Maharashtra Political News Headlines 3 Aug 2024 : उद्धवजी निराशेत आहेत, मानसिक संतुलन गमावले आहेः देवेंद्र फडणवीस

| Updated on: Aug 04, 2024 | 8:18 PM

TV9 Marathi, Maharashtra Political News Headlines 3 Aug 2024 : आज 3 ऑगस्ट 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Political News Headlines 3 Aug 2024 : उद्धवजी निराशेत आहेत, मानसिक संतुलन गमावले आहेः देवेंद्र फडणवीस
Maharashtra Live News
Follow us on

पुण्यात शिवसेना उबाठाचा आज मेळावा होणार आहे. काही दिवसांपूर्वी अमित शाह यांनी पुण्यातून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्या टीकेला आज उद्धव ठाकरे काय उत्तर देणार? त्याकडे शिवसैनिकांचे लक्ष आहे. मेळाव्यासाठी पुणे शहरात सगळीकडे बॅनररबाजी केली आहे. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वूमीवर गिरीश महाजन ॲक्शन मोडवर आले आहे. ते नाशिकमध्ये विधानसभा मतदार संघाची आढावा बैठक आज घेणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज अमरावतीच्या वरुड दौऱ्यावर आहेत. भाजपच्या अमरावती जिल्हा ग्रामीण महाअधिवेशनाला ते उपस्थित राहणार आहेत. श्रावण सोमवारी नाशिकमधील त्र्यंबकेश्वरसाठी जादा बसेस सोडण्यात येणार आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 03 Aug 2024 06:52 PM (IST)

    डीएनए चाचणी चुकीची निघाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई करावी : अखिलेश यादव

    अयोध्या सामूहिक बलात्कार प्रकरणावर सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी म्हटले आहे की, जो कोणी दोषी असेल त्याला कायद्यानुसार शिक्षा व्हायला हवी. पण डीएनए चाचणीनंतर आरोप खोटे ठरले तर त्यात सहभागी असलेल्या सरकारी अधिकाऱ्यांनाही सोडता कामा नये.

  • 03 Aug 2024 06:37 PM (IST)

    सचिन वाझे यांना पुढे करून भाजप आरोप करत आहेः अनिल देशमुख

    महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर आरोप करत सचिन वाजे यांच्यासारख्या आरोपीला पुढे करून त्यांच्यावर आरोप करत असल्याचे सांगितले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवता येणार नाही, असं मुंबई हायकोर्टानं सचिन वाझेला सुनावलं आहे.


  • 03 Aug 2024 06:25 PM (IST)

    मुझफ्फरपूरमध्ये वेगवान बसने दुचाकीस्वाराला चिरडले

    बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये एका अनियंत्रित बसने दुचाकीस्वार विद्यार्थ्याला चिरडले. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी रास्ता रोको करून आंदोलन सुरू केले. हे प्रकरण बैरिया ओल्ड मोतिहारी रोडचे असल्याचे सांगण्यात येत आहे.

  • 03 Aug 2024 06:06 PM (IST)

    उद्धवजी निराशेत आहेत, मानसिक संतुलन गमावले आहेः देवेंद्र फडणवीस

    महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार प्रहार केला आहे. उद्धवजींनी मानसिक संतुलन गमावले आहेत आणि निराश आहेत. या वैफल्यात ते शब्द वापरत आहेत त्याला काय उत्तर द्यावे, असा प्रश्न पडतो. जर एखादी व्यक्ती मानसिक स्थिती बिघडल्यानंतर बोलत असेल तर त्याला उत्तर देऊ नये.

  • 03 Aug 2024 05:55 PM (IST)

    पोलिसांकडून 40 काडतुसांची खरेदी करताना अटक

    चंद्रपुरातून मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना उबाठा गटाच्या चंद्रपूर युवासेना जिल्हाप्रमुख आणि दोघांना 9 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी 40 काडतुसांची खरेदी करताना अटक केली होती. तीनही आरोपींचे मोबाईल कॉल डिटेल्स तपासले जात आहेत. यातूनच या काडतुसांसाठी आवश्यक पिस्तूलाच शोध घेतला जाणार आहे. काडतुसे कुठून आणली? आजवर किती आणली आणि ग्राहक कोण याबाबत सविस्तर तपास केला जातोय

  • 03 Aug 2024 05:44 PM (IST)

    मुख्यमंत्र्याच्या त्या निर्णयामुळे BAMS पदवीधारक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीएएमएस पदवीधारक विद्यार्थ्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राच्या आयुर्वेद पदवीधारक विद्यार्थ्यांना अन्य राज्यातून पदव्युत्तर अभ्यासक्रम कोट्यातून आता संधी मिळणार आहे.

