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघात सकाळपासून मतदारांची मोठी गर्दी केली. राजधानी दिल्लीतल्या सात लोकसभा मतदारसंघांमध्ये सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली. दिल्लीत भाजप आणि आप काँग्रेस आघाडी यांच्यातच मुख्य लढत आहे. नाशिक शहरात गेल्या पंधरा दिवसात डेंग्यूचे 19 रुग्ण आढळले आहे. पुण्यात स्वारगेट येथे अचानक झाड कोसळल्याने स्वारगेटहून हडपसरकडे जाणाऱ्या संपूर्ण मार्गाची वाहतूक विस्कळित झाली होती.यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 25 May 2024 04:21 PM (IST)

    नक्की अकाउंट कोणाचं? याची माहिती पोलिसांना मिळणार

    पुणे कार अपघात प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. पुणे पोलिसांनी इंस्टाग्रामला रील अकाऊंटची यूआरल लिंक पाठवली आहे. आता पोलिसांना इंस्टा अकाउंटबाबत अधिक माहिती अपेक्षित आहेत. नक्की अकाउंट कोणाचं आहे याची माहिती पोलिसांना मिळणार असल्याने अधिक तपास करता येणार आहे. तसेच सायबर पोलिसात या संदर्भात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

  • 25 May 2024 03:23 PM (IST)

    पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि संजय मंडलिक यांनी केलं पी एन पाटील यांच्या कुटुंबाचं सांत्वन

    कोल्हापूर – परदेश दौऱ्यावरून परतलेले पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि संजय मंडलिक आमदार पी एन पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केले आहे. गुरुवारी आमदार पी एन पाटील यांचे निधन झाले होते.


  • 25 May 2024 03:22 PM (IST)

    रामदेववाडी अपघात प्रकरणातील तिसरा आरोपी ध्रुव सोनवणे याला पोलीस कोठडी

    जळगावच्या रामदेववाडी अपघात प्रकरणातील तिसरा आरोपी ध्रुव सोनवणे याला 27 मे पर्यंत पोलीस कोठडी. जळगावच्या रामदेव वाडी येथे भरधाव कारणे दुचाकीला धडक दिल्याने महिलेसह तीन मुलांचा झाला होता मृत्यू.

  • 25 May 2024 02:58 PM (IST)

    मुंबई पदवीधर वा शिक्षक मतदार संघातून अजित गटाचे शिवाजीराव नलावडे ?

    मुंबई पदवीधर किंवा शिक्षक मतदार संघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सहकार नेते शिवाजीराव नलावडे यांचं पुढे असल्याची चर्चा आहे. कपिल पाटील यांच्या जागी त्यांची वर्णी लागणार असल्याची सूत्रांची माहीती

  • 25 May 2024 02:44 PM (IST)

    पुणे पोर्शे अपघात प्रकरणी ड्रायव्हरच्या पत्नीची चौकशी

    पुणे पोर्शे अपघात प्रकरणात पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून कारचा चालक गंगाराम पुजारी यांची पत्नी पार्वती पुजारी हीची देखील चौकशी होणार आहे.

  • 25 May 2024 02:18 PM (IST)

    मुंब्रा बायपास जवळ दोन ट्रकचा भीषण अपघात

    मुंब्रा बायपासजवळ दोन ट्रकचा भीषण अपघात होऊन त्यात एकाचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी झाले आहे. अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. स्थानिक नागरिकांनी जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे.

  • 25 May 2024 02:07 PM (IST)

    कोल्हापूरातील राजापूर बंधाऱ्यावर पोलीस बंदोबस्त

    कोल्हापूरातील शिरोळ तालुक्यातील राजापूर बंधाऱ्यावर पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावला आहे. कर्नाटकमधील अज्ञातांकडून होणारी पाणी चोरी टाळण्यासाठी या बंधाऱ्यावर बंदोबस्त लावला आहे.

  • 25 May 2024 01:57 PM (IST)

    कोळश्याच्या ट्रकला आग…

    अमरावतीच्या गुरुकुंज मोझरी येथील दासटेकडीजवळ कोळश्याचा मोठा ट्रक पेटला. तीन अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझविण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. कोळशाला ट्रकाला लागलेल्या आगीत सुदैवाने जीवितहानी नाही.

