नवीन सरकारचे पहिले अधिवेशन आजपासून सुरु होणार आहे. या अधिवेशनात पहिले दोन दिवस नवीन खासदारांचा शपथविधी होणार आहे. त्यानंतर लोकसभा अध्यक्षांची निवड होणार आहे. राष्ट्रपतींचे अभिभाषण होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अभिभाषणासाठी धन्यवाद प्रस्ताव मांडून चर्चेला सुरुवात करणार आहेत. नीट घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या अधिवेशनात विरोधक सरकारला घेरण्याची तयारी करणार आहे. पुणे हॉटेल ड्रग्स प्रकरणात एकूण आठ जणांनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मंगळवारी दुपारी मंदिर समितीच्या वतीने आमंत्रण दिले जाणार आहे. पुण्यात महविकास आघाडीचा जागांचा फॉर्म्युला ठरला आहे. आठ जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष तीन, काँग्रेस तीन तर शिवसेना ठाकरे पक्ष दोन जागा लढणार असल्याचे सांगितले जात आहे. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
पुण्यातील L3 बार मधील पार्टी प्रकरणी नवी माहिती समोर आली आहे. L3 बारमधील 6 वेटर्सना राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अटक करण्यात आली आहे. त्या सर्वांना 29 तारखेपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. बेकायदेशीरपणे मद्याचा साठा जमा केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. परवानगी नसताना दुसऱ्या मजल्यावर मद्याची विक्री केल्याप्रकरणी वेटरांनाही अटक करण्यात आली आहे.
पंढरपूर : राज्यात लवकरच राईट टू हेल्थ कायदा लागू करणार, अशी घोषणा आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी केली आहे. राईट टू हेल्थ कायदा राबवणारं महाराष्ट्र हे दुसरं राज्य असणार आहे. राजस्थानमध्ये राईट टू हेल्थ हा कायदा अस्तित्वात आहे. या किंवा पुढच्या कॅबिनेटमध्ये याबाबतचं विधेयक पास करून अधिवेशनात लवकरच मंजूर केलं जाईल, अशी माहिती तानाजी सावंत यांनी दिली.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याबाबत ईडीने दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालय मंगळवारी निर्णय देणार आहे. न्यायमूर्ती सुधीर कुमार जैन यांचे न्यायालय दुपारी अडीच वाजता निकाल देणार आहे.
दिल्लीतील आम आदमी पक्षाने उपराज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. आपचे नेते सौरभ भारद्वाज यांनी दिल्लीतील 1100 झाडे तोडल्याचा दाखला देत उपराज्यपालांना घेराव घातला आणि राजीनामा मागितला. उपराज्यपालांनी बेकायदेशीरपणे 1100 झाडे तोडल्याचा दावा त्यांनी केला.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांची राज्यसभेतील सभागृह नेतेपदी निवड करण्यात आली आहे. आधी पियुष गोयल होते, पण आता ते लोकसभेचे खासदार आहेत.
रशियाने अमेरिकेला मोठी धमकी दिली आहे. क्रिमियावरील हल्ल्यासंदर्भात रशियाने ही धमकी दिली आहे. रशियाने प्रत्युत्तराच्या कारवाईबद्दल बोलले आहे. अमेरिकेच्या राजदूताला बोलावून रशियाने हा इशारा दिला आहे. क्रिमियावर झालेल्या ATACMS क्षेपणास्त्र हल्ल्यासाठी रशियाने अमेरिकेला जबाबदार धरले आहे.
अभिनेत्री खासदार कंगना राणावतची महाराष्ट्र सदनाला पसंती मिळाल्याचं वृत्त समोर आलं आहे. खासदारकीची शपथ घेतल्यानंतर कंगना राणावत महाराष्ट्र सदनात दाखल झाल्या. यापुढे दिल्लीतील वास्तव्यासाठी महाराष्ट्र सदनातील रूमची चाचपणी करणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली. तसेच शासकीय निवासस्थान मिळेपर्यंत कंगना राणावत महाराष्ट्र सदनात राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.
पुणे हॉटेल ड्रग्स प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. 8 आरोपींना 29 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर आरोपींना 5 दिवसांची कोठडी ठोठावण्यात आलीय.
पुणे हॉटेल ड्रग्स प्रकरण : ड्रग्स प्रकरणातील सर्व 8 ही आरोपींना 29 जून पर्यंत पोलीस कोठडी. आरोपींना 5 दिवसांची पोसील कोठडी.
लातूर : नीट आणि यूजीसी घोटाळ्यातील आरोपी जलील पठाण याला 7 दिवसाची पोलीस कस्टडी सुनावण्यात आलीये. नीट परीक्षेतील विद्यार्थ्यांना गुण वाढवून देण्याचा आरोप जलील पठाण आणि त्याच्या सहकाऱ्यावर करण्यात आलाय. दरम्यान आज आरोपी जलील पठाण याला कोर्टात हजर करण्यात आले होते.
येत्या 27 जून पासून राज्यसभेचे अधिवेशन सुरू होत असून या अधिवेशनात जे पी नड्डा हे सत्ताधारी पक्षाचे नेते म्हणून भूमिका बजावतील.
यापूर्वी राज्यसभेच्या नेतेपदी पियुष गोयल हे कार्यरत होते मात्र आता लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यामुळे त्यांनी हे पद सोडले आहे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भंडारा दौऱ्यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना घेऊन जाणारी बोट बुडून तिचे तीन तुकडे झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
छत्रपती संभाजीनगरात मराठा संघटना आक्रमक झाली असून मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्या आंतरवालीतील उपोषणाला विरोध केल्यामुळे डॉक्टर रमेश तारख यांच्या काळे फासण्यात आले आहे.
पावसाने ओढ दिल्याने पाण्यावरून नाशिक जिल्ह्यात संघर्ष सुरु असून पोलीस बंदोबस्तात नाशिकच्या कश्यपी धरणातून गंगापूर धरणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
नीट परीक्षेच्या घोटाळ्याचे कलेक्शन लातूरपर्यंत पोहचले आहे.
माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी कांदा बटाटा मार्केट केले बंद. सर्व माथाडी मापाडी यांच्यासह मनपा मुख्यालयावर काढणार मोर्चा.
किसनराव जोर्वेकर यांच्यासह माजी खासदार उन्मेष पाटील तसेच माजी आमदार राजीव देशमुख यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले आहे.
चाळीसगाव येथे भाजपकडून सुरू असलेल्या आंदोलनात साहेबराव काळे या वयोवृद्ध कार्यकर्त्याचा आत्मदहनाचा प्रयत्न. भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याविरोधात.
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात बैठक सुरु आहे. सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक सुरु आहे. साकोली विधानसभा मतदारसंघातील विकासकामांसंदर्भात ही बैठक सुरु आहे.
पुण्यात पीएचडी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरु आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फोनवरून संवाद साधला. राज्यातील सरकारशी चर्चा करुन विषय सोडवण्याचा प्रयत्न करूस असं यावेळी सांगण्यात आलं. बार्टी , सारथी , महाज्योती , पीएचडी च्या पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळावी या मागणीसाठी आंदोलन केलं जात आहे. आज पुण्यात काढला पायी लाँग मार्च काढण्यात आला.
अरविंद केजरीवाल यांच्या जामीनावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने अद्यापपर्यंत केजरीवाल यांच्या जामीनावर निर्णय न घेतल्यानं आप सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं आहे. केजरीवाल यांना राऊज एव्येन्यू न्यायालयाने जामीन मंजूर केला होता.त्या विरोधात इडीने उच्च न्यायालयात अपिल केले होते. यावर सुनावणी झाली असून दिल्ली उच्च न्यायालयाने अद्यापर्यंत निर्णय दिलेला नाही. असं असताना केजरीवाल यांची सर्वोच्च न्यायालयात जामीनासाठी धाव घेतली आहे.
पुणे जिल्ह्याच्या शिक्रापूर येथील तीन तरुणांसह एका महिलेला काही अज्ञात इसमाकडून अपहरण करून कारमधून अज्ञात स्थळी नेलं. लाठ्या काठ्या, कोयता ,तलवारी सह हात पाय बांधून जबर मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत सोशल मीडियावर व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याबाबत पुणे ग्रामीण पोलीस काय कारवाई करतात ते पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
“गुटखा, बारच्या पैश्यांवर निवडणुका लढवल्या आणि निवडणुका जिंकल्यात तेच आता नैतिकतेच्या गप्पा मारत आहेत. मेधा कुलकर्णी बरोबर बोलत आहेत, यादी दिली त्याचं पुढे काय झालं? माझाही तोच आरोप आहे. त्या सत्तेत आहेत त्यांनी पोलिसांना विचारलं पाहिजे. गृहमंत्री आणि शंभुराज देसाई यांनी राजीनामा दिला पाहिजे. माझ्यावर स्टंट करतो असा आरोप केला जातो, मग अपघात प्रकरणात एवढे लोकं जेलमध्ये कसे गेलेत” असा सवाल काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी विचारला.
“मला आणि माझ्या समाजाला घेरण्याचा प्रयत्न सुरू आहे. सत्य मागणी कायद्याने केली. त्यामुळे यांना पटत नाही. मी मूळ मुद्दा मांडल्याने ओबीसी नेत्यांचे रंग उघडे पडले आहेत. यामुळे मराठा नेत्यांना सांगतो, सगळे ओबीसी नेते मराठ्यांना कायदेशीर आरक्षण मिळू नये यासाठी मताचा विचार करत नाहीत. मात्र मराठा नेते मतांचा विचार करत आहेत. यामुळे मराठा नेत्यांनी एकत्र आल पाहजे” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
इंडिया आघाडीच्या तिनही सदस्यांचा प्रोटेम स्पीकरच्या पॅनलवर बहिष्कार. काँग्रेसचे के सुरेश, टीएमसीचे सुदीप बंदोपाध्याय आणि डीएमकेचे टीआर बालू यांचा पॅनेलवर बहिष्कार. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तिघांनाही प्रोटेम स्पीकरच्या पॅनलमध्ये नियुक्त केले होते. प्रोटेम स्पीकरच्या पॅनलचे तीन सदस्य प्रोटेम स्पीकरला मदत करणार नाहीत. नवीन खासदारांना शपथ देणार नाहीत.
संसदेच्या अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद सदस्यत्वाची शपथ घेतली. 26 जून रोजी होणार लोकसभा अध्यक्षांची निवड. दोन दिवस नवनिर्वाचीत खासदारांना शपथ दिली जाणार आहे.
“जातीयवाद भुजबळ घडवून आणतोय. सगळ्यांनी एक व्हा. आम्ही कोणत्याही नेत्याला दोष देत नाहीय. आम्ही आरक्षणात आहोत. ओबीसीत आहोत. 13 जुलै पर्यंत आम्ही शांत राहू” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
मराठ्यांनो तयार राहा, पण सुरुवात आपल्याला करायची नाही… लेकरांना न्याय देण्यासाठी सर्वांनी एकत्र या… भुजवळांना दंगली घडवायच्या आहेत… असं वक्तव्य देखील जरांगे पाटील यांनी केलं आहे.
मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना फोन… फोनवरून कालच्या प्रकरणाची माहिती घेण्यात आली… याप्रकरणी जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करा… मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुणे पोलीस आयुक्तांना सूचना
देशाच्या जनतेनं तिसऱ्यांदा सेवा करण्याची संधी दिली… नव्या खासदारांचे अभिनंदन आणि त्यांना शुभेच्छा… देश चालवण्यासाठी सहयोग महत्त्वाचा असतो – मोदी
संसदेत लोकशाहीचा आजचा दिवस गौरव दिन… पहिल्यांदाच नव्या संसदेत नव्या खासदारांचा शपथविधी… देशाच्या प्रगतीची स्वप्न घेऊन 18 व्या संसदेची आजपासून सुरुवात… असं नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.
राज्यातील लोकसभेच्या दारुण पराभवानंतर भाजप करणार मंथन… भाजपची पुढील आठवड्यात मंथन बैठक… रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमधे होणार मंथन… बैठकीला भाजपचे राज्यातील वरिष्ठ 20 नेते उपस्थित राहणार… लोकसभेला झालेल्या चुका टाळून विधानसभा निवडणुकीची रणनीती बैठकीत ठरवली जाणार
गाफील राहू नका, कार्यकर्त्यांच्या आतिआत्मविश्वासाने आम्हीही गाफील राहिलो… खोटं कथानक पसरविणाऱ्यांना जागृत राहून सडेतोड उत्तर द्या… शिंदेंचे महायुतीच्या कार्यकर्त्यांना आवाहन
मोदींच्या विरोधात प्रथमत विरोधी पक्षनेता असेल… संसदेत आता मोदी आणि शहांचा आवाज घुमणार नाही… संसदेत आता इंडिया आघाडीचा आवाज घुमणार… असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.
पुणे ड्रग्ज प्रकरणी कडक कारवाई करा, अशी सूचना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना फोन करून कालच्या प्रकरणाची माहिती घेतली. तसेच याप्रकरणी जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करा अशी सूचना पोलीस आयुक्तांना दिली.
मुंबई महापालिका आयुक्तांची मुंबईतील प्रश्नांवर बोलती बंद. आज वांद्रे परिसरात वृक्ष लागवडीनंतर इतर प्रश्नांवर बोलणे आयुक्तांनी टाळलं. पाणी प्रश्न, वृक्षांची व्यवस्थित छाटणी न झाल्यामुळे आणि अपुरी नालेसफाई हे प्रश्न मुंबईकरांना भेडसावत आहेत. विरोधकांनीही गेले काही दिवस यावर आवाज उठवलेला असतानाही महापालिका आयुक्तांची यावर चुप्पी कायम आहे.
भाजपचे नवीन निवडणूक प्रभारी या आठवड्यात मुंबई दौऱ्यावर येणार. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि मंत्री आश्विनी वैष्णव प्रभारी मुंबईत येणार. विधानसभा निवडणुकीबाबत आढावा घेतला जाणार असून भाजपच्या नेत्यांसोबत बैठक घेऊन पुढील रणनीती ठरवली जाणार आहे.
पुण्यातील ड्रग्ज व्हायरल व्हिडिओ प्रकरणी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मोठी कारवाई केली आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक निलंबित. तसेचसहायक पोलीस निरिक्षक दिनेश पाटील यांच्यावरही निलंबनाची कारवाई करण्यात आली. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या सुचनेनंतर कारवाई करण्यात आली.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सकाळी १० वाजता वांद्रे येथील एमआयजी क्लब मध्ये बैठक बोलावली आहे. मनसेचे नेते ,सरचिटणीस, राज्यातील प्रमुख पदाधिकारी राहणार बैठकीसाठी उपस्थित. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठक आहे.
काही दिवसांपूर्वी रंगशारदा सभागृह वांद्रे येथे झालेल्या बैठकीत मनसेने स्वबळाचा नारा दिला होता. त्यामुळे आजच्या बैठकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना काय सूचना करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
अमरावती ग्रामीण पोलिस भर्तीवर पावसाचे सावट आहे. पावसामुळे मैदान खराब झाले आहे. यामुळे मैदानी चाचणीसाठी पुढची तारीख द्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. मैदानी चाचणीसाठी मैदान योग्य नसल्याचा विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
नीट परीक्षा पेपर फुटी बाबत सध्या देशभर उलट सुलट चर्चा आहे. याप्रकरणी काही संशियतांना ताब्यात घेण्यात आली आहे. पण या प्रकारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व मानसिक नुकसान होत असल्याने देशभर निषेध व्यक्त होत असून याबाबत कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी सांगली NSUI कडून करण्यात आली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली जामगे परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे डोंगरातून येणार्या प्रवाहांमुळे रस्ता जवळपास 150 मिटर रस्ता खचला आहे. यामुळे या रस्त्यावरील वाहतूक दोन्ही बाजूने बंद करण्यात आली आहे.
पुण्यात महविकास आघाडीचा जागांचा फॉर्म्युला ठरला आहे. आठ पैकी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष तीन, काँग्रेस तीन तर शिवसेना ठाकरे पक्ष दोन जागा लढणार आहे. शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष पर्वती, हडपसर आणि खडकवासला तर काँग्रेसकडून पुणे कॅन्टोन्मेंट, शिवाजीनगर आणि कसबा ही जागा लढवण्यात येणार आहे. ठाकरे गट कोथरूड आणि वडगाव शेरीची जागा लढणार आहे.