  • 03 Aug 2024 04:56 PM (IST)

    नवी मुंबई एपीएमसी मार्केटमधील दाना मार्केटमध्ये शिरलं पावसाचे पाणी

    नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट मधील दाना मार्केट मध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना आणि ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नवी मुंबईत आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

  • 03 Aug 2024 04:41 PM (IST)

    शरद पवारांचा अजित पवारांना पुन्हा एकदा धक्का

    अजित पवार गटाचे नेते प्रवीण माने आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश करणार आहेत. इंदापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती व सोनाई उद्योगाचे संचालक प्रवीण माने यांचा आज पक्ष प्रवेश होणार आहे.

  • 03 Aug 2024 04:18 PM (IST)

    साताऱ्या जिल्ह्याला रेड अलर्ट जारी

    साताऱ्या जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

  • 03 Aug 2024 01:57 PM (IST)

    उद्धव ठाकरे यांचा खुलासा

    मी कोणत्याही व्यक्तीला नाही तर पक्षाला बोललो, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

  • 03 Aug 2024 01:56 PM (IST)

    उद्धव ठाकरे यांची जोरदार टीका

    तुला घालवण्यासाठीच मी मैदानात उतरलोय असे थेट उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

  • 03 Aug 2024 01:40 PM (IST)

    शरद पवार शिंदेंच्या भेटीला

    शरद पवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत.

  • 03 Aug 2024 01:32 PM (IST)

    ठाकरे गटाचा शिवसंकल्प मेळावा

    शिवसंकल्प मेळाव्यात संजय राऊत हे बोलताना दिसत असून ते म्हणाले की, विधानसभेत गाफिल राहू नका. नाही तर मते चोरली जातील. शिवसेनेला निवडणुका नवीन नाहीत.

  • 03 Aug 2024 01:23 PM (IST)

    कल्याण डोंबिवलीत पावसाची रिपरिप सुरू

    अधून मधून पावसाचा जोर वाढत असल्याने सखल भागात पाणी साचत असून पावसाचा जोर कमी होताच साचलेल्या पाण्याचा होत आहे निचरा

  • 03 Aug 2024 01:12 PM (IST)

    प्रसाद लाड यांचे गंभीर आरोप

    नाजायज औलाद कुणी पैदा केली याचा शोध घ्यावा लागेल, सचिन वाझेला ऊद्धव ठाकरेंनी पैदा केलं. २०१६ मध्ये सचिन वाझेला सर्विस मध्ये कुणी घेतलं हे पहावं लागेल, असे प्रसाद लाड यांनी म्हटले.

  • 03 Aug 2024 12:40 PM (IST)

    Maharashtra News Live : सततच्या पावसामुळे धान पिकाची शेती पाण्याखाली, पिकाचेही प्रचंड नुकसान

    गोंदिया : मागील आठवड्यात गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी, देवरी आणि मोरगाव अर्जुनी या तीन तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली होती. सतत आठवडाभर बरसलेल्या पावसामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर पावसाने उसंत घेतली होती. मात्र, आता पुन्हा पावसाचा जोर वाढला असून मागील तीन दिवसांपासून गोंदिया जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. परिणामी सडक अर्जुनी, मोरगाव अर्जुनी तालुक्यातील अनेक शेती ही पाण्याखाली आलेली आहे. खोबा ते चिंगी या दोन गावांना जोडणाऱ्या नाल्याला देखील पुर असून लगतची शेकडो हेक्टर शेती ही पाण्याखाली आली आहे.