  • 25 May 2024 01:45 PM (IST)

    सुरेंद्र कुमार अगरवालच्या घरातील छापेमारीबाबतची अपडेट…

    सुरेंद्र कुमार अगरवालच्या घरातील छापेमारी संपली. घरातून सीसीटीव्ही फुटेजचा डाटा जप्त करण्यात आला आहे. घरातील नोकरांची देखील चौकशी करण्यात आली आहे. गरज पडल्यास या सगळ्या कर्मचाऱ्यांना पोलीस आयुक्तलयात बोलावून जबाब घेण्यात येणार आहे.  तसेच घरातील गेटवर असणारे रजिस्टर देखील जप्त करण्यात आलं आहे. सुरेंद्र कुमार यांच्यावर त्यांच्या वाहन चालकाला घरात डांबून ठेवल्याचा आरोप करण्यात आलाय.

  • 25 May 2024 01:30 PM (IST)

    छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला दुष्काळाच्या झळा

    छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दुष्काळामुळे मोसंबीच्या बागा वाळल्या आहेत. जेसीबीच्या सहाय्याने मोसंबीची बाग उध्वस्त करायला सुरुवात केली आहे. काद्राबाद शिवारात जेसीबीच्या साहाय्याने मोसंबी बाग काढायला सुरुवात झाली आहे.  पाणी नसल्यामुळे शेतकऱ्यांकडून बाग उध्वस्त केली जात आहे. पोटाच्या मुलाप्रमाणे पोसलेली मोसंबीची झाडे उध्वस्त करायाला सुरुवात केली आहे.

  • 25 May 2024 01:15 PM (IST)

    वेदांत अगरवाल व्हायरल रील प्रकरणी मोठी अपडेट

    वेदांत अगरवाल व्हायरल रील प्रकरणी पुण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अल्पवयीन आरोपीच्या दिसण्याचे साधर्म्य ठेऊन अश्लील रील केल्याप्रकरणी आणि ते प्रसारित केल्याप्रकरणी करणाऱ्यांविरोधात सायबर पोलीस ठाण्यात २९४ बी ,५०१,६७ आयटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 25 May 2024 01:00 PM (IST)

    27 मे रोजी लागणार दहावीचा निकाल

    27 मे रोजी लागणार दहावीचा निकाल, दुपारी एक वाजता लागणार दहावीचा निकाल

  • 25 May 2024 12:33 PM (IST)

    सुरेंद्र अग्रवाल यांनी चालकाला दोन दिवस ठेवले डांबून 

    सुरेंद्र अग्रवाल यांनी चालकाला दोन दिवस ठेवले डांबून, अशी मोठी माहिती पोलिस आयुक्तांनी दिली आहे.

  • 25 May 2024 12:29 PM (IST)

    सुरेंद्र अग्रवाल यांची चालकाला धमकी

    सुरेंद्र अग्रवाल यांनी चालकाला धमकी दिलीये, असे पुणे पोलिस आयुक्त यांनी म्हटले आहे.

  • 25 May 2024 12:20 PM (IST)

    सुरेंद्र अग्रवाल यांच्या घरावर छापेमारी

    सुरेंद्र अग्रवाल यांच्या घरावर सध्या छापेमारी सुरू आहे. विशाल अग्रवालने लपवलेला मोबाईल सापडला आहे.

  • 25 May 2024 12:07 PM (IST)

    कर्नाटककडून महाराष्ट्रातून पाणी चोरी

    कोल्हापुरातल्या राजापूर बंधाऱ्यावर पाण्याच्या सुरक्षिततेसाठी पोलीस बंदोबस्त. महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर राजापूर येथे कृष्णा नदीवर असलेल्या शेवटच्या बंधाऱ्यावर बंदोबस्त

  • 25 May 2024 12:04 PM (IST)

    Live Update : डोंबिवलीतील आग दुर्घटनेट आणखी काहीजण बेपत्ता असल्याचं समोर

    डोंबिवलीतील आग दुर्घटनेट आणखी काहीजण बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे. घरातील सदस्यांचा शोध घेण्यासाठी कुटुंबीय घटनास्थळी आले आहेत. पण घटनास्थळी पोलीस गैरवर्तन करत असल्याचा कुटुंबीयांचा आरोप…

  • 25 May 2024 11:45 AM (IST)

    Live Update : नागपूर हिट अँड रन प्रकरणात मोठी अपडेट

    नागपूर हिट अँड रन प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. दाम्पत्याला धडक दिलेल्या आरोपींवर NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करणार… नागपूरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल… आज तिन्ही आरोपींना पोलीस कोर्टात हजर करणार…

  • 25 May 2024 11:33 AM (IST)

    Live Update | ठाकरे गटातील पांडुरंग सकपाळ यांचं अल्पशा आजाराने

    उद्धव ठाकरे यांच्या गटातील माजी विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ यांच अल्पशा निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून सकपाळ यांच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरू होते.

