लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्प्यातील प्रचारतोफा आज थांबणार आहेत. या टप्प्यात महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील एकूण ४९ जागांवर मतदान होणार आहे. प्रचाराचा आज शेवटचा दिवस असल्यामुळे उमेदवार विविध पद्धतीने प्रचार करत आहेत. उत्तर मुंबई लोकसभा भाजपचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल हे बोरिवलीच्या राष्ट्रीय उद्यानात मॉर्निंग वॉक करताना लोकांशी चर्चा केली. विदर्भात मे महिन्यात पावसाचे सावट कायम आहे. आजपासून पुढील दोन दिवस विदर्भात येलो अलर्ट देण्यात आला आहे. राज्यात आरटीई प्रक्रिया सुरू करण्यात आली. पहिल्याच दिवशी पुण्यात 5 हजार अर्ज आले आहे. पहिल्याच दिवशी रात्री आठ वाजेपर्यंत राज्यभरातून 23 हजार 536 अर्ज जमा झाले. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
यूपीच्या बांदामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर म्हणतात, पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे, पीओके मागू नका. अहो मणिशंकर अय्यर, आम्ही भाजपचे आहोत, आम्हाला घाबरायचे कसे माहित नाही, घाबरायचे असेल तर घाबरा. पीओके भारताचा आहे, भारताचाच राहील आणि पीओके मिळवूनच राहू.
सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव बलरामपूरमध्ये म्हणाले की, भाजप हरत नाही, भाजपचा निवडणुकीत पराभव झाला आहे. त्याची उलटी गिनती सुरू झाल्याचे त्यांच्या भाषेवरून आणि बोलण्यावरून संपूर्ण देशातील जनतेला कळून चुकले आहे. जेवढ्या उंचीवर पोहोचायचे होते तितके ते गेले, आता घसरू लागले आहेत. हे लोक ‘400 पार’ म्हणजे 543 पैकी 400 नंतरच्या जागा जिंकतील. यावेळी ते (भाजप) 140 जागांसाठी आसुसले आहेत.
अंबाला येथील जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, शेतकऱ्यांचे कल्याण हे मोदींचे प्राधान्य आहे. काँग्रेसच्या काळात 2014 पूर्वीच्या 10 वर्षांत देशातील शेतकऱ्यांकडून केवळ 7.5 लाख कोटी रुपयांचे धान्य एमएसपीवर खरेदी करण्यात आले होते. गेल्या 10 वर्षात आम्ही शेतकऱ्यांकडून एमएसपीवर 20 लाख कोटी रुपयांचे धान्य खरेदी केले.
आसामचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, महाराष्ट्राचे सरकार पडले तर ते चांगले होते की नाही, त्यात वाईट काय होते? महाराष्ट्र सरकार पडल्यामुळे आज महाराष्ट्र प्रगतीपथावर आहे. उद्धव ठाकरे हे तुष्टीकरणाचे राजकारण करत आहेत.
20 तारखेला मशाल-तुतारीला मत द्या, असं आवाहन महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यानी मतदारांना केलं आहे. माझी आई महाराष्ट्रीय वडील गुजराती म्हणून मी खरा मुंबईकर आहे. माझ्या परिवारावर ठाकरे परिवाराचे खूप मोठे उपकार आहे. प्रबोधनकार ठाकरे यांनी माझ्या आजोबांचे जीव वाचवले आहे. ते सैदव उपकार मानतो, म्हणून आता तो बोझ कमी करण्यासाठी प्रचारात आलोय, असं तुषार गांधी यांनी म्हटलं.
“तसेच आज संविधान धोक्यात आहे. राष्ट्र आणि संविधानावर खतरा आहे. इंडिया आघाडीला महाविकास आघाडीला आपले मत द्या, ही निवडणूक धर्मयुद्ध पेक्षा कमी नाही. सर्व उमेदवार सक्षम आहे. समोर सर्व उमेदवार इम्पोर्ट केलेलं आहेत. 20 तारखेला भारी संख्येने मशाल आणि तुतारी ला मतदान द्या, महाविकास आघाडीला मत”, असंही तुषार गांधी यांनी नमूद केलं.