  • 03 Aug 2024 12:38 PM (IST)

    Maharashtra News Live : हिरामण खोसकर छगन भुजबळांच्या भेटीला, चर्चांना उधाण

    नाशिक – इगतपुरीचे काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर छगन भुजबळांच्या भेटीला
    – खोसकर भुजबळ फॉर्मवर भुजबळांच्या भेटीला पोहचले
    – गेल्या काही दिवसांपासून खोसकर यांची राजकीय वाटचाल चर्चेत
    – विधान परिषदेत क्रॉस वोटिंग, अजित पवार, भुजबळ, मुख्यमंत्र्यांच्या भेटीमुळे खोसकर सातत्यानं चर्चेत

     

  • 03 Aug 2024 12:37 PM (IST)

    Maharashtra News Live : सचिन वाझेच्या माध्यमातून फडणवीसांकडून फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न – भास्कर जाधव

    “सचिन वाझेच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीसांनी फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला आहे”, असा आरोप ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी केला आहे. अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन एक खुलासा केला आहे, त्यामुळे असे आरोप वाझेंकडून केले जात आहेत. नितेश राणे फालतू माणूस आहे, त्यावर काय बोलायचं? असेही भास्कर जाधव म्हणाले.

  • 03 Aug 2024 12:34 PM (IST)

    Maharashtra News Live : रत्नागिरीत भाजपची महत्त्वाची बैठक, नारायण राणे राहणार उपस्थित

    रत्नागिरी- रत्नागिरी जिल्ह्याच्या भाजपची विस्तारित कार्यकारणी बैठक

    भाजपचे खासदार नारायण राणे, बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, माजी आमदार बाळ माने यांची प्रमुख उपस्थिती

    रत्नागिरी जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर

    विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने कार्यकारणीची महत्त्वाची बैठक

  • 03 Aug 2024 11:58 AM (IST)

    खेड-शिवापूर टोलनाक्यावर काँग्रेसचं आंदोलन

    पुणे बंगळूर महामार्गावरील खेड-शिवापूर टोलनाक्यावर काँग्रेसने आंदोलन केले आहे. महामार्गावर पडलेले खड्डे आणि महामार्गावरील रस्त्याच्या झालेल्या दुरास्थेविरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे. टोल नाक्यावर भरमसाठ टोल वसूल केला जातो मात्र टोलच्या बदल्यात वाहनचालकांना आवश्यक त्या सोई-सुविधा दिल्या जात नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.

  • 03 Aug 2024 11:50 AM (IST)

    नाशिक-पुण्यातील वाहतूक कोंडी फुटणार

    भारतात आता नवीन 8 अतिजलद राष्ट्रीय महामार्ग कॉरिडॉर होऊ घातले आहे. यामुळे विकासाला आणि दळणवळणाला बुस्टर डोस मिळणार आहे. नाशिक-पुण्यातील वाहतूक कोंडी फुटण्यासाठी हे महत्वाचे पाऊल आहे.

  • 03 Aug 2024 11:40 AM (IST)

    सचिन वाझे संत आहेत का?

    सचिन वाझे कोण आहेत? आरोपी आहेत. कोठे आहेत ते सध्या? साबरमतील् आहेत, वर्ध्याला पवनार आश्रमात तपस्या करतायेत का,असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला. पराभव टाळण्यासाठी भाजप अशा महाभागांना पुढं करतेय. अनिल देशमुखांनी काही माहीती पुढे आणली. फडणवीस यांच्या विषयी. काही आरोप केले. त्याला फडणवीस यांनी उत्तर द्यायला हवे होते. पण त्यांना त्यासाठी त्यांना तुरुंगातील प्रवक्ता लागतोय, असा चिमटा त्यांनी काढला.

  • 03 Aug 2024 11:20 AM (IST)

    पुराव्याशिवाय आरोप करत नाही-गिरीश महाजन

    कुणी किती खंडण्या मागितल्या याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे. सचिन वाझेंच्या आरोपानंतर महाजन यांनी ही मागणी केली आहे. आम्ही पुराव्याविना काहीच आरोप करत नसल्याचा दावा त्यांनी केला.

  • 03 Aug 2024 11:10 AM (IST)

    राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी दाखल

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षा या निवासस्थानी दाखल झाले आहेत. पुण्यातील परिस्थितीबाबत ते मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतील. राज्यातील इतर काही विषयांवर पण चर्चा होणार असल्याचे समोर येत आहे.

  • 03 Aug 2024 11:04 AM (IST)

    सचिन वाझे यांच्यावर कसा विश्वास ठेवणार

    सचिन वाझे हे कस्टडी मध्ये आहे, ते आताच का बोलत आहेत, अनिल देशमुख यांनी आरोप केल्यामुळे वाझे आता बोलत आहेत. त्यांच्या बोलण्यावर किती विश्वास ठेवायचा, असा सवाल सचिन अहिर यांनी केला.इतकी वर्ष त्यांना कुणी अडवलं,नार्को टेस्ट करा. आम्ही एका लोकसभा मतदारसंघात दोन विधानसभेच्या जागा मिळायला पाहिजेत, असे ते म्हणाले.

  • 03 Aug 2024 10:37 AM (IST)

    Maharashtra News : भाजपा मनाने हरलाय – संजय राऊत

    “भाजपा मनाने हरलाय. लोकसभेत हरले, महाराष्ट्रात विधानसभेला यापेक्षा वाईट पद्धतीने हरणार. भाजपा गुंडांचा आश्रय घेत आहे. सचिन वाझे सारख्या प्रवक्त्याच्या माध्यमातून महाविकास आघाडीतील नेत्यांवर आरोप होतील” असं संजय राऊत म्हणाले.

  • 03 Aug 2024 10:32 AM (IST)

    Maharashtra News : मुंडा बिगडा गया तो हम क्या करे – संजय राऊत

    “कधी काळी सचिन वाझेच नाही, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अमित शाह सुद्धा आमच्या जवळचे होते. अब मुंडा बिगडा गया तो हम क्या करे” असं संजय राऊत म्हणाले. “भाजपा संकटात आल्यानंतर वाझे बाहेर येऊन स्टेटमेंट देतो. भाजपाने असे प्रवक्ते नेमलेत, त्यामुळे आज आहे त्यापेक्षा रसातळाला जाणार” असं संजय राऊत म्हणाले.

  • 03 Aug 2024 10:29 AM (IST)

    Maharashtra News : तुरुंगातील आरोपीच्या वक्तव्याला किती महत्त्व द्यायचं – संजय राऊत

    “अनिल देशमुखांच्या आरोपांवर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर द्यायला हवं होतं. तुरुंगातील आरोपीच्या वक्तव्याला किती महत्त्व द्यायचं. निवडणुकीतील पराभवाच्या भितीने भाजपा सचिन वाझेचा आरोप करतय” असा दावा संजय राऊत यांनी केला.

  • 03 Aug 2024 10:26 AM (IST)

    National News : एअर इंडियाचा मोठा निर्णय

    “इस्रायल आणि इराणमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर Air India चा मोठा निर्णय. तेल अविवला जाणाऱ्या सर्व विमानांची उड्डाण 8 ऑगस्ट पर्यंत रद्द. प्रवासी आणि क्रू मेंबरची सुरक्षा ही आमची प्राथमिकता आहे” असं एअर इंडियाने म्हटलं आहे. मध्य पूर्वेमधील देशांमधील तणावाची परिस्थिती पाहता आम्ही हा निर्णय घेत आहोत असं एअर इंडियाने सांगितलं. ज्या प्रवाशांनी तिकीटं काढली होती, ती रद्द केल्यानंतर त्यावरची रक्कम प्रवाशांना पुन्हा दिली जाईल असं एअर इंडियाकडून सांगण्यात आलं.

  • 03 Aug 2024 10:04 AM (IST)

    Maharashtra News: फडणवीसांनी वाझेला हाताशी धरुन माझ्यावर आरोप करायला लावलेत – अनिल देशमुख

    फडणवीसांनी वाझेला हाताशी धरुन माझ्यावर आरोप करायला लावलेत…. सचिन वाझे जे बोलले ती फडणवीसांची चाल… वाझे विश्वास ठेवण्याच्या लायक नाही… असं हायकोर्टाने म्हटलंय… असं वक्तव्य अनिल देशमुख यांनी केलं आहे.

