Maharashtra Political News live : बेळगाव, कारवार बीदरसह संयुक्त महाराष्ट्राच स्वप्न अजून अपूर्ण – अजित पवार

| Updated on: May 02, 2024 | 10:15 PM

Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 1 मे 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Political News live : बेळगाव, कारवार बीदरसह संयुक्त महाराष्ट्राच स्वप्न अजून अपूर्ण - अजित पवार
Follow us on

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आज मुंबईच्या हुतात्मा चौकात येऊन 106 हुतात्म्यांना अभिवादन केलं. महाराष्ट्रदिनाच्या, जागतिक कामगार दिनाच्या महाराष्ट्रवासियांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर नाव न घेता विरोधकांवर टीका सुद्धा केली. दुसऱ्याबाजूला नाशिकच्या सिडको परिसरात सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. स्फोटात तीन जण जखमी तर एक जण गंभीर असल्याची माहिती. सिडकोच्या चौपाटी येथील मध्यरात्रीच्या सुमारास घडली घटना. मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी रिपब्लिकन पक्षाचे नेते केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे पिंपरी येथे जाहीर सभा घेणार आहेत. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 01 May 2024 03:57 PM (IST)

    योगी आदित्यनाथ सोलापुरात काय म्हणाले?

    सोलापूरचे काँग्रेस नेते असलेले तेव्हा केंद्रात गृहमंत्री होते.  मालेगाव मध्ये झालेल्या बॉम्बस्फ़ोटत योगी आदित्यनाथचा हात असेल त्यावर सीबीआय लावू. मी म्हणालो आधी तुम्ही त्याचे पुरावे द्या मग इकडे या…, असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे.

  • 01 May 2024 03:45 PM (IST)

    चंद्रकांत पाटील काय म्हणाले?

    नरसय्या आडम हे आधी एक भाषा बोलत हो. आता वेगळी भाषा बोलत आहेत.  कुंभारी येथील कामगाराच्या घरांना 400 कोटी मिळणार होते पण आता 750 कोटी मिळाले. रे नगरला 24 तास पाणी, 324 कोटी अतिरिक्त निधी रें नगरला दिला, असं सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणालेत.


  • 01 May 2024 03:30 PM (IST)

    दादा भुसे छगन भुजबळांच्या भेटीला

    मंत्री दादा भुसे छगन भुजबळांच्या भेटीला पोहोचले आहेत.  नाशिकच्या भुजबळ फार्म येथील कार्यालयात भेटीसाठी दाखल झालेत. भाजप नेते गिरीश महाजन आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यानंतर शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे छगन भुजबळांच्या भेटीला पोहोचलेत.

  • 01 May 2024 03:15 PM (IST)

    पुण्याच्या तापमानात वाढ

    पुणे शहरासह जिल्ह्यात उन्हाचा पारा वाढला आहे. पुण्यात जिल्ह्यात अनेक ठिकाणी उच्चंकी तापमानाची नोंद झाली आहे.  पुण्यात आजचे तापमान ४१.८ डिग्री सेल्सिअस नोंदवण्यात आलं आहे.  पुढील २ ते ३ दिवस तापमानाचा आकडा असाच राहण्याचा अंदाज आहे. पुणे जिल्ह्यातील तळेगाव ढमढेरे इथं काल उच्चांकी ४४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. पुण्यात एप्रिल महिन्यात देखील विक्रमी तापमानाची नोंद झाली.  एप्रिल महिन्यात पुणे शहराने ६ वेळा पार केला ४० डिग्री तापमान नोंदवलं गेलं.

  • 01 May 2024 02:00 PM (IST)

    समता परिषदेचे उपाध्यक्ष दिलीप खैरे यांची उमेदवारी

    ३ मे ला नाशिकमध्ये समता परिषदेचे उपाध्यक्ष दिलीप खैरे उमेदवारी अर्ज भरणार आहेत. दिलीप खैरे हे छगन भुजबळांचे अत्यंत विश्वासू सहकारी आहेत.मोदींसाठी सर्वांची नाराजी दूर केली जाईल अशी प्रतिक्रिया भुजबळ देत असले तरी समर्थक उमेदवारीवर ठाम आहेत.

     

  • 01 May 2024 01:50 PM (IST)

    हेमंत गोडसे यांचे नाव अपेक्षित

    हेमंत गोडसे यांचे नाव अपेक्षित आहे. गोडसे सध्या सीटिंग एमपी आहेत, खासदार आहेत. त्यांचा आग्रह मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी सुद्धा केला होता. हेमंत गोडसे यांचे मनापासून अभिनंदन करतो अशी प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

  • 01 May 2024 01:42 PM (IST)

    सांगली जिल्ह्यावरील काँग्रेसचा दावा कायम

    सांगली लोकसभा जगावर काँग्रेसचा दावा होता पण काही तरी सांगलीत शिजलं आहे त्यामुळे ही जागा काँग्रेस कडून गेली आहे. आमचा सांगली जिल्हयावरचा दावा कोणीही संपुष्ठात आणू शकत नाही, असे वक्तव्य विश्वजीत कदम यांनी केले आहे.

  • 01 May 2024 01:33 PM (IST)

    दीपक केसरकरांची यांची उबाठावर टीका

    केंद्रिय मंत्री नारायण राणे यांना कोकणातील जनता निवडून आणू शकली नाही तर येणारा काळ आपल्याला माफ करणार नाही. आपला एक सहकारी केंद्रात नेता आहे यांचा आपल्याला अभिमान पाहिजे. नारायण राणे सारख्या नेत्याला कोकणापासून वंचित करायचं का? हा विचार मतदारांनी केला पाहिजे. उबाठा गटाकडून लोकांना भावना प्राधान करून पेटलेल्या आगीवर आपली पोळी भाजून घेतली जाते असा आरोप उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता दीपक केसरकर यांनी टीका केली आहे.

  • 01 May 2024 01:20 PM (IST)

    संजय राऊत यांचे गणित कच्च

    संजय राऊत यांचे गणित कच्च आहे. शिवसेनेचे तेरा खासदार एकनाथ शिंदे यांच्या बरोबर आज आहेत. किमान 16 जागा तरी आम्ही शिवसेना धनुष्यबाण चिन्हावर लढू 12 आणि 16 जागेतील फरक संजय राऊत यांनी समजून घ्यावा म्हणून म्हटलं की संजय राव यांचं गणित कच्च आहे. असं प्रतिक्रिया शंभूराज देसाई यांनी दिली आहे.

  • 01 May 2024 01:10 PM (IST)

    अजित पवार यांच्याविषयी संजय राऊत यांचा मोठा दावा

    लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत संजय राऊत यांच्या एका विधानाने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर हल्लाबोल चढवला. त्याचवेळी त्यांनी अजित पवार यांच्याविषयी मोठा दावा केला आहे. ते दैवत बदलतील असे ते म्हणाले.

  • 01 May 2024 01:02 PM (IST)

    आता उबाठाविरोधात लढाई सुरु

    बहुचर्चित नाशिक मतदार संघाचां तिढा सुटला,ही जागा शिवसेनेची आहे ,याची घोषणा बावनकुळे आणि फडणवीस यांनी केली,काही वेळात नावाची घोषणा होईल आणि अर्ज भरायला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असणार आहेत.उद्यापासून उबाठा गटाच्या विरोधात लढाई सुरू आहे, असे संजय शिरसाट म्हणाले

  • 01 May 2024 12:54 PM (IST)

    महायुतीतील नाशिकच्या जागेचा तिढा सुटला, हेमंत गोडसेंना उमेदवारी जाहिर

    महायुतीतील नाशिकच्या जागेचा तिढा सुटला आहे. शिंदे गटाचे हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहिर करण्यात आलीये.

  • 01 May 2024 12:49 PM (IST)

    भुजबळांसोबत महाजन, बावनकुळे यांची बैठक होऊनही भुजबळ समर्थक उमेदवारीवर ठाम

    भुजबळ निवडणूक रिंगणात नसल्याने समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची नाराजी कायम आहे. ३ मेला नाशिकमध्ये समता परिषदेचे उपाध्यक्ष दिलीप खैरे उमेदवारी अर्ज भरणार.

  • 01 May 2024 12:39 PM (IST)

    या निवडणुकीच्या निकालाकडे जगाच लक्ष आहे- शरद पवार

    भारत लोकशाही मानणारा देश आहे. स्वातंत्र्यासाठी अनेकांनी आपल्या जीवनाचा महत्वाचां काळ दिला. भारतमध्ये लोकशाही असण्याचे कारण जवाहरलाल नेहरू, लाल बहाददूर शास्त्री आहेत, असे शरद पवार यांनी म्हटले.

  • 01 May 2024 12:28 PM (IST)

    अनिल गोटे यांनी घेतली शोभा बच्छाव यांची भेट

    धुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार अनिल गोटे यांनी घेतली लोकसंग्रामपक्ष कार्यकर्त्यांची बैठक . माजी आमदार अनिल गोटे यांची घेतली महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी भेट…

  • 01 May 2024 12:06 PM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे घेणार धाराशिव शहरात प्रचार सभा

    आमदार कैलास पाटील यांची माहिती. धाराशिव शहरात 4 मे रोजी उद्धव ठाकरे यांची सभा घेणार आहे

  • 01 May 2024 11:59 AM (IST)

    शरद पवार महाराष्ट्राचा आत्मा- सुप्रिया सुळे

    शरद पवार महाराष्ट्राचा आत्मा आहेत. शरद पवारांचा आत्मा म्हणजे महाराष्ट्र आणि देशाची सेवा करणे आहे. सहा दशकात महाराष्ट्राने आणि देशाने शरद पवारांना प्रेम दिलं. आंब्याच्या झाडाला लोक दगड मारतात. समाजात कुठे काय तरी पाणी मुरतंय, त्यामुळे धमक्यांच्या चर्चा येतायत ना. माझी बऱ्याच दिवसांत दादाशी भेट झालेली नाही, त्यामुळे बदल झालाय का माहिती नाही, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली.

  • 01 May 2024 11:45 AM (IST)

    महाराष्ट्र दिनानिमित्त काय म्हणाले अजित पवार?

    “बेळगाव निपाणी कारवारच्या सीमेवरील मराठी भाषिक गावांचा महाराष्ट्रात समावेश करण्याचं आमचं स्वप्न अद्याप अपूर्ण आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सीमेवरील प्रत्येक मराठी भाषिक या संघर्षात झटत आहे. महाराष्ट्रातील जनतेचा आम्हाला पाठिंबा आहे आणि मला खात्री आहे की हा भाग महाराष्ट्रात समाविष्ट होत नाही तोपर्यंत हा पाठिंबा कायम राहील,” असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

  • 01 May 2024 11:30 AM (IST)

    ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा

    महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली आहे. कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश म्हस्के निवडणूक लढवणार आहेत.

  • 01 May 2024 11:15 AM (IST)

    नाशिक- भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे मंत्री छगन भुजबळ यांच्या भेटीला

    नाशिक- भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे मंत्री छगन भुजबळ यांच्या भेटीला पोहोचले आहेत. छगन भुजबळ यांच्या भुजबळ फार्म या कार्यालयात चंद्रशेखर बावनकुळे दाखल झाले आहेत. काल गिरीश महाजनांनी भेट घेतल्यानंतर आज चंद्रशेखर बावनकुळे भुजबळांच्या भेटीला आले आहेत. नाशिक लोकसभेच्या जागेसंदर्भात भुजबळांशी चर्चा करण्यासाठी भुजबळांची भेट घेणार असल्याची माहिती आहे.

  • 01 May 2024 10:57 AM (IST)

    Live Update | महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने कैद्यांची कुटुंबीयांसोबत गळाभेट….

    महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने अमरावतीच्या जिल्हा मध्यवर्ती कारागृहात कैद्यांची कुटुंबीयांसोबत गळाभेट… कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना भेटण्यासाठी आले त्यांचे कुटुंब… महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने अमरावतीच्या जिल्हा मध्यवर्ती कारागृहात गळाभेटीचा उपक्रम…

  • 01 May 2024 10:47 AM (IST)

    Live Update | नागपुरातील सिटी बसला अपघात

    नागपुरातील सिटी बसला अपघात… अनियंत्रित बस मेट्रोच्या पिल्लरवर धडकली… पहाटेच्या वेळी युनिव्हर्सिटी सिटी लायब्ररी चौकात घडली घटना… बसचं मोठं नुकसान, मात्र सुदैवाने बसमध्ये प्रवाशी नसल्याने अनर्थ टळला… चालक गंभीर जखमी , अपघात का आणि कसा घडला याची चौकशी सुरू

  • 01 May 2024 10:35 AM (IST)

    Live Update | उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज सोलापूर दौऱ्यावर

    सोलापुरातील वल्ल्याळ मैदानावरती योगी आदित्यनाथ यांची सभा आयोजित करण्यात आली. सोलापूरचे भाजप उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित करण्यात आली. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील या सभेला उपस्थित असणार आहेत.

  • 01 May 2024 10:19 AM (IST)

    Live Update | ठाणे लोकसभेसाठी नरेश म्हस्के यांच्या नावावर शिक्कामोर्तब

    ठाणे लोकसभेसाठी नरेश म्हस्के यांच्या नावावर शिक्कामोर्तब… काही वेळातच होणार नरेश म्हस्के यांच्या नावाची अधिकृत घोषणा…. ठाणे लोकसभा मतदार संघासाठी महायुतीकडून नरेश म्हस्के यांच्या नावावर शिक्कामोर्तब… ठाणे लोकसभेच्या नावाचा तिढा अखेर सुटला

  • 01 May 2024 10:06 AM (IST)

    Live Update | चंद्रशेखर बावनकुळे नीलिमा पवार यांच्या भेटीला

    चंद्रशेखर बावनकुळे नीलिमा पवार यांच्या भेटीला… महायुतीचा उमेदवार जाहीर होण्यापूर्वी बावनकुळे यांनी घेतली नीलिमा पवारांची भेट… नीलिमा पवार मविप्र संस्थेच्या माजी अध्यक्ष

  • 01 May 2024 09:57 AM (IST)

    महाराष्ट्र दिनानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी हुतात्म्यांना केलं अभिवादन

    महाराष्ट्र दिनानिमित्त हुतात्मा चौकातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्मारकावर दाखल. यावेळी मनसे नेते संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई, शर्मिला ठाकरे यांच्यासह अन्य मनसे पदाधिका-यांच्या उपस्थितीत राज ठाकरे यांनी हुतात्म्यांना अभिवादन केले.

  • 01 May 2024 09:42 AM (IST)

    भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे घेणार छगन भुजबळांची भेट

    -भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे छगन भुजबळांची भेट घेणार  आहेत. चंद्रशेखर बावनकुळे कालपासून नाशिक दौऱ्यावर आहेत. काल गिरीश महाजन यांनी  छगन भुजबळ यांची भेट घेतली होती. नाशिकचा उमेदवार आज जाहीर होण्याच्या पार्श्वभूमीवर बावनकुळे आणि भुजबळांची भेट होणार.

  • 01 May 2024 09:21 AM (IST)

    अरविंद केजरीवाल यांना निवडणुकीच्या वेळेसच का अटक करण्यात आली ? सुप्रीम कोर्टाचा ईडी अधिकाऱ्यांना सवाल

    दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना निवडणुकीच्या वेळेसच का अटक करण्यात आली ? सुप्रीम कोर्टाने ईडीच्या अधिकाऱ्यांना सवाल केला आहे. 3 मे रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीत आमच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली पाहिजेत, अशा स्पष्ट शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने ईडीला खडसावलं.

  • 01 May 2024 09:10 AM (IST)

    नवी दिल्ली : दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी

    दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली आहे. ई-मेलद्वारे ही धमकी देण्यात आली. बॉम्ब निकामी करणारे पथक घटनास्थळी दाखल झाले असून आत्तापर्यंत कोणतीही संशयास्पद वस्तू सापडलेली नाही.

  • 01 May 2024 09:06 AM (IST)

    मतदानासाठी पिंपरी चिंचवड महापालिका कर्मचार्‍यांना सुट्टी जाहीर

    मतदानासाठी पिंपरी चिंचवड महापालिका कर्मचार्‍यांना सुट्टी जाहीर.  मावळ तसेच शिरूर लोकसभा मतदार संघात वास्तव्यास असलेल्या महापालिका कर्मचा-यांना निवडणुकीच्या दिवशी मतदान करता यावे,यासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना मतदान करता यावे, यासाठी आवश्यक ते नियोजन करण्याचे आदेश महापालिका प्रशासक यांनी दिले आहेत.

    पिंपरी-चिंचवड महापालिकेचा काही भाग मावळ शिरूर लोकसभा मतदारसंघात येतो.  येत्या 13 मे रोजी या दोनही मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी निवडणूक विभागाने जनजागृतीचे अनेक उपक्रम हाती घेतले आहेत.

  • 01 May 2024 08:52 AM (IST)

    Maharashtra news : नाशिकच्या सिडको परिसरात सिलेंडरचा भीषण स्फोट

    नाशिकच्या सिडको परिसरात सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. सिलेंडर स्फोटाचा थरारक व्हिडिओ समोर. स्फोटात तीन जण जखमी तर एक जण गंभीर असल्याची माहिती. सिडकोच्या चौपाटी येथील मध्यरात्रीच्या सुमारास घडली घटना. सिडकोच्या चौपाटी परिसरात लागलेल्या असतात खाद्यपदार्थांच्या गाड्या, याच ठिकाणी घडली घटना. स्फोट झाल्यानंतर आग विझवण्यासाठी आलेला अग्निशमन दलाचा एक जवान देखील जखमी. पोलीस करत आहेत घटनेची अधिक चौकशी.

  • 01 May 2024 08:50 AM (IST)

    Maharashtra news : नाशिकच्या जागेबद्दल दादा भुसेंकडून महत्त्वाची अपडेट

    “1 मे महाराष्ट्र दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा. आज आपल्या सगळ्यांना गोड बातमी मिळेल. महायुतीच्या उमेदवाराची घोषणा मुख्यमंत्री करतील. जागा शिवसेनेकडे राहील. काही वेळातच गोड बातमी मिळेल. उमेदवारी जाहीर करण्यासाठी उशीर झाला. मात्र कोणताही फटका बसणार नाही. संध्याकाळपर्यंत उमेदवार घरा-घरा पर्यंत पोहोचलेला असेल” असं दादा भुसे म्हणाले. ते नाशिकच्या जागेबद्दल बोलत होते.

  • 01 May 2024 08:39 AM (IST)

    Maharashtra News : 106 हुतात्म्यांच बलिदान आम्ही वाया जाऊ देणार नाही – एकनाथ शिंदे

    “हुतात्मा स्मारकात आल्यानंतर ऊर्जा, प्रेरणा लोकांना मिळते. 106 हुतात्म्यांच बलिदान आम्ही वाया जाऊ देणार नाही. राज्याने देशाला विचार दिले, संविधान दिलं, असा हा महाराष्ट्र आहे” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

  • 01 May 2024 08:38 AM (IST)

    Maharashtra News : बेळगाव, कारवार बीदरसह संयुक्त महाराष्ट्राच स्वप्न अजून अपूर्ण – अजित पवार

    बेळगाव, कारवार बीदरसह संयुक्त महाराष्ट्राच आपलं स्वप्न अजून अपूर्ण आहे. हा लढा आपला जो पर्यंत पूर्ण होत नाही, तो पर्यंत महाराष्ट्रवासियांचा पाठिंबा असेल. अजित पवारांनी भाषणात मांडला संयुक्त महाराष्ट्राचा मुद्दा.