  • 25 May 2024 11:04 AM (IST)

    Live Update | राज्य उत्पादन शुल्क विभागाने बारवाल्यांचे लाइसन्स तपासायला केली सुरुवात

    राज्य उत्पादन शुल्क विभागाने बार वाल्यांचे लाइसन्स तपासायला केली सुरुवात… पुणे शहर आणि जिल्ह्यातील सगळ्या बारवाल्यांचे लायसन तपासणार… नियमबाह्य पब, बारची यादी उत्पादन शुल्क विभाग देणार जिल्ह्याधिकाऱ्यांना यादी

  • 25 May 2024 11:00 AM (IST)

    प्रतिक्षा मान्सूनची, मिळाला यलो अलर्ट

    मुंबईकरांची पावसाची प्रतिक्षा लांबणीवर पडली आहे, मुंबईत मान्सून जूनच्या दुसऱ्या आठवड्यात दाखल होणार आहे. आजचा दिवसही डोक्याला ताप वाढवणारा असेल. तापमान ३६ अंशापर्यंत राहील तर आर्द्रताही ६० टक्क्यांहून जास्त असेल.मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्याला, बूधवारपर्यंत उष्ण आणि दमट वातावरणाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.

  • 25 May 2024 10:50 AM (IST)

    डोंबिवली कंपनी स्फोटात आठ जणांचा मृत्यू

    डोंबिवली केमिकल कंपनी स्फोटात आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला. तर 26 जणांवर अजूनही उपचार सुरू आहे. एकूण 64 जण जखमी होते त्या पैकी 42 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 26 जणांवर अजूनही उपचार सुरू, यात बारा जण गंभीर अवस्थेत आय सी यु मध्ये दाखल आहेत.

  • 25 May 2024 10:40 AM (IST)

    रत्नागिरीत अनेकांना कोट्यवधींचा चूना

    आरजू टेक्सोल कंपनीने रत्नागिरीतील शेकडो जणांना कोट्यवधी रुपयांचा चूना लावला. एका गुंतवणूकदाराची १८ लाखांची फसवणूक झाल्याने त्याने पोलिसांत तक्रार दिली होती. कच्चा माल देऊन तयार माल तयार घेण्याचं खोटं आश्वासन कंपनी संचालकांनी दिले होते.

  • 25 May 2024 10:30 AM (IST)

    डोंबिवली केमिकल कंपनी स्फोट प्रकरणात स्पेशल टास्क फोर्स

    डोंबिवली केमिकल कंपनी स्फोट प्रकरणाच्या तपासाकरीता स्पेशल टास्क फोर्स तयार करण्यात आले आहे. या विशेष पथकाकडे तपास सोपविण्यात आला आहे. या टास्क फोर्स मध्ये ठाणे खंडणी विरोधी पथक आणि ठाणे गुन्हे शाखा तपास करत आहे. ⁠ठाणे खंडणी विरोधी पथकाने आणि गुन्हे शाखेने मलय मेहता आणि मालती मेहता यांना अटक केली आहे.

  • 25 May 2024 10:20 AM (IST)

    कल्याणी नगर अपघात प्रकरणी आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना अटक

    वेदांत अगरवाल याचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना अटक करण्यात आली. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली. सुरेंद्रकुमार अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांनी चालकाचे अपहरण करत डांबून ठेवले होते. बंगला देतो असं अमिष दाखवत अपघाताची जबाबदारी स्वीकारण्यासाठी दबाव टाकला होता.त्या चालकाचे मोबाईल फोन काढून घेत दोन दिवस डांबून ठेवलं होते.

  • 25 May 2024 10:10 AM (IST)

    नवी मुंबईत 40 किलो प्लास्टिक जप्त

    नवी मुबंई महानगरपालिकातर्फे एकल वापर प्लास्टिक प्रतिबंधात्मक कारवाईत 85 हजार दंडात्मक रक्कम तसेच 39.750 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. एकल वापर प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमेअंतर्गत 15 ते 22 मे 2024 या आठवड्याभराच्या कालावधीत विभागीय कार्यक्षेत्रात 71 ठिकाणी तपासणी करण्यात आली. दंडात्मक कारवाई तसेच प्लास्टिक जप्तीची कारवाई करण्यात आली.

