महायुतीमधील मतभेद रविवारी समोर आले. अजित पवार यांच्या जन्मसमान यात्रेत भाजपाच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आशा बुचके यांच्यासह कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी केली. विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची आज बैठक बोलवली आहे. अर्थसंकल्पानंतर प्रथमच जळगावच्या सराफ बाजारात सोने ७२ हजारांच्या पुढे गेले आहे. २०१९ च्या लोकसभेच्या तुलनेत यंदा निवकडणुकीच्या खर्चात ६६ टक्के इतकी वाढ झाली आहे. वाढलेली नव मतदारांची संख्या, वाढलेली बुथची संख्या, अधिकारी वर्गाचा खर्च यात वाढ झाल्यामुळे खर्च वाढला आहे. ठाण्यातील सांस्कृतिक केंद्र असलेल्या राम गणेश गडकरी रंगायतनचे दुरुस्तीचे काम सप्टेंबर महिन्यात हाती घेण्यात येणार आहे.
जळगावात दुचाकीला कट लागल्याने एका तरुणाने ट्रकवर चढून ट्रकच्या समोरच्या काचा फोडल्या. जळगाव शहरात राष्ट्रीय महामार्गावर आकाशवाणी चौकात सर्कलजवळ घटना घडली. दुचाकीला कट लागल्याचा राग आल्याने तरुण ट्रकवर चढला आणि त्याने लाथा मारून ट्रकच्या समोरच्या काचा फोडून नुकसान केले. काचा फोडल्यानंतर तरुणाने ट्रक चालकाला सुद्धा लाथा मारून मारहाण केली. महामार्गावरील भर चौकात घडलेल्या घटनेमुळे मोठी ट्राफिक जाम झाली होती. याचवेळी या ठिकाणांहून जाणारे भाजपचे आमदार सुरेश भोळे यांनी घटनास्थळ गाठून ट्रकच्या काचा फोडणाऱ्या तरुणावर संताप व्यक्त केला. आमदारांनी संताप व्यक्त केल्यानंतर तरुण खाली उतरला आणि त्याने घटनास्थळावरून पळ काढला. दरम्यान घटनेनंतर ट्रकचालक तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात पोहोचल्याची माहिती मिळाली आहे.
नवी दिल्ली : कोलकत्त्यातील प्रशिक्षणार्थी डॉक्टर महिलेच्या बलात्कार आणि खून प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाकडून दखल घेण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून याचिका घेतली आहे. मंगळवारी सकाळी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासमोर सुनावणी होणार आहे. कोलकत्त्यात झालेल्या बलात्कार आणि हत्याकांडानंतर संपूर्ण देश हादरला आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय घेतला आहे.
नाशिक-मुंबई महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.विल्होळी ते गोंदेपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. तब्बल आठ ते दहा किमी पर्यंत वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. महामार्गाचे सुरू असलेले काम आणि परतीच्या प्रवासाला निघालेल्या वाहनांमुळे ही वाहतूक कोंडी झाली आहे.
अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात लाडक्या बहिणीचा ‘देवा भाऊ’ कार्यक्रम सुरु आहे. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थितीत लाडक्या बहिणींशी संवाद साधत आहेत. विरोधकांनी या योजनेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे बहिणींनी सावत्र भावांपासून दूर रहावं. तसंच लाडकी बहिण योजना बंद होणार नाही, असा शब्दही फडणवीस यांनी दिला.
पिंपरी-चिंचवडमध्ये काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मुसळधार पावसाचं कमबॅक झालं आहे.अगदी ढगफुटी सदृश्य पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे पिंपरी-चिंचवडकरांची धावपळ उडाली. अचानक आलेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे रस्त्यांना नद्यांचे रूप आले आहे. गेल्या एक ते दीड तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे.
पुण्यात आज शरद पवारांच्या भेटीसाठी अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी कविता केजरीवाल दाखल झाल्या आहेत. खासदार संजय सिंह हे पण भेटीसाठी दाखल झाल्यात. राज्यसभा खासदार संजय सिंह जामिनावर बाहेर आले आहेत.
मराठी तरुणांनी नोकऱ्या करणारे नाहीत तर नोकर्या देणारे बनायला पाहीजे अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नागपूरात म्हटले आहे.
भिडे गुरुजी बोलले ते शब्द देवेंद्र फडणवीस यांचे आहेत, आता भिडे गुरुजी तसं म्हणत असतील तर त्यांच्यापासूनही मराठे दूर जातील असे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
अंधेरी पूर्व विधानसभेत प्रथमच भाजप आणि शिवसेनेचे वेग वेगळे कार्यक्रम होणार आहेत. यावेळी भाजप आणि शिवसेना आपआपली ताकद दाखवणार आहेत.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा महिला व पदाधिकाऱ्यांचा मेळावा. मेळाव्याला मोठ्या संख्येने महिला पुरुष उपस्थित…
राखी आणि आरतीच ताट हातात घेऊन लाडक्या बहिणींचं मुख्यमंत्र्यांना साकडं.
सहकारी संस्थांच्या माध्यमातून इथल्या शेतकऱ्यांच्या जीवनात जनतेच्या जीवनात एक आर्थिक क्रांती घडवून आणलेली आहे. आंबेगाव तालुक्याचा विकास झालेला आहे हे कोणी नाकारू शकत नाही, असे अजित पवार यांनी म्हटले.
इगतपुरी त्रंबकेश्र्वर तालुक्याचे काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते बाळासाहेब थोरातांच्या भेटीला निघाले आहेत. हिरामण खोसकर यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. घोषणाबाजी करत 100 हून अधिक गाड्या संगमनेरकडे रवाना झाल्या आहेत. हिरामण खोसकर यांच्या उमेदवारीसाठी स्थानिक नेते आक्रमक झाले आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेड मोठी घोषणा करणार आहे. कोणत्या ठिकाणी किती उमेदवार देणार आणि किती उमेदवार देणार याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे. ठाण्यात महत्वाच्या विषयावर संभाजी ब्रिगेडची तातडीची बैठक होत आहे. लोकसभा निवडणुकीच्या नंतर विधान सभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात मुंबई आणि ठाणे पालघर जिल्ह्यातील जिल्हाध्यक्षांचे विश्रामगृह येथे बैठक पार पडत आहे.
लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांचे भोकरमध्ये ओबीसी समाज बांधवांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. जेसीबीच्या साह्याने फुलांची उधळ, क्रेनच्या साह्याने गुलाबाचा हार स्वागतासाठी तयार होता.
ठाण्यातील वागळे परिसरातील डंपिंगची समस्या येथे 31 ऑगस्ट पर्यंत सुटणार आहे पूर्णतः कचरा ची विल्हेवाट ठाणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येणार आहे यासाठी शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक एकनाथ भोईर राम रेपाळे यांनी पाठपुरावा केला होता.
छत्रपती संभाजीनगर येथील विद्यार्थांना विषबाधा झाली , सात विद्यार्थ्यांवर चिखलठाणा घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
आज लोकशाही मागे हुकूमशाही दडली आहे. जात धर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. शिवसेना, राष्ट्रवादी फोडली, याला लोकशाही म्हणायची ? आमच्याकडे नाही आला की ईडी, सीबीआय लावायचा, सुडाचा राजकारण सुरु आहे. समतेचा राज्य आणायचा असेल तर सध्याचं सरकार बदलाव लागेल, असे राजेश टोपे म्हणाले.
12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर या ज्योतिर्लिंग मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी केली आहे. सलग तीन दिवस सुट्टी असल्याने आज रविवारी असल्याने भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.उद्या तिसरा श्रावणी सोमवार असल्याने देखील आज दिवसभर ही गर्दी सुरू राहण्याचा अंदाज आहे.
जरांगे पाटील यांना आता माजी सैनिकांचाही पाठिंबा
जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी राज्यातील विविध भागातील माजी सैनिक अंतरवालीत
भारतीय जवान किसान पार्टीचा जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा
नाशिक :- त्र्यंबकेश्वर मंदिरात आज भाविकांची गर्दी
– 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर ह्या ज्योतिर्लिंग मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी
– सलग तीन दिवस सुट्टी असल्याने आज रविवारी असल्याने भाविकांच्या लांबच लांब रांगा
– उद्या तिसरा श्रावणी सोमवार असल्याने देखील आज दिवसभर ही गर्दी सुरू राहील – मंदिर प्रशासन
– तिसऱ्या सोमवारच्या ब्रह्मगिरी प्रदक्षिनेसाठी भाविकांची गर्दी
– 200 रुपये शुल्क दर्शन असणाऱ्या VIP दर्शनाची देखील मोठी रांग
राहुल गांधी यांना पुणे कोर्टाने पाठवल होतं समन्स
स्वतंत्रवीर विनायक दामोदर सावरकर यांची बदनामी केल्या प्रकरणात दाखल केली होती याचिका
उद्या पुणे कोर्टात होणार सुनावणी
राहुल गांधी हजर राहणार का ? याकडे सगळ्यांच लक्ष
राहुल गांधी वकिलांना पाठवणार की स्वतः हजर राहणार पहाण महत्वाच
सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी दाखल केली आहे याचिका
– जुन्नर तालुक्यातील भाजपा नेत्या आशा बुचके यांची प्रकृती खालावली
– रक्तदाब वाढल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात केलं दाखल
– जन सन्मान यात्रे दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काळे झेंडे दाखवत जोरदार घोषणा दिल्या नंतर पोलिसांनी घेतले होते ताब्यात
– पोलीस स्टेशन मध्ये दाखल केल्यानंतर त्रास जानविल्यांने पोलिसांनी खाजगी रुग्णालयात केले दाखल
– महाविकास आघाडीतील काँग्रेसचे सत्यशील शेरकर यांनी आशा बुचके यांची घेतली भेट
सातारा : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या आज सन्मान सोहळ्यासाठी कार्यक्रमाला निमंत्रण पत्रिकेत नाव वगळल्याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांची नाराजी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड घेणार शिवतीर्थावर भेट
महायुतीचा कार्यक्रमांमध्ये दूजाभाव होत असल्याचा अशोक गायकवाड यांचा आरोप
या पुढील काळात सन्मान राहिला नाही तर आगामी काळात वेगळी भूमिका घेणार
सांगली- बांग्लादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात येत्या 25 ऑगस्ट रोजी सांगली जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे. तर 20 तारखेला जिल्हाधिकारी यांना सांगली बंदबाबत निवेदन देणार असल्याची माहिती संभाजी भिडे गुरुजी यांनी दिली आहे.
खानापूर विटा मतदारसंघात सुहास बाबर यांच्या पाठिशी राहणार असल्याचं वक्तव्य विशाल पाटलांनी आटपाडी इथं पडलेल्या जाहीर सभेत केलंय. त्यामुळे खानापूर विटा मतदारसंघावरून दोघं भिडण्याची शक्यता आहे. “आपण अपक्ष, कुणाला घाबरत नाही, आम्हाला कोणी बोलायचं कारण नाही”, असं ते म्हणाले. सुहास बाबर हे खानापूर विटा मतदारसंघात शिंदे गटाचे संभाव्य उमेदवार आहेत.
साताऱ्यात ‘लाडकी बहीण योजने’चा लाभार्थी सन्मान सोहळा पार पडणार आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे. साताऱ्यातील सैनिक स्कूल मैदानावर सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं असून पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी कार्यक्रमस्थळाची पाहणी केली.
खतगावकर नांदेडच्या मुखेड-कंधारमधून लढण्यास इच्छुक असल्याची सूत्रांची माहिती आहे. नांदेडच्या मुखेड-कंधारमध्ये सध्या भाजपचे तुषार राठोड आमदार आहेत.
जय पवारांचा रोहित पवारांच्या मतदारसंघात दौरा सुरू आहे. आजपासून ते कर्जत-जामखेडच्या दौऱ्यावर आहेत. कर्जत-जामखेड मतदारसंघात ते बैठका घेत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांचा उपस्थितीमध्ये महिला मेळाव्याचे आयोजन… मेळाव्याच्या ठिकाणी सुप्रिया सुळे यांचा आगमन… सुप्रिया सुळे यांचं तुतारीच्या नादात स्वागत… मनमिरा मंगल कार्यालयात महिला मेळावा चा आयोजन…
रामगिरी महाराजांच्या सरला बेट मठाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त तैनात… वैजापूरच्या सरला बेट मठाबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात… रामगिरी महाराजांनी केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ…
उल्हासनगरात रिक्षाचालकाच्या घरावर गोळीबार… पहाटेच्या सुमारास अज्ञात दुचाकीस्वाराने झाडल्या २ गोळ्या… विठ्ठलवाडी पोलीस घटनास्थळी दाखल, तपासाला सुरुवात…
यवतमाळ : राळेगाव येथील विवाहित महिलेच्या हत्या प्रकरणात आदिवासी समाज संघटना आक्रमक… जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या कार्यालयावर धडकले समाज बांधव… आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे मागणी करत केलं आंदोलन…
नंदुरबार याठिकाणी वाहनचालकाला चालत्या गाडीत हृदयविकाराचा झटका… हृदयविकाराचा झटका आल्यामुळे कार चालकाचं निधन… चार जणांचा अपघात… अपघातात 2 जणांचा मृत्यू…
पुण्याच्या वाघोलीमध्ये वाघेश्वरनगरमधील गुंडांकडून हैदोस रात्रीच्या वेळेस दोन दुचाकी पेट्रोल टाकून जाळल्या आहेत. या गुंडांवर लोणीकंद पोलीस स्टेशन सह अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आला आहे. हे परिसरामध्ये दहशत निर्माण करण्यासाठी आणि आपला दबदबा कायम राहण्यासाठी असे प्रकार करीत आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थींच्या सन्मान सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातारा जिल्हा दौऱ्यावर आहेत. जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील 50 हजार महिला कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यातील काही मोजक्या लाभार्थी महिलांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मान होणार आहे.
बारामतीमध्ये शरद पवार यांच्या उपस्थिती विद्या प्रतिष्ठानमध्ये होत असलेल्या संस्थेच्या बैठकीसाठी सुनेत्रा पवारही दाखल झाल्या आहेत. विद्या प्रतिष्ठानच्या बैठकीत शरद पवार यांच्याबरोबरचं सुनेत्रा पवार यांचीही हजेरी आहे. विद्या प्रतिष्ठानच्या बैठकीनिमित्त शरद पवार सुनेत्रा पवार एकत्र पाहायला मिळत आहेत. विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संस्थेची बारामतीमधील विद्यानगरीत आढावा बैठक पार पडत आहे. विद्या प्रतिष्ठानच्या कामा संदर्भात या बैठकित आढावा घेण्यात येणार आहे. त्यामुळं सुनेत्रा पवार संस्थेच्या बॉडीवर असल्यानं त्याही बैठकीसाठी दाखल झाल्या आहेत.
राष्ट्र्वादीची शिवस्वराज्य यात्रा रात्री परभणीत मुक्कामी होती. काही वेळात ही यात्रा जालन्याकडे निघणार आहे. जयंत पाटील आणि अमोल कोल्हे शिवस्वराज यात्रा करत आहे. तत्पूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे परभणीचे खासदार संजय जाधव यांचे निवासस्थानी जयंत पाटील दाखल झाले आहेत. सदिच्छा भेट घेण्यासाठी जयंत पाटील संजय जाधव यांच्या निवासस्थानी दाखल झालेत.
सीमाशुल्क कपातीच्या घोषणेनंतर घसरण झालेल्या सोन्याच्या भावात पुन्हा वाढ सुरू आहे. शनिवारी सोने एक हजार ६०० रुपयांनी वधारले. त्यामुळे अर्थसंकल्पानंतर २५ दिवसांनी सोने पुन्हा एकदा ७२ हजार ३०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले आहे. चांदीच्याही भावात शनिवारी एक हजार ५०० रुपयांची वाढ होऊन ती ८४ हजार ५०० रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे.
मुंबईत भेंडी बाजारातील एका व्यावसायिकाने आपल्या कार्यालयात गोळी झाडून जीवन संपवले. जेजे मार्ग पोलिस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार, 52 वर्षीय व्यापारी इक्बाल मोहम्मद सिवानी यांनी भिंडी बाजार भागातील अमीन बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या त्यांच्या कार्यालयात स्वत:वर गोळी झाडली.
नवी मुंबईतील उरणमध्ये पुन्हा एकदा हत्याकांड झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. उरणमधील जासई गावात प्लास्टिक गोणीत मृतदेह मिळाला आहे. उरण पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. यशश्री शिंदे प्रकरण ताजे असताना पुन्हा एकदा खून प्रकरण समोर आले आहे.
अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेत भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी काळे झेंडे दाखवले. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आशा बुचके यांच्यासह कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी केले. पर्यटन तालुका असताना शासकीय कार्यक्रम घेऊन घटक पक्षांना डावल जात असल्याचा आरोप करत त्यांनी काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी केली.