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील प्रचाराचा आजचा अखेरचा दिवस आहे. या अखेरच्या दिवशी योगी आदित्यनाथ यांनी महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी जाहीर सभेत बोलताना काँग्रेसवर राम मंदिरच्या मुद्द्यावरुन हल्लाबोल केला आहे.” मी मागील वेळी आलो होतो तेव्हा संध्याकाळी आलो होतो. मी आता लोकसभा निवडणुकीसाठी दुपारी आलो आहे. मी मागच्या वेळी आलो होतो तेव्हा काँग्रेसचा सूर्यास्त करण्यासाठी आलो होतो. राम मंदिर मोदींनी बनवले. उद्धव ठाकरे आणि शरद पवार काय म्हणायचे की 100 जन्म घेतले तरी मंदिर बनवणार नाही. आम्ही जे बोललो ते करून दाखवतो”, असं योगींनी म्हटलं.
“काँग्रेस सरकार आले तर राम मंदिरचे काय करायचे हे आम्ही ठरवू असे म्हणतात. पण राम लल्ला तुम्हाला दिल्लीत पोहचू देणार नाहीत”, असं म्हणत केंद्रात पुन्हा मोदी सरकार येणार, असा विश्वास योगींनी व्यक्त केला.
गोरेगाव ते अंधेरीकडे जाणाऱ्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर लांबच लांब वाहतूक कोंडी. आरे कॉलनी पूल ते जोगेश्वरीपर्यंत वाहतूक कोंडी. लोकं तासनतास ट्रॅफिकमध्ये अडकले आहेत, रुग्णवाहिकाही ट्रॅफिकमध्ये अडकल्या आहेत.
भारताला विकसित भारत फक्त मोदी करू शकतात. विरोधकांकडे आता प्रश्न संपले आहेत. ते आता दिशाभूल करतील. ही गांधींची काँग्रेस नाही. कारण गांधी यांनी 1947 मध्येच ती विसर्जित करायला सांगितली होती. पण आता वेळ आली आहे काँग्रेसला विसर्जित करण्याची.
भाजपचे उत्तर मध्य मुबंईचे लोकसभा उमेदवार उज्ज्वल निकम यांच्या प्रचारार्थ युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची जाहीर सभा होत आहे. कुर्ला पश्चिम येथे ही सभा होणार आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण लोळसभेत पोलिसांनी रुटमार्च केला आहे. नागरिकांनी निर्धास्तपणे मतदान करण्याचे पोलिसांचे आवाहन आहे.
कल्याण लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी १९६० केंद्र मतदानासाठी यंत्रणा सज्ज आहेत. १०१२ मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही आणि वेब कास्टींगची सुविधा. कल्याण लोकसभा मतदार संघ निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते याची माहिती.
विठ्ठल भक्तांसाठी आनंदाची बातमी… श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दोन जून पासून पदस्पर्श दर्शन सुरू होणार आहे. 15 मार्चपासून विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन बंद होतं. मंदिर जतन आणि संवर्धनाची कामे सुरू असल्याने श्री विठ्ठलाचे पदस्पर्श बंद दर्शन होतं. आता ते सुरु होणार असल्याची माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिलीय.
फ्लेमिंगो पक्षी हा साधारणतः थंडीच्या काळात उजनी जलाशयात पाहायला मिळतो. डिसेंबर ते एप्रिल महिन्यापर्यंत फ्लेमिंगो पक्षी उजनी जलाशयामध्ये आढळतात. नंतर त्यांचा परतीचा प्रवास सुरू होतो. परंतु मे महिना आला तरी इंदापूर तालुक्यातील पळसदेव येथे सध्या फ्लेमिंगो पक्षी आढळून येत आहेत.
जळगाव जिल्ह्यात सूर्य ओकतोय आग. दोन ते तीन दिवस ढगाळ वातावरणामुळे नागरिकांना मिळाला होता तापमानापासून दिलासा. आता पुन्हा तापमानाचा पारा वाढलाय.
पुण्यात वानवडी पोलीस ठाणे हद्दीत 5 ते 7 अनोळखी आरोपींनी मास्क लावून मोहम्मदवाडी रोड वारकर मळा येथील बी जी एफ ज्वेलर्स या ठिकाणी दरोडा टाकून 300 ते 400 ग्राम सोने नेले चोरून.