  • 25 May 2024 10:00 AM (IST)

    डोंबिवली स्फोट; मानवी अवयव सापडणे सुरुच

    डोंबिवली एमआयडीसीत स्फोट होऊन कित्येक तास उलटून गेले. पण अजूनही घटनास्थळावरुन मानवी अवशेष सापडत असल्याने सर्वांचाच थरकाप उडाला आहे. प्रकरणात कंपनीच्या मालकांविरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.

  • 25 May 2024 09:55 AM (IST)

    6th Phase Voting : वेदांतचे आजोबा सुरेंद्र अगरवालला अटक

    वेदांत अगरवाल याचे आजोबा सुरेंद्र अगरवालला अटक. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई. सुरेंद्रकुमार अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांनी चालकाचे अपहरण करत डांबून ठेवले. बंगला देतो असं अमिष दाखवत अपघाताची जबाबदारी स्वीकारण्यासाठी दबाव टाकला. त्या चालकाचे मोबाईल फोन काढून घेत दोन दिवस डांबून ठेवलं होतं.

  • 25 May 2024 09:54 AM (IST)

    6th Phase Voting : राहुल गांधींचा आईसोबत सेल्फी

    काँग्रेस संसदीय पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर एकत्र सेल्फी काढला.

  • 25 May 2024 09:25 AM (IST)

    Maharashtra News : पुण्याप्रमाणे नागपुरातही हिट अँड रनची घटना

    पुण्यातील हिट अँड रन प्रकरण ताजं असताना, रात्री नागपुरात सुद्धा झेंडा चौकामध्ये अशाच पद्धतीची घटना घडली आहे. दारू आणि गांजा सेवन करून बेदराकरपणे वाहन चालवणाऱ्यांनी पायदळी जाणाऱ्या तिघांना उडवलं आहे. कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये तिन्ही आरोपींवर एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

     

  • 25 May 2024 09:12 AM (IST)

    6th phase voting : देशात आज सहाव्या टप्प्यात किती जागांवर मतदान?

    आज देशात सहाव्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. सहा राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेश मिळून लोकसभेच्या 58 जागांसाठी मतदान होत आहे. दिल्लीमध्ये 7, उत्तर प्रदेशात 14, हरियाणामध्ये 10, बिहार-पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी आठ, ओदिशा सहा, झारखंड चार आणि जम्मू-काश्मीरमध्ये एका जागेवर मतदान होत आहे.

  • 25 May 2024 08:55 AM (IST)

    Marathi News: अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेस सुरुवात

    माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाकडून अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आल्यानंतर २४ मे पासून अकरावी प्रवेशाचा भाग एक भरण्यास सुरुवात झाली. त्यानुसार पहिल्याच दिवशी ८ हजारांवर विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशासाठी नोंदणी करत अर्जाचा पहिला भाग भरण्यास सुरुवात केली. दहावीचा निकाल सोमवारी दि. २७ मे रोजी आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर लगेच अर्जाचा दुसरा भाग विद्यार्थ्यांना भरता येणार आहे.

  • 25 May 2024 08:41 AM (IST)

    Marathi News: मान्सूनपूर्व कामांची मध्य रेल्वेची तयारी

    मान्सूनपूर्व कामांची जोरदार तयारी मुंबईत मध्य रेल्वेकडून सुरु असलेली पाहायला मिळते आहे. यंदा लोकल बंद पडू नये यासाठी वॉटर पंप बसवण्यात येणार आहेत. त्यामुळे रेल्वे रुळावर पाणी साचू नये याची काळजी मध्य रेल्वे कडून घेतली जाणार असल्याच पाहायला मिळत आहे.

  • 25 May 2024 08:24 AM (IST)

    Marathi News: वसमतजवळ अपघात, एकाचा मृत्यू

    वसमत शहरालगत असलेल्या जवळा खंदारबन रोड परिसरामध्ये रस्त्याच्या कडेने जाणाऱ्या दुचाकीला बोलेरो धडकली असून असून या अपघातामध्ये एक जण ठार झाला तर दोघेजण गंभीर जखमी आहेत. अपघातामध्ये माधव क्षीरसागर हा तीस वर्षाचा तरुण जागीच ठार झाला आहे.

  • 25 May 2024 08:14 AM (IST)

    Marathi News: नाशिकमध्ये आज पाणी नाही

    नाशिक शहरात आज पाणीपुरवठा बंद असणार आहे. तसेच उद्या होणार कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. वितरण वाहिन्या आणि व्हॉल्वहच्या दुरुस्तीमुळे आज नाशिक शहरात पाणीपुरवठा बंद ठेवला आहे.