  • 03 Aug 2024 09:57 AM (IST)

    Maharashtra News: मध्य रेल्वे अद्यापही विस्कळीत

    मध्य रेल्वे अद्यापही विस्कळीत… कर्जत आणि कसाऱ्यावरून येणाऱ्या लोकल गाड्या पाच ते सात मिनिट उशिराने सुरु…

     

  • 03 Aug 2024 09:45 AM (IST)

    Maharashtra News: पुण्यातील खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला

    पुण्यातील खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला… खडकवासला धरणातून 23 हजार क्युसेक पाण्याचा मुठा नदीत विसर्ग… पुणे शहरातील मुठा नदीवरील भिडे पूल पुन्हा पाण्याखाली… भिडे पुलावरील वाहतूक बंद, नदी पात्रातील रस्त्यावर पाणी भरलं…

  • 03 Aug 2024 09:38 AM (IST)

    Maharashtra News: उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पुण्यात आज शिवसंकल्प मेळावा

    उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पुण्यात आज शिवसंकल्प मेळावा होणार आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज ठाकरे गटाता मेळावा… मुंबईनंतर पुण्यातील विधानसभेच्या जागांवर लक्ष केंद्रीत…

  • 03 Aug 2024 09:25 AM (IST)

    Maharashtra News: मुंबई नाशिक महामार्गावर उड्डाणपुलाखाली एकेरी वाहतूक

    उड्डाणपुलाखाली गाड्या घसरुन होत आहेत अपघात… पंचवटी ते द्वारका रस्त्यावर होत आहेत दररोज अपघात… पवसामुळे गाड्या घसरुन अनेक अपघात होत असल्याने रस्ता बंद… प्रत्येक पावसाळ्यात होणाऱ्या अपघातांमुळे रस्त्यांच्या कामाबाबत नाराजी… रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी

  • 03 Aug 2024 09:11 AM (IST)

    Maharashtra News: सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर

    महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत आता बांबू लागवडीसाठी हेक्टरी 7 लाख रुपये अनुदान मिळणार… सोलापूर जिल्ह्यात वन विभाग, सामाजिक वनीकरण, कृषी विभाग आणि तालुका पंचायत समितीला बांबू लागवडीसाठी लक्षांकित केले आहे… सोलापूर जिल्ह्यात 4000 हेक्टर बांबू लागवडीचे उद्दिष्ट असून या शासकीय योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले…

  • 03 Aug 2024 08:57 AM (IST)

    Marathi news: नाशिक गंगापूर धरण 66 टक्के जलसाठा

    नाशिकच्या त्र्यंबकेश्वर परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे गंगापूर धरण 66 टक्के भरले आहे. तसेच इगतपुरी परिसरात पावसाचा जोर वाढल्याने दारणा धरणातून पुन्हा पाण्याचा विसर्ग सुरु आहे. दारणा धरणातून 6738 क्यूसेस वेगाने पाण्याचा विसर्ग दारणा नदीत सुरू केला आहे.

  • 03 Aug 2024 08:46 AM (IST)

    Marathi news: नरेश म्हस्के यांची रेल्वे मंत्र्यांशी चर्चा

    खासदार नरेश म्हस्के यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची रेल भवन येथील कार्यालयात प्रत्यक्ष भेट घेत अर्धा तास सविस्तर चर्चा केली. ठाणे लोकसभा मतदारसंघातील ठाणे, नवी मुंबई आणि मीरा-भाईंदर या प्रमुख रेल्वे स्थानकांमधील विविध प्रश्न, मुलभूत सुविधा आणि नवीन लांब पल्ल्याच्या गाड्या सोडणे याबाबत खासदार नरेश म्हस्के यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे लक्ष वेधले.

  • 03 Aug 2024 08:31 AM (IST)

    Marathi news: कापूस पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव

    खरीप हंगामात पावसाला चांगली सुरुवात झाली आहे. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाखो हेक्टरवर पेरण्या केल्या. परंतु पावसाने मधल्या काळात जवळपास एक महिना पावसाने दडी मारली होती. परंतु आता पुन्हा पाऊस सुरु झाला आहे. सोयाबीन आणि कापूस पिकांवर मावा चिकटा तुडतुडे या कीड रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. या रस शोषण अळीमुळे पिकांच्या उत्पादनात घट होणार आहे.

  • 03 Aug 2024 08:18 AM (IST)

    Marathi news: टोमॅटोच्या दरात घसरण

    मागील महिन्यात गगनाला भिडलेले टोमॅटोचे दर हळूहळू आटोक्यात येत आहेत. मागील आठवड्यात किरकोळ बाजारात शंभरी गाठलेले दर आत पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. एपीएमसी बाजारात दोन दिवसांपूर्वी प्रतिकिलो ३०-४० रुपये असलेले भाव आज २०-२५ रुपयांवर स्थिरावले आहेत.