नाशिकच्या सातपूरमध्ये वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या सभेचे आयोजन. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार करण गायकर यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन. प्रकाश आंबेडकर जनतेला स्वतः संबोधित करणार
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत नापास झाल्याने जळगावच्या शिरसोली येथील २५ वर्षीय तरुणाने जीवन संपवले. स्पर्धा परीक्षेमध्ये तीन मार्क कमी मिळाल्याने तरुणाने घेतला टोकाचा निर्णय.
जळगावात महानगरपालिकेच्या बांधकाम व नगररचना विभागाच्य अभियंते शहरातील होर्डिंग्जची तपासणी करणार आहेत. त्यासाठी सात पथक तयार करण्यात आली आहेत. मुदत संपल्यानंतरही सांगाडे अजूनही उभेच असल्याने तपासणी करण्यात येणार आहे.
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल प्लॉट क्रमांक १० आणि ११ विस्तारीकरणाच्या कामामुळे पुणे ते मुंबई दरम्यान धावणारी डेक्कन क्वीन दोन दिवस तर प्रगती सहा दिवस रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
पालघर लोकसभा मतदार संघातील महायुती भाजपाचे उमेदवार डॉ. हेमंत सावरा यांच्या प्रचारासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची आज नालासोपाऱ्यात जाहीर सभा होणार आहे.
उद्धव ठाकरे चिडलेले आहेत घाबरलेले आहेत. त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. चोरांचे सरदार कोण आहेत राज्याने पाहिले आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना राज्य लुटले मुंबई मनपा लुटली गेली, असा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महायुतीवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. धमकी, आमिषं दाखवून विरोधकांना फोडण्यात आल्याचा घणाघात त्यांनी केला. त्यांनी ही भाजपची तोडफोड नीती असल्याचा आरोप केला.
भारतीय जनता पार्टी पक्ष मिंधे गट अजित पवारांचा गट त्यांचा मुख्य हत्यार या लोकशाहीत पैसे वाटणे आणि धमक्या देणे हेच सुरु असल्याचा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला. अजित पवारांनी बारामती मध्ये कसे पैसे वाटले हे बघितलं आणि 12 वाजेपर्यंत बँका चालू ठेवल्या, असे ते म्हणाले.
खोटं बोलणं ही मोदींची सवय आहे. मोदी लोकांना मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करत आहेत अशी टीका मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली.
4 जूनला आपल्या देशातलं जुमला पर्व संपेल आणि अच्छे दिनाची सुरुवात होईल कारण इंडिया आघाडीचं सरकार येईल.
महाराष्ट्रात 48 पैकी आम्हाला कमीत कमी 46 जागा मिळतील अशी हवा आहे, असा दावा मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला.
महाराष्ट्रात बेकायदेशीर महायुती सरकार बनलं, त्याच समर्थन खुद्द पंतप्रधान करत आहेत. त्यांच्या बऱ्याच सभा महाराष्ट्रात होत आहेत. पंतप्रधान मोदी जिथे जातील तिथे लोकांमध्ये दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. समाज तोडण्याची भाषा वापरतात, अशी टीका मल्लिकार्जुन खर्गे यांनी इंडिया आघाडीच्या पत्रकार परिषदेत केली.
मुंबईत थोड्याच वेळात इंडिया आघाडीची पत्रकार परिषद सुरू होणार आहे. शरद पवार, रमेश चेन्नीथला, मल्लिकार्जुन खर्गे, संजय राऊत दाखल झाले आहेत.
सुरूवातीला भारतीय जनता पक्ष हा कमी ताकदवान होता, आम्हाला संघाची गरज होती. आता आम्ही सक्षम आहोत. स्वत: स्वत:ला चालवणारा पक्ष अशी भाजपची ओळख झालेली आहे, असं वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी केलं. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे मोठं विधान केलंय.
उद्धव ठाकरे चिडले आहेत, घाबरले आहेत अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना राज्य लुटले, मुंबई मनपा लुटली गेली असा आरोपही त्यांनी केला.
स्ट्रक्चरल ऑडिट केले नसल्याने संभाजी नगरात धोकादायक होर्डिंग… कमकुवत पायांवर होर्डिंगची उभारणी केली असल्याचे आले आढळून… एकाही होर्डिंगचे गणितीय पद्धतीने स्ट्रक्चर तयार केले नसल्याचे आले आढळून… संभाजी नगरात होर्डिंग ऑडिटकडे करण्यात येते पूर्णपणे दुर्लक्ष… मुंबईच्या घटनेनंतर संभाजी नगरात ऑडिट गांभीर्याने घ्यावे अशी नागरिकांची मागणी
गर्भलिंग निदान आणि बेकायदेशीर गर्भपात केल्याच्या संशयावरून डॉक्टरांसह तीन एजंटना अटक… प्रयाग चिखली इथल्या एजंटकडून बेकायदेशीर गर्भपात करण्यासाठीच्या गोळ्या केल्या जप्त…. पोर्टेबल सोनोग्राफी मशीन आणि गर्भलिंग निधनासाठीचे इतर साहित्य पोलिसांनी केले जप्त… गारगोटी परिसरात गर्भलिंग निदान आणि गर्भपाताचे रॅकेट सुरू असल्याचा पोलिसांचा संशय
लोकसभेच्या पाचव्या टप्प्याच्या प्रचाराची आज सांगता… नाशिक जिल्ह्यात उडणार प्रचार सभांचा धुराळा… धुळे लोकसभा महायुतीचे उमेदवार प्रचारार्थ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची आज मालेगावात सभा..
पुणे महानगरपालिका प्रशासनाकडून नऊ अनधिकृत होल्डिंगवर कारवाई… 72 धोकादायक फलकांना महापालिकेकडून नोटीसा… यामध्ये कोथरूड, वानवडी, वारजे या भागात मोठी कारवाई करण्यात आली… शिवाय स्ट्रक्चरल ऑडिट विना उभ्या असलेल्या होल्डिंग कंपन्यांना नोटीस बजावण्यास सुरुवात…. परवाना व आकाशचिन्ह विभागाचे प्रमुख माधव जगताप यांची माहिती…
डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अंतर्गत असलेल्या बुलढाण्याच्या कृषि विज्ञान केंद्र येथे जिल्ह्यातील शेतकरी तसेच आंबा प्रेमींसाठी एकदिवसीय भव्य आंबा महोत्सव, तसेच आंबा प्रदर्शनी व विक्रीचे आयोजन करण्यात आले होते. शेतकऱ्यांना आपल्या शेतात आंबा लागवडीला वाव मिळावा तसेच आंब्याच्या प्रजातींना ओळख मिळावी, या उद्देशाने हा आंबा महोत्सव आणि प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते
एचडीएफसी बँकेचा अधिकारी असल्याची बतावणी करून भामट्याने पेट्रोलपंप (ठाणा) येथील एकाची १ लाख ३७ हजार २२९ रुपयांनी फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. अज्ञात भामट्याने पेट्रोलपंप (ठाणा) येथील श्याम पंजाबराव चव्हाण यांच्याशी मोबाइलवरून संपर्क साधून एचडीएफसी बँकेचा अधिकारी असल्याची बतावणी करून त्यांना विश्वासात घेतले. आरोपीने श्याम चव्हाण यांच्याकडून क्रेडिट कार्ड क्रमांक, सीव्हीव्ही नंबर, दिनांक प्राप्त करून क्रेडिट कार्डवरून १ लाख ३७ हजार २२९ रुपये काढून फसवणूक केली.
परभणीत अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यांचा फटका शेती पिकांना बसत आहे. परिणामी भाजीपाल्याच्या दरांमध्ये मोठी वाढ झाल्याचा पाहायला मिळते. 25 ते 30 किलोने विक्री होणाऱ्या भाज्या 50 ते 70 ने विक्री होत आहे. तर कोथिंबीर 150 किलो ने विक्री होत आहे. भाजीपाल्याच्या दरांमध्ये वाढ झाल्याने गृहणींचा बजेट कोलमडलाय.
विदर्भात मे महिन्यात पावसाचे सावट कायम आहे. आजपासून पुढील दोन दिवस विदर्भात यलो अलर्ट दिला आहे. विदर्भात वादळी पावसाची शक्यता नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केली आहे. मे महिन्याचा पंधरवडा लोटूनही विदर्भात उन्हाळ्याच्या तीव्रतेऐवजी सातत्याने वादळीवाऱ्यासह गारपीट अनुभवायला येत आहे.