राज्यात सध्या मुसळधार पाऊस कोसळत आहे. हवामान विभागाकडून सहा जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर दुसरीकडे राज्यात राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. आज शरद पवार हे अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा दौऱ्यावर आहेत. तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रमुख नेत्यांची आज बैठक पार पडणार आहे. या बैठकीत विधानसभा निवडणुकीबद्दल चर्चा केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भाजपचे माजी मंत्री आणि शिंदखेडाचे आमदार जयकुमार रावल यांचे कट्टर समर्थक कामराजा निकम हे शरदचंद्र पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत. कामराज निकम हे गेल्या वीस वर्षापासून जयकुमार रावळ यांचे कट्टर समर्थक मानले जातात. जिल्हा परिषदेवर भाजपाची पहिल्यांदा सत्ता आल्यानंतर कामराज निकम यांच्या पत्नीकडे उपाध्यक्षपदाची धुरा देण्यात आली होती.
रविवारी सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर मध्य रेल्वेचा मेगा ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.25 ते दुपारी 2.45 पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा माटुंगा येथे डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात दिव्यांग विद्यार्थ्यांना वसतिगृह मिळावे यासाठी विद्यार्थी संघटनांनी आंदोलन केले. विद्यार्थ्यांना पोलिसांनी गेटवरच अडवल्याने विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. विद्यापीठातील वरिष्ठ भेटत नसल्याने विद्यार्थ्यांनी यावेळी संताप व्यक्त केला. या आंदोलनात विविध विद्यार्थी संघटनांचे विद्यार्थी सहभागी झाले होते.
विशाळगड अतिक्रमणा विरोधात उभे ठाकलेल्या छत्रपती संभाजी राजांच्या भूमिकेला भारतीय मराठा महासंघाने समर्थन दिले आहे. विशाळगड आंदोलनाला जाहिर पाठींबा व्यक्त केला आहे. येत्या आठ दिवसात छत्रपती संभाजी राजांची भेट घेऊन महासंघाच्यावतीने निवेदन सुपूर्द करणार आहोत. अशी माहिती भारतीय मराठा महासंघाचे नूतन महाराष्ट्र् प्रदेश अध्यक्ष महेश कदम यांनी दिली.
माजी खासदार वसंत पवार यांच्या कन्या आणि भाजप येवला विधानसभा अध्यक्ष अमृता पवार या शरद पवार गटाच्या वाटेवर आहेत. येवल्यातून अजितदादा गटाचे छगन भुजबळ राष्ट्रवादीचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. त्यांच्याविरोधात अमृता पवार यांची पवार गटातून निवडणूक लढण्याची तयारी केली आहे.
विशाळगड अतिक्रमणा विरोधात उभे ठाकलेल्या छत्रपती संभाजी राजांच्या भूमिकेला भारतीय मराठा महासंघाने समर्थन दिले असुन विशाळगड आंदोलनाला जाहिर पाठिंबा व्यक्त केला आहे.
धुळ्यातील कुसुबा येथील निवासी आदिवासी आश्रम शाळेत 22 मुलांना दूषित पाण्याची बाधा झाली आहे. यामध्ये 2 मुलांची प्रकृती गंभीर आहे. तर 6 मुलांवर धुळे जिल्हारुग्णालयात उपचार सुरु आहेत. 16 मुलावर जिल्हा रुग्णालयात उपचार आहेत. गेल्या एक महिन्यापापासून टँकरने पाणी पूरवठा केला जाता होता. टँकरच्या पाण्यामुळे मुलांना उलटी आणि हगवणंचा त्रास झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
आमदार जयकुमार रावल यांना मोठा धक्का बसला आहे. माजी मंत्री शिंदखेडाचे आमदार जयकुमार रावल यांचे कट्टर समर्थक कामराजा निकम शरद चंद्र पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत. कामराज निकम हे गेल्या वीस वर्षापासून जयकुमार रावल यांचे कट्टर समर्थक आहेत.
भारताचे आकाश देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांनी नेहमीच भरलेलं असतं. पण, शुक्रवारी त्यात रिकामापणा दिसून आला. मायक्रोसॉफ्ट या दिग्गज टेक कंपनीच्या सर्व्हरमधील त्रुटीमुळे भारतासह जगभरातील विमान कंपन्यांचे काम ठप्प झाले आहे. एअर इंडिया, इंडिगो, आकासा एअर आणि स्पाईसजेट सारख्या भारतीय विमान कंपन्यांना देखील या तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे उड्डाणे बंद करावी लागली होती. समस्या एवढी गंभीर झाली की तिकीट बुकिंगही बंद करावे लागले आहे. याशिवाय चेक इन करताना अडचणी येत होत्या. त्यामुळे आज देशांतर्गत उड्डाणांऐवजी केवळ विदेशी विमानंच भारतीय आकाशात दिसली.
शरद पवार यांच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने पिपाणी हे चिन्ह गोठवलं आहे. पिपाणी आणि तुतारी वाजवणारा माणूस यात थोडे फार साम्य असल्याने अनेक मतं अपक्ष उमेदवारांना मिळाली होती. त्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने निवडणूक आयोगाकडे याबाबत तकार केली होती.
कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड आणि गजापूर येथे मुस्लिम बांधवांच्या घरावर हल्ला करून काही समाजकंटकांनी मोठ्या प्रमाणात नुकसान केले. या घटनेच्या निषेधार्थ सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर एमआयएम पक्षाच्यावतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. एमआएमचे जिल्हाध्यक्ष डॉ. महेशकुमार कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करत घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांना देण्यात आले.
राजधानी साताऱ्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वाघनखं आणण्यात आली. यावेळेस मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर महत्त्वाच्या लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत वाघनखे दालनाचे उद्घाटन करण्यात आलं. यावेळेस मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आनंद व्यक्त करत सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले. तसेच आजचा दिवस हा भाग्याचा असून साऱ्यांच्याच चेहऱ्यावर आनंद असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
“मुख्यमंत्र्यांनी इंग्रजीमधून लंडन मुझियमचे आभार मानले. तसेच सुधीर भाऊंनी वेळेवर वाघनखे आणली आहेत, त्यांनी सरकारचा शब्द पाळला. मात्र त्याचा वेगळा अर्थ काढू नका”, असं मु्ख्यमंत्री म्हणाले. तसेच शिवरायांनी संपवला अफजलखान वाघनखं महाराष्ट्राची शान, असं म्हणत शिंदेंनी वाघनखांबाबतची प्रतिक्रिया दिली.
प्रत्येक गोष्टीत विवाद करणे हा देशातील काहींना रोग लागला आहे, असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. साताऱ्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वाघनखांचे दर्शन आणि वाघनखे दालनाचे उद्घाटन करण्यात आलं आहे. यावेळेस फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला. आता कोणाचा कोथळा काढायाचा नाहीय, मात्र या वाघनखाने काहींच्या बुध्दीचा गंज काढावा लागेल, असं म्हणत फडणवीस यांनी विरोधकांना चांगलंच सुनावलंय.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार सांस्कृतिक मंत्री विजय मुनगंटीवार, पालकमंत्री शंभूराज देसाई खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह अन्य मान्यवर छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय परिसरात दाखल
सर्व्हर डाऊनमुळे ब्रिटेन, अमेरिका, जर्मनी व्यवहार ठप्प झाले आहेत.
जगभरातली मोठी विमानतळ ठप्प. यंदाच्या वर्षातील सर्वात मोठे आयटी संकट. विमानतळांसह बँकांच्या कामकाजावरही मोठा परिणाम
लंडनच्या शेअर बाजाराचे काम ठप्प झाले आहे.
2024 मधील सर्वात मोठे आयटी संकट आले आहे. याचा परिणाम जगभरातील विमानसेवेवर झाला आहे.
विनय मोहन क्वात्रा यांची अमेरिकेतील भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 1988 बॅचचे IFS अधिकारी, क्वात्रा या महिन्यात परराष्ट्र सचिव म्हणून निवृत्त झाले. परराष्ट्र सचिवपदी नियुक्ती झाल्यावर ते नेपाळमध्ये भारताचे राजदूत होते.
ठाणे आनंद नगर जकात नाका ते मुलुंड टोल नाका मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावर वाहतूक कोंडी दूर झाली. ठाणे ते मुंबई आणि मुंबई ते ठाणेच्या दिशेने सर्व वाहने व्यवस्थित रित्या वाहतूक सुरळीत आहे.
मुंबई गोवा महामार्गाच्या कोकणातील कामाचा दर्जाबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. मुंबई गोवा महामार्गावरील सावर्डे येथील पोलिस स्टेशन समोरील उड्डाण पुलाच्या अनेक ठिकाणी तडे जाऊन पुल खचला आहे. कालपासून उड्डाण पूल वाहतुकीसाठी बंद आहे.
पूजा खेडकर यांनी जे आरोप केले आहेत त्यांची नोटीस मला मिळाली नाही
जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांची माहिती
योग्य वेळ आल्यावर मी बोलणार,जिल्हाधिकाऱ्यांची माहिती
पूजा खेडकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांवर केलाय छळवणूकीचा आरोप
मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक सुरू झाली आहे. या बैठकीत नवाब मधील देखील उपस्थित आहेत. विधानसभा निवडणुकीच्या आधीची शेवटची बैठक आहे. बीकेसीतील एमसीएमध्ये ही बैठक घेण्यात येत आहे.
महाराष्ट्र पोलिसांना १२ नव्या फॉरेन्सिक व्हॅन मिळणार असून नागपूर,मुंबई आणि नवी मुंबईत मिळणार नव्या फॉरेन्सिक व्हॅन येणार आहे.
राज्य सरकारकडून फॉरेन्सिक व्हॅनसाठी 13 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्याअंतर्गत मुंबईत 5, नवी मुंबईत 2 तर नागपुरात 5 फॉरेन्सिक व्हॅन मिळणार. नागपूर आणि नवी मुंबईत प्रत्येक झोनसाठी एक फॉरेन्सिक व्हॅन तर मुंबईत रिजननुसार एकेक व्हॅन मिळणार आहे.
गुन्ह्याची उकल करण्यासाठी तपासादरम्यान फॉरेन्सिक व्हॅनी अत्यंत महत्त्वाची भूमिका असते.
महायुतीच्या काळात महाराष्ट्र पिछाडीवर गेला. भ्रष्टाचार प्रकरणातील अनेक जण भाजपमध्ये गेले, पत्रकार परिषदेत जयंत पाटील यांचे आरोप. जयंत पाटील यांनी काळे फुगे फोडून निषेध व्यक्त केला .
मुंबई हायकोर्टाचा राज्य सरकारला दणका, राज्य सरकारच परिपत्रक मुंबई हायकोर्टाने रद्द केले.
सरकारी शाळांच्या एक किलोमीटर परिघाच्या आत असलेल्या खाजगी विनाअनुदानित शाळांना 25% कोट्यातील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यापासून सूट देण्यात आली होती. ही सूट देण्याबाबतचे परिपत्रक, म्हणजेच निर्णय मुंबई हायकोर्टाने रद्द केला आहे.
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर वर्धा जिल्ह्याच्या पाच तालुक्यातील शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. वर्धा, सेलू, देवळी, हिंगणघाट आणि समुद्रपूर तालुक्यातील शाळांना प्रशासनाच्या वतीने सुट्टी जाहीर झाली आहे. विद्यार्थी शाळेत आले असतील तर पाऊस ओसरेपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेतून सोडू नये, अशा सूचना शिक्षकांना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
पिपाणी हे निवडणुकीतील फ्री चिन्ह गोठवा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक आयोगाला करण्यात आली होती. या मागणीसंदर्भात आज निवडणूक आयोग निर्णय देणार आहे. पिपाणी चिन्हामुळे लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा फटका बसला होता. तुतारी हे त्यांचे चिन्ह आहे.
राज्यात महसूल कर्मचारी संघटनांचा संप सुरूच. जिल्हाधिकारी कार्यालय तहसील कार्यलयात कर्मचारी संपावर. सर्वसामान्य नागरिकांची अनेक कामे खोळंबली. छत्रपती संभाजीनगर तहसील कार्यालयात महसूल कर्मचाऱ्यांचा कडकडीत संप. गजबजलेल्या कार्यालयात पडला शुकशुकाट.
कावड यात्रेबाबत उत्तर प्रदेश सरकारचा मोठा निर्णय. कावड यात्रा मार्गावरच्या सर्व दुकानदारांना फलक लावावे लागणार. दुकान मालकांना नावांसह फर्मच नाव फलकावर लावण्याचा आदेश. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारचा आदेश. कावड यात्रा मार्गांवर अनेक ठिकाणी मुस्लिम समाजाची दुकान आणि हॉटेल्स. गंगा नदीचे पाणी आपापल्या गावात नेण्याची परंपरा म्हणजेच कावड यात्रा. हजारो तरुण कावड यात्रेत होतात सहभागी.
पुणे पोलिसांनी पूजा खेडकर यांना दिली दुसरी नोटीस. वाशिम पोलिसांच्या एपीआय श्रीदेवी पाटील यांनी पूजा खेडकर यांची भेट घेऊन दिली नोटीस. पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर छळाचे आरोप केल्यासंदर्भात पूजा खेडकर यांना उद्या 20 तारखेला पुणे येथे जबाब नोंदवण्यासाठी दुसरी नोटीस दिल्याची माहिती.
“या देशात एक व्यक्ती स्वत:ला सुपरमॅन समजते. या सुपरमॅन व्यक्तीबाबत मोहन भागवत बोलले असावेत. मोहन भागवत यांनी मनमोकळेपणे बोललं पाहिजे. देशात सर्वसामान्य नागरिक सुपरमॅन. मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर भाजपान चिंतन केलं पाहिजे” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
वसई विरार नालासोपाऱ्यात रात्रभर पावसाची संततधार सुरू आहे. संततधार पावसासह अधूनमधून जोरदार पाऊस पडत आहे.. शुक्रवारी सकाळ पासून, विरार ते चर्चगेट धावणाऱ्या लोकल 5 ते 10 मिनिटाने उशिराने धावत आहेत… वसई विरार शहरात कुठेही पाणी साचले नाही. हवामान खात्याने पालघर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे.
महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या प्रमुख नेत्यांची आज बैठक… काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे… राज्यातील काँग्रेसचं सर्व प्रमुख नेते बैठकीला उपस्थित राहणार आहेत… विधान परिषदेतील क्रॉस व्होटिंग करणाऱ्यांवर आज कारवाई?
हिंगोलीतील औंढा तालुक्यातील असोला गावात गोळीबार… गोळीबारात एक जण जखमी झाला असून जखमी व्यक्तीला परभणीत उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. गोळीबारानंतर संतप्त नागरिकांनी एक ट्रॅक्टर आणि दुचाकी पेटवली आहे.. असोला गावात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे…
सिंहगड रस्त्याच्या पायथ्याला वारकऱ्यांना घेवून जाणारा टेम्पो पलटी… टेम्पोत ४० वारकरी असल्याची माहिती समोर येत आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही… डोनजे येथील घटना सकाळच्या सत्रात घडली…
रिमझिम पाऊस सुरु असून मध्ये रेल्वे सुरळीत आहे. पण मुलुंड टोल नाक्यावर वाहतूक कोंडी आहे. 2 ते 3 किलोमीटर लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. सतत पडणार पाऊस, सिंग्णल यंत्रणा, खड्डे आणि टोल नाक्यामुळे मोठी वाहतूक कोंडी…
पुणे महानगरपालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांना डेंग्यूची लक्षणे… आयुक्तांचा डेंगूचा प्राथमिक अहवाल निगेटिव्ह… खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू… शहरात डेंगूच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ… त्यामुळे डास प्रतिबंधक उपाययोजना महापालिकेकडून सुरू
Maharashtra news :विशाळगड तोडफोड प्रकरणी आज एमआयएमकडून राज्यभर निदर्शने
छत्रपती संभाजीनगर शहरातही इम्तियाज जलील करणार निदर्शने
पोलिसांच्या सूचनेवरून इम्तियाज जलील यांचा कोल्हापूर दौरा रद्द
दुपारी 3 वाजता विभागीय आयुक्त कार्यालयावर इम्तियाज जलील करणार निदर्शने
Maharashtra news : सातारा: शिवकालीन वाघनखांच्या दिमाखदार सोहळ्यासाठी सातारा नगरी सज्ज
छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाच्या परिसरात प्रशासनाकडून मोठी सजावट
संग्रहालयाच्या गेटवर आकर्षक अशी लक्षवेधी स्वागत कमान
संग्रहालयाच्या इमारतीला फुलांच्या माळांनी सजविले
या दिमाखदार सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार तसेच सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, पालकमंत्री शंभूराज देसाई जिल्ह्यातील सर्व खासदार आमदार उपस्थित राहणार आहेत.
Maharashtra news : रत्नागिरी जिल्ह्यात रात्री पावसाचा जोर वाढला
किनारपट्टी भागात वेगवान वाऱ्यासह मुसळधार पाऊस
दक्षिण रत्नागिरीत पावसाच्या जोरदार सरी
किनारपट्टी भागात ताशी 40 किलोमीटर वेगाने वारे
जिल्ह्यासाठी पावसाचा आज रेड अलर्ट
Maharashtra news : गोंदिया जिल्ह्याच्या चारही विधानसभेवर काँग्रेसचा दावा
लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसची ताकद वाढल्याने पदाधिकाऱ्यांच्या निर्णय
जिल्ह्यात महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याचे संकेत
मात्र महाविकास आघाडी जो निर्णय घेईल तो कार्यकर्त्यांना मान्य असल्